माझी भटकंती वर्षासहल मांढरदेव ते ओहळी भाग क्र.११ ते १२
माझी भटकंती अपडेट लेख
🍀 माझी भटकंती🍀
🔖क्रमशः भाग अकरावा
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
पावसाळी सहल मांढरदेव ते भोरघाट मार्गे ओहळी
♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
श्रावण मासातील
हिरवागार निसर्ग, सण उत्सवांची रेलचेल , ऊन पावसाचा खेळ ,फेसाळणारे धबधबे,खळाळत वाहणारे ओढे, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या व आल्हाददायक वातावरण.
"श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षणात येते सरसर शिरवे,क्षणात फिरुनी ऊन पडे!
बालकवींच्या 'श्रावणमास ' या निसर्ग काव्याच्या अनुभूतीसाठी निसर्ग सौंदर्य पहाण्यासाठी २००८ सालात केंद्रप्रमुख श्री महमंद तडवी सर,गटसमन्वयक श्री डी.एम.पोळ सर व शिक्षकमित्र श्री दादासाहेब कुदळे यांच्या समवेत केलेली सहल.

🌧💧🌈🌴🌳🌱💧💧
सकाळी वाईतुनच निघताना थुई थुई पाऊस पडत होता.आमच्या दोन गाड्या. मी अन् कुदळे सर व पोळ सर आणि तडवीसर अशी जोडी बोपर्डी , धावडी मागे टाकत गुंडेवाडी फाट्यावर आलो. गाडीने घाट चढायला सुरू झाली.पावसाचा जोर वाढयला लागला . एका बाजूला पांडवगड तर खालील दरीचे अवलोकन करत आम्ही पुढे निघालो.तीव्र यु वळण घेवून मालवाठार भाग आल्यावर दादाने गाडी बाजूला घेतली.घाटाचा मधला टप्पा .तिथन धरणाचा लुक पहायला थोडंसं चालत पुढे गेलो.तेथून अवर्णनीय धोम धरणाचा देखावा दिसत होता.एकीकडे पसरणी डोंगर ,रायरेश्वरापासून सुरू झालेली डोंगर रांग केंजळगड करत एक शाखा पुढे अभेपुरीजवळ विसावते .दुसरीशाखा वडाचीवाडी व पाचपुते वाडी या जुळ्या वाड्यांना कुशीत घेवून पुढे वेरूळी, मांढरदेव ते बालेघरला पर्यंत जाते. एका बाजूला पांडवगड डोंगर रांग , दुसरीकडे वेरुळीचा डोंगर , शेती, रस्ते व छोटी छोटी दिसणारं गावं पाहून मन प्रसन्न झाले. मनमोहक नजारा पाहून पुढील रस्त्याशेजारील धबधब्या जवळ आलो.. वाहवा नेत्रदीपक धबधबा ..फेसाळत पाणी रस्त्यावर लोटांगण घालत होते... पडणाऱ्या पावसाचे थेंब चष्म्याच्या काचेवर साठत त्यामुळे तो सारखा पुसायला लागायचा..(नंतर चष्मा काढून ठेवला.). नवकवी सत्यजितची पावसात भिजताना कवितेची ओळ आठवली
" नभास आले कळोनी सारे "
तिरक्या केल्या धारा
काचेवरचे थेंब झटकण्या
घोंगावत ये वारा....
हा भाग दादाला परिचयाचा तो अगोदर भिवजेवाडी व वडाचीवाडी येथील शाळेत होता.तर पोळ सर पिराचीवाडी (धावडी)येथील असल्याने त्यांना या भागाची खडानखडा माहिती.तडवीसरांना शाळा भेटीमुळे माहित होता...मीच केवळ या भागात भटकंती न केलेला....

🍀
🍀 माझी भटकंती🍀
🔖क्रमशः भाग बारावा
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
पावसाळी सहल मांढरदेव ते भोरघाट मार्गे ओहळी
♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
आम्ही तेथून मांढरदेव घाटमाथ्यावर आलो.तेथून उजवीकडचा मार्ग मांढरदेव पठाराकडे जातो.लाखो भाविकांचे दैवत काळूबाई मातेचे मंदिर गावाच्या टेकडीवर आहे.तेथून तसेच पुढे बालेघर पर्यंत जाता येते.हवेतील गारव्याने पावसाचा व वाऱ्याचा जोर वाढल्याची जाणीव झाली.फाट्यावर थांबून कुठं जायचं याची खाणाखुणी करून आम्ही भोरघाटाने पुढे निघालो...वाई आणि भोर ला जोडणारा घाटांचा मार्ग .तीव्र उतार पाऊस झेलीत झेलीत आम्ही यु टर्न ओलांडून पुढे निघालो...कड्यावरुन धबधबे नाचत येत होते.पाणी रस्त्यावर येत होते.. त्यातून गाडी जाताना कारंजी उडत होती.........एल आकाराचे वळण घेऊन पुढे घाट उतरूनअंबाडेत आलो.पाउस कमी होवून अचानक ऊन पडतं होतं .बल्वडी नेरे करत भोर मध्ये पोहोचलो.चौपाटीत मधोमध श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा.अभिवादन करून महाड रस्त्याला लागलो..... ऐतिहासिक मावळमुलूख छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी राजगड व इतर अनेक गडकिल्ले. अनेक ऐतिहासिक गावे भोर,कारी आंबावडे त्यापैकी "भोर " हे संस्थानिकांचे गांव तेथील राजवाडा,भाटघर धरण व नेकलेस पाॅईंट प्रेक्षणिय आहेत.माजी मंत्री श्री अनंतराव थोपटे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी "राजगड ज्ञानपीठ"ची स्थापना केलीय.
वेनवडीजवळील हॉटेल मध्ये अल्पोपहार घेऊन आंबेघर ,चिखलावडे ,नौटंबी करुन आंबावड्यातील झुलता पूल पाहिला..ओढा खळाळत वहात होता.पुलावरुन चालताना प्रथम जाणवलेली भिती पुढे जात जात कमी झाली.....मग पुढे कोरले गावातून ओहळीला पोहोचलो... रायरेश्वराच्या पायथ्याचं गावं,पावसाचं आगर,वाईतलं एकटच गावं...........जर्किन असुनही कपडे ओलेचिंब झाले होते... पाऊसाने थोडीशी उसंत घेतली .सर्वशिक्षा अभियानांतर्गत तेथील शिक्षकांशी चर्चा केली.मुलांशी शेअरिंग केले.तिथे तेव्हा श्री नेताजी कंक व श्री सागर नेवसे शिक्षक होते.सरांनी बनविलेला चहा कुंद वातावरणात पिल्याने तरतरी आली.... गाव गर्द झाडीत असल्याने जवळ गेल्यावरच नजरेस पडते.तडवी सर म्हणाले ,येथून पुढे सरळवर केंजळगडाच्या कड्याखाली याच गावाची पाकिरे वस्ती आहे.तिथं "वस्तीशाळा" असून श्री धर्मेंद्र दीक्षित सर आहेत.पाऊस कमी झाला होता म्हणून दादा आणि मी बाहेर येऊन गाव बघितलं..... ओली माती, हिरवी शेती, निसर्ग जपतो नातीगोती...थोड्या वेळाने शाळेत गेलो.शिक्षकांनी आमच स्वागत केले.आदारातिथ्य केले..... शिक्षकांचे कौतुक करून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली..... भोर मधील संजयनगरला गेलो.तिथं माझे मित्र श्री प्रविण वाडकर यांच्या कडे माझा मुलगा हर्षद अकरावी सायन्स शिकत होता.त्याच्याशी घरगुती गप्पा मारून मित्रांच्या ओळखी करून दिल्या. निरोप घेऊन चौपाटी,भोरघाट करत मांढरदेव कडे मार्गस्थ झालो.परतीच्या वाटेवरती पावसाची बरसात सुरूच होती. आज थुईथुई,रिपरिप , संततधार व अचानक वाऱ्याबरोबर येणारा विविध रुपातला पाऊस अनुभवला..... दिवसभर निसर्गाच्या सान्निध्यात राहून मनाला गारवा मिळाला.सुरेख निसर्गाचे दर्शन झाले.मित्रांमुळे प्रथमच भोरघाट व तालुक्यातील दुर्गम ओहळी गाव व शाळा पहायला मिळाली.... धन्यवाद दोस्तो🙏🏻
"पावसात भिजताना पाऊस झेलीत झेलीत जावे,आपण कितीही कोरडे असलो तरी पाण्यासारखं व्हाव.!" प्रतिक सोमवंशीच्या कवितेने आज पावसाची नवीन ओळख करून दिली....
🍀🌿🌿🍀🌿🍀🌿🍀
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
क्रमशः भाग बारावा.
Comments
Post a Comment