जीवनशैली गौरव समारंभ रोटरी
Lifestyle जीवनशैली
https://m.facebook.com/story.php?story_fbid=972151402981784&id=100005607998282
सिंहावलोकन
कोंढावळे ते कोंढावळे व्हाया अभेपुरी
आज 31 जानेवारी माझ्या प्राथमिक शिक्षकाच्या नोकरीस 30 वर्षे पूर्ण झाली .मागे वळून पाहताना अनेक सुखदुखाचे प्रसंग नजरेसमोरून जातात.नोकरीची सुरुवात खानापूर शाळेत झाली. तेथून सहा महिन्यातच कोंढावळे प्राथमिक शाळेत बदली झाली. ख-या अर्थाने नोकरी आणि सेवेतील फरक कोंढावळे येथे गेल्यावरच लक्षात आला
१९८९ ते१९९९ अशी सलग दहा वर्षे मुख्य अध्यापक म्हणून होते.
शाळेतील अनेक अडचणीवर मात करून एकशिक्षकी शाळा सातवीपर्यत करून बहुशिक्षकी केली.गावक-यांना पटवून प्रसंगी अनेकांचा रोष पत्करून शाळा नावारूपाला आणण्यासाठी सर्वांचे सहकार्य घेतले.
गावातील सर्वांना भजन -किर्तनाची आवड असल्याने लोकसहभागातून विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम, सहल,सहभोजन,संगीत परिपाठ,लेझीमपथक,विविध स्पर्धा ,शैक्षणिक उठाव व रात्र अभ्यासिका असे उपक्रम राबवून शाळेची गुणवत्ता व लौकिक वाढवण्यासाठी प्रयत्न केले.नवनवीन प्रयोग करण्याची संधी मला प्राप्त झाली.
शाळेच्या समोर आल्यानंतर दहा वर्षातील अनेक सुखद दु:खद प्रसंग आठवले.ख-या अर्थी हितेच माझी खरी जडण घडण झाली.खरा सुर इथेच सापडल्यामुळे अनेक उपक्रम राबविता आले.चिकित्सा केल्याने अनेक उपक्रमाच्या माहितीचे उपयोजन करता आले.
त्यातुन नेमकेपणा समजला.
पहिली एकच वर्ग असणारी इमारत आज आठ भव्य वर्गखोल्या झालेल्या आहेत.याचे सर्वश्रेय गावक-यांचे , ग्रामशिक्षण समिती व पालकांचे आहे.
30 वर्षाच्या सेवेसाठी अनेक शिक्षकमित्र,सहकारी शिक्षक,केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्याशी असणाऱ्या स्नेहा मुळे शैक्षणिक संस्काराची शिदोरी मला अनेक प्रसंगात वेळोवळी फार उपयोगी पडली.विद्यार्थी माझे दैवत मानुन सेवा करत आहे..त्यापैकी काहीजण विविध क्षेत्रातील नामांकित नोकरीत व व्यवसायात आहेत.. बहुतांशी शेतकरी, ड्रायव्हर, व्यापारी, इंजिनिअर व माथाडी कामगार आहेत.
मुले ओळख ठेवून आपल्याशी हितगुज करतात. हाच खरा पुरस्कार मिळाल्याची धन्यता वाटली.
10 वर्षानंतर जायुगडेवाडी येथे द्विशिक्षिकी शाळेत बदली झाली.गावातील शाळा त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असताना इयत्ता पहिली आदर्श वर्ग स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम ,बोलक्या भिंती इत्यादी उपक्रम राबविले. तेथून 3 वर्षांनी ओझर्डे येथे बदली झाली. लगेचच दीडवर्षात सर्व शिक्षा अभियान पर्यायी शिक्षण साधनव्यक्ती म्हणून तालुका स्तरावर काम करण्याची संधी मिळाली. शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या नियमित प्रवाहात आणण्यासाठी असणाऱ्या योजनांचा उपयोग केला.कार्यालयात काम करताना अनेक प्रश्नांची उकल कशी करावी. लोकसहभागातून वंचित घटकातील मुलांना अनेक संस्थाकडून शैक्षणिक मदत मिळवून दिली. विविध विषयांचे प्रशिक्षण घेवून जिल्हा स्तरीय मार्गदर्शक म्हणून काम केले.
वरिष्ठ मुख्याध्यापक म्हणून 2 फेब्रुवारी 2010 रोजी अभेपुरी प्राथमिक शाळेत नियुक्ती झाली.आठ वर्षाच्या काळात शाळेचे रूपड बदललं. 3 लाखाच्या लोकसहभागातून डिजिटल शाळा,भौतिक सुविधा,हायटेक कार्यालय,वृक्षारोपण,सुसज्ज विद्यार्थी ग्रंथालय, स्नेहसंमेलन, रचनावाद,संगणक प्रशिक्षण,ISO मानांकन प्राप्त शाळा,शाळासिध्दी अ श्रेणी ,शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमात दर्जेदार काम व ज्ञानरचनावाद पध्दतीने अध्ययन अनुभवामुळे राज्यातील अनेक शिक्षकांनी शाळेस भेट देवून प्रशंसा केली. तदनंतर प्रशासकीय बदलीने पुन्हा कोंढावळे येथे 19 मे रोजी हजर झालो. बहुतांश मुले विद्यार्थी पालकांचीच आहेत. येथेही नवोपक्रम ,सुसज्ज कार्यालय ,प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम विविध तंत्राचा वापर करून गुणवत्ता धारक विद्यार्थी करणे,लोकसहभागातून शाळासमृध्दी,व विविध नवोपक्रम राबवणूक चालू आहे.
🌹🌹🌹🌹🌹🌹
सलाम माझ्या शाळांना,पालकांना आणि माझ्या विद्यार्थी मित्रांना आणि माझ्या सर्व शिक्षकमित्रांना
शब्दांकन श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई

Comments
Post a Comment