माझी भटकंती रायरेश्वर ओहळी मांढरदेव भाग - तेरा ते सोळा
माझी भटकंती
🌴⛰️माझी भटकंती⛰️🌴
✒️क्रमश:भाग तेरा
🏝️⛵🛶⛵🛶⛰️🌴⛰️
✳️ ओहळी- भोरघाट-मांढरदेव ते वाई
भ्रमंती- २ ऑक्टोंबर २०१९
➿➿➿➿➿➿➿➿
घेराकेंजळ घाटरस्ता ते गायदरा
कोंढावळे प्राथमिक शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न करुन सहकारी शिक्षक श्री सुनील जाधव सरांबरोबर वाईस दुचाकीवरून निघालो.जांभळीपुलावर आल्यावर सरांना विचारले,काल ठरविल्याप्रमाणे आत्ता ओहळी,भोर मांढरदेव करून जावूया का वाईला !
त्यांचा होकार येताच मी म्हणालो,पुढे माचीच्या स्टॉपवर थांबूया....
सरांनी गाडी बरोबर ओहळी 13 KM असं लिहलेल्या झाडाजवळ थांबविली. दोघांनी घरी फोन करून उशिरा येण्याचे कारण सांगितले.आणि गाडी घेराकेंजळ घाटाला लागली........ साधारणपणे दहावर्षापुर्वि झालेल्या डांबरीरस्त्याने जोर व भोर खोरे एकमेकांच्या जवळ आले होते.लोकांच प्रवास सुलभ झाला. यापुर्वी लोकं वहाणाने तालुक्याच्या गावी जाऊन मांढरदेव किंवा हायवेच्या मार्गाने इच्छितस्थळी पाहुण्याकडे जात.अथवा डोंगरदऱ्यातील वाटेने जात असत.
....चढण आणि वळणावळणाच्या रस्त्याने आम्ही घेराकेंजळ शाळेजवळ पोहोचलो.... गडाच्या कड्याखालच्या माचीवर लांब लांब घरे असणारी वस्ती . चार वर्षांपूर्वी अभेपुरी शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांना ज्ञानरचनावाद पध्दतीने प्रगत शाळेला भेट देण्यासाठी घेवून आलो होतो..त्यावेळी तिथं श्री रामदास जाधव व श्री महेश बडे सर होते.
केंजळगडाच्या कड्याखालील माचीवर छोटीसी चौधरी वस्ती त्यापुढे वाडकर वस्ती व पायथा वस्ती करत करत जांभळीखिंड,श्वानदरा व गायदरा ही स्थानिक नावे असलेल्या खिंडीत पोहोचलो.... डिसेंबर व जुलैत रायरेश्वरला आलेल्या रम्य आठवणी ताज्या झाल्या.रायरेश्वरातून दरवर्षी पायी दिंडी पंढरीला जाते. तिथं भेटलेल्या आजोबांनी ही माहिती दिली.कारण त्यांच्याकडे ओझं होतं व घरी कुणाला तरी बोलावण्यासाठी फोन लावा म्हणले होते........
नवरात्राचे दिवस होते.आकाश निळसर डोंगर हिरवे तर गवत हिरवे पिवळे दिसते होते.रायश्वेराच्या शिडीजवळील धबधबापांढऱ्या धारेसारखा नजरवेधून घेत होता.लाल पिवळी गुलाबी रंगछटेची गवतफुले ठिकठिकाणी दिसत होती. जणूकाही नवरात्रात देवीचे स्वागत निसर्ग फुलांनी करतोय.. दिवाळीत तर याभागात भटकंतीला भरपूर गर्दी असते...हौशी व साहसी पर्यटक तर रायरेश्वर ते रायगड , रायरेश्वर ते महाबळेश्वर असे ट्रेक करतात.सह्याद्रीच्या महादेव डोंगर रांगेचे विलोभनीय दृश्य चमकदार ऊनात मनमोहक दिसत होते.
सिनचे फोटो काढत,सेल्फि काढत तिथून दिसणारी आमची शाळा,मुरा,भोरपरिसर, धरणाचे दृश्य व विविध डोंगररांगा पहात चर्चा करत होतो.... घाटमाथ्यावर एकाबाजूला रायरेश्वर दुसऱ्या बाजूला केंजळगड एकमेकांच्या संगतीने दिसतो.रायरेश्वर पुण्यात तर केंजळगड साताऱ्यात, या भौगोलिक सीमां मर्यादित असल्यातरी इतिहास हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ,"स्वराज्याची शपथ". या ऐतिहासिक प्रसंगांचा गड साक्षीदार आहेत. इतिहास सीमाबध्द कधीही नसतो.
घाटातील उताराने एक-दोन ठिकाणी छोटेखानी धबधबे पहात वळणावळणाच्या रस्त्याने पाकिरेवस्तीच्या फाट्याजवळ आलो.वस्ती केंजळगडाच्या उत्तरेला कड्याखाली आहे. पर्यायी साधनव्यक्ती म्हणून डेप्युटेशनवर असताना इथं आलो होतो. त्यावेळची माहिती सरांना सांगत पुढे निघालो. . दुर्गम भागातील पाकिरेवस्तीच्या वस्तीशाळेत व ओहळीस समन्वयक श्री नागनाथ शिवशरण सरांसोबत आलो होतो.पाकिरेवस्ती शाळेत श्री धर्मेंद्र दीक्षित वस्तीशाळा स्वयंसेवक होते.ते वडवली ते पाकिरेवस्ती असा प्रवास रस्ता नसताना करायचे.
ओहळी प्राथमिक शाळेत शैक्षणिक कामानिमित्त सर्व शिक्षा अभियानांतर्गत साधनव्यक्ती समवेत व केंद्रप्रमुखांसोबत आलो होतो. तेव्हा श्री नेताजी कंक सर व श्री सागर नेवसे सर तिथं होते.
दिनांक २० एप्रिल २०२०
माझी भटकंती
ओहळी ते आंबावडे
रायरेश्वरगडाच्या पायथ्याला आल्यावर तुरळक प्रमाणात भात शेती व नाचणीची शेती दिसतं होती. भाताच्या ओंब्या शिस्त होत्या. रायरेश्वराच्या पायथ्याशी व भोर तालुक्याच्या सीमेवरील ओहळी गावात पोहोचलो.दुर्गम भागात वाई तालुक्यातील एकमेव गाव कारण जवळील कारी, चिखलगाव,कोरलं व इतर गावे भोर तालुक्यात .याच नवल वाटले.झाडीत वस्ती असल्याने जवळ गेल्यावरच दिसते.उतरत्या व टप्प्या सारखी वस्तीत विरळ घर होती.या गावास रोटरी क्लब पुणे व वाईने पिण्याच्या पाण्याची योजना केली आहे.(विहीर सोलर पंप ) तसेच लोकांची आर्थिक उन्नती व्हावी म्हणून महिलांना शेळीपालनाचा पूरक उद्योग उपलब्ध करून दिला आहे.मंदिराजवळच शाळा आहे.शाळा पाहून मग पुढे जावूया.असं जाधव सरांना म्हणालो. गाडी थांबली.पायऱ्या चढून प्रवेशद्वारावर दोघे पोहचलो.पहातोय तर काय गेट उघडे होते.कुतूहल म्हणून तसेच पुढे गेलो.तर श्री नवनाथ मालुसरे व सौ वैशाली मालुसरे(शिंगटे) हे शिक्षक दांपत्य दुपारी १ वाजताही विद्यार्थी केंद्रित पध्दतीने मुलांना शैक्षणिक अनुभव देत होते.
बाह्यांग रेखाटन सुबक व रेखीव दिसले. रंगकामाचे फोटो काढले.शिक्षकांशी व मुलांशी शाळेविषयी गप्पा मारल्या.रंगकामाची माहिती घेतली.सर्वाचा समूहफोटो घेतला.मुलांना खाऊ दिला व निरोप घेऊन पुढील प्रवासाला निघालो.
गावच्या सीमेवरील ओढ्या जवळ आलो.तिथल्या पाणीपुरवठा स्कीम व सोलर किटची पाहणी केली.मग पुढे कोर्ले ,वडतुंबी व म्हाकोशी गावातून आंबावडे गावात आलो.भोरसंस्थानच्या पंतसचिवांचे ऐतिहासिक गाव आहे.जवळच्या ओढ्यावर झुलता पूल असून त्याच्या दोन्ही बाजूला कमानी असून त्यावर मराठी व इंग्रजीत बांधकामाचा तपशील आहे, पुलावरून पुढे गेल्यावर पंतसचिववाडा आहे तेथून पुढे मोठाल्या झाडांच्या सावलीतून पायऱ्या उतरत नागेश्वर मंदिरात गेलो.मंदिर जोत्यावर बांधले आहे.प्रवेशद्वार पश्चिमाभिमुख आहे.आत कमळ व पानांची नक्षी कोरलेली आहे.शांत व रमणीय ठिकाण आहे.मंदिराच्या जवळ सभागृह आहे.तिथे गोमुख आहे.मंदिराशेजारील ओढा धबधब्याप्रमाणे वाहत होता. गावात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक जिवा महाले यांची समाधी आहे.त्यांनी प्रतापगडच्या रणसंग्रामात शौर्यगाथा गाजविली होती.त्यांचे मूळगांव वाई तालुक्यात कोंढवली येथे आहे.स्वामीनिष्ठ सरदार कान्होजी जेधे यांचीही समाधी तिथंआहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मावळातील अनेक सरदारांचा स्वराज्यासाठी पाठिंबा मिळवून देण्यात सहकार्य केले होते. जवळच नाझरे गांव आहे.रस्त्याच्या दोन्ही बाजूला भगव्या रंगाची फुले पाहून वेगळीच छटा दिसत होती .तेथून नोटंबी,चिखलावडे,आंबेघर करत वेनवडीला(महाड-भोर रस्ता)आलो.मित्राला फोन करायची आठवण जाधव सरांनी केली.संजयनगर भोर येथे रहाणारे श्री प्रविण वाडकर यांना फोन केला.ते पुण्यात होते.कधी निघणार आहे विचारल्यावर गाडीतच बसलोय.दोन तासात येईन.मग सरांना बोललो, आपण भाटघर धरणाकडे जाताना चांगलं हाॅटेल पाहून जेवण करुया.संजयनगरवरून भोर स्टॅडवर आलो. पानपट्टी जवळ गाडी थांबवून एकाला धरणाकडे जायला रस्ता कुठून आहे, असे विचारले.त्याने पुलावरून पलीकडे सरळ जावा असं सांगितले.मग पलीकडे जावून भोर -कापुरहोळमार्गे पुणे रस्त्याने पुढे निघालो.चांगल हाँटेल दिसतयका याकडे लक्ष देत पुढे जात होतो.काहीवेळाने वाटेवरील एका हॉटेलमध्ये थांबलो.शाकाहारी थाळीचा आस्वाद घेतला. कॅशिअरला बिल देताना नेकलेस पाॅईंट याच रस्त्याला आहे का याची खातरजमा केली.
दिनांक २१ एप्रिल २०२०
पुढे रस्त्यानेच जाताना काही वेळाने भाटघर धरण दिसू लागले.. सरांनी गाडी पार्क केली.आम्ही भाताच्या खाचरावरील बांधावरून चढत उतरत काठावर गेलो.पर्यटकांची गर्दी होती. हौशी लोक धरणाचे मनमोहक दृश्य मोबाईल मध्ये विविध पोजमध्ये स्वत:सह धरणाला टिपत होते.भाटघर धरण ब्रिटीश काळातील असून तोडीच्या दगडीचे बांधकाम आहे.यावर्षी अतिवृष्टीमुळे धरण भरले होते.सांडव्यावरुन वहाणारं पांढरेशुभ्र पाणी, नदी पात्रात प्रवाहीत होतं होतं, ते आविष्कार पहाण्यासाठी आबालवृदध नदीच्या काठावरून आत जाऊन फोटो काढत होते.
आम्हीही काठावर जाऊन फोटोग्राफीची हौस भागवली....मग पुढे नेकलेस पाॅईंट कडे निघालो.इंगवलीला जाणारा रस्ता दिसला म्हणून सरांनी गाडी थांबवली.इथून जवळच सुपरस्टार अष्टपैलू विनोदी अभिनेते दादा कोंडके यांचे गाव. रस्ता उतरून खाली आलो..नीरा नदीच्या प्रवाहाचा सुंदर आविष्कार दिसत होता....स्त्रीयांचा आवडता दागिना 'नेकलेस' सारखे दृश्य पाहून आनंदित झालो.जवळच असणाऱ्या टोलेजंग दगडावर उभे राहून फोटे काढले.खरोखरच अप्रतिम दृश्य.बऱ्याच दिवसांनी पाॅईंट पहाण्याचा योग आला..अनेक मराठी हिंदी चित्रपट व मालिकांचे चित्रण इथं झालेलं आहे.मनाला भुरळ घालणारे विलोभनीय दृश्य.सुपर रिव्हर व्ह्यू.
काहीवेळाने परत त्याच मार्गाने भाटघर गावात गेलो... तिथं धरणाच्या फुगवट्याकडे कसं जायचं याची चौकशी एका घराजवळ गाडी थांबवून केली..असंच पुढे जावा आणि खालच्या रस्त्याला वळा.असं एका बाईने सांगितले.व आम्हाला विचारले,'कुठलं गाव तुमचं 'सर म्हणाले ,वाईचे आहोत.त्यावर बाई म्हणाल्या ,"आमच्याच भागातलं हायकी तुमी."
वाई-खंडाळा - महाबळेश्वर विधानसभा मतदार संघातील पहिलं गाव मतदान केंद्र क्रमांक १ लक्षात आले.बाईने सांगितलेल्या मार्गाने आम्ही येसाजी कंक जलाशयाकडे गेलो.पाण्याच्या बाजूची धरणभिंत पाहिली.पलीकडून पाणलोट क्षेत्रात जाणारा रिंगरोड दिसत होता.पण या बाजूला भाटघर पर्यतच रस्ता दिसत होता त्यापुढे डोंगर.." येसाजी कंक"जलाशय पाहून परत भोरात आलो.मित्राला फोन केला.तो घरी आल्याचे समजताच संजयनगरमध्ये त्याच्या घरी गेलो.गप्पागोष्टी झाल्या.यांच्याकडे हर्षद अकरावी बारावी शिकायला होता ,हे जाधव सरांना सांगितले. मित्र श्री प्रविण वाडकर यापुर्वी ओझर्ड्याला पशुवैद्यकीय विभागात होते.आता ते आंबेघरला आहेत .तेव्हापासून ओळखीचे.....जेवण झालय का त्याने विचारले आमच जेवण झालंय असं सांगितलं .."शाळा सुटल्यावर रायरेश्वर ओहळी- करून मांढरदेव मार्गे जावूया म्हणून इथं आलोय नेकलेस पाॅईंट,भाटघर धरण पाहिलं "खुशाली विचारत गप्पा सुरू झाल्या.. भोर गावातील ठिकाण,विधानसभा निवडणुकीचा काळ असल्याने .. राजकीय वातावरणावर कुणाचं पारडं जड ,कोण निवडून येणार, तुमच्या कडे कसं आहे यावर गप्पागोष्टी झाल्या..सरबत घेतल्यावर मित्राचा निरोप घेतला.
➿➿➿➿➿➿➿
दिनांक २२ एप्रिल२०२०
🌴⛰️ माझी भटकंती🌴⛰️
✒️क्रमश:भाग सोळा
🏝️⛵🛶⛵🛶⛰️🌴⛰️
✳️ ओहळी- भोरघाट-मांढरदेव ते वाई
भ्रमंती- २ ऑक्टोंबर २०१९
➿➿➿➿➿➿➿➿
भोरघाट व वेरुळी
〰️➿〰️➿〰️➿〰️➿
संजयनगरवरून भोर चौपाटीवर आलो.श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशी नतमस्तक झालो.मग भोर वरून नेरे,बलवडी करत अंबाडे गावाजवळ आलो. भोरघाट सुरू झाला. सरळ चढणाच्या अवघड घाटावाटेने मांढरदेव कडे प्रवास सुरू झाला.. पहिल्या वळणानंतर एका धबधब्या जवळ थांबून फोटो काढले.छोटासा पण सुंदर धबधबा दिसला.ऑक्टोंबरातही प्रवाहित दिसला त्याचे नवल वाटले.सरळच दोन -एक किमीचे उभं चढण पार केले. हवेतील गारवा जाणवू लागला. होतो.घाटरस्त्याच्या यु टर्न जवळ गाडी बाजूला थांबवली..व तेथून रमणीय भोर परिसरातील गावे , दुरून दिसणाऱ्याडोंगर दऱ्या व शेतं हे निसर्ग वैभव पहात होतो.. तेथून पुढे घाटमाथ्यावर आलो.वेरुळीचा रस्ता दिसला तेव्हा आम्ही गेल्या वर्षी २६ जानेवारीला वेरुळी व डुईचीवाडीला गेल्याची आठवण आली..... मांढरदेव वरून सोमेश्वरवाडी,वेरुळी पठारावरून दोन्हीकडील परिसर पहात होतो.... आता रस्त्याने वाडीपर्यत चारचाकी वाहने जातात..पठारावरील कडा उतरून वाडीत गेलो होतो.वाडीच्या सुरुवातीलाच एका बंगल्याचे रंगकाम सुरू होते तिथच रस्त्यात थांबलो . येथील आमचे मित्र श्री लक्ष्मण शंकर कोंढाळकर यांना फोन केला.वाडीला आलोय कुठंय तुम्ही.त्याला खरे वाटेना म्हणून,गावात प्रवेश करताना पहिल्याच घराजवळ आहे.असं सांगितल्यावर खात्री झाली.चहापान करायला घरीजावा असं आवर्जून बोलले.... फोन चालू असतानाच पेंटरने जाधव सरांना ओळखून हाक मारली .आम्ही घराजवळ गेल्यावर त्याचा दुसरा जोडीदार माझ्या ओळखीचा निघाला.चौकशी करत,रंगकाम बघत असताना घरमालक आले.आमची विचारपूस केली..श्री धोंडेघरमालकांनी बंगला फिरून दाखवला..कड्याच्या खाली सुंदर लोकेशनवर बंगला बांधला आहे...रंगकामाची रंगसंगती सुरेख होती.त्याने आम्हाला चहा दिला.वाडी बरोबरच मांढरदेव पठारावरील चनुरा पावटा प्रसिद्ध आहे..त्याच कालवण इतर वानापेक्षा चवदार लागते. या आठवणीवर गप्पा करत घाटमाथ्यावरुन वाईकडे निघालो.... आता थंडी वाजायला सुरुवात झाली....घाट उतारायला लागलो........ वाटेतल्या धबधब्याजवळ चांगलीच गर्दी होती.प्रत्येकजण सायंकाळचा धबधब्याचे मनमोहक दृश्य मोबाईल मध्ये टिपत होता.ओंजळीत पाणी धरून,हात घालून, नृत्याची पोज घेत फोटोसेशन चालले होतं.आमाला फोटो काढायला स्पॉट दिसतोय का? याचा शोध घेत होतो.....योग्य स्पॉटवर आम्ही फोटो काढले....
तदनंतर घाटातील मालवाठार या भागात गाडी थांबवून चालत उजवीकडे गेलो.. .... सांजवेळ धोम धरण अन् डोंगररांगा व पायथ्याची छोटी छोटी गावं यांचा विलोभनीय आविष्कार दिसत होता.एका अनामिक कवीने
" क्षितीजावरून ओसांडली
सोनेरी स्वप्नांची रास
विटले बंध सारे
या सांजेच्या सहवासात.....
हेच दृश्य डोळेभरून पाहून आजच्या भटकंतीची सांगता केली. तिथून घाटरस्त्याने गुंडेवाडी,धावडी बोपर्डी करत वाईत पोहोचलो.... रायरेश्वरापासून सुरू झालेल्या डोंगररांगेच्या कधी पायथ्याशी,कधी माचीवर ,कधी घाटात,तर कधी घाटमाथ्यावर होतो.आज निसर्गाच्या सानिध्यातच फिरत होतो.
🌴🌳🍀🌴🌴🌴🌴🌴
क्रमशः भाग पंधरा
दिनांक२३ एप्रिल २०२०
श्री रविंद्र लटिंगे, ओझर्डे वाई
दिनांक २३ एप्रिल२०२०
🌴⛰️माझी भटकंती⛰️🌴
✒️क्रमश:भाग तेरा
🏝️⛵🛶⛵🛶⛰️🌴⛰️
✳️ ओहळी- भोरघाट-मांढरदेव ते वाई
भ्रमंती- २ ऑक्टोंबर २०१९
➿➿➿➿➿➿➿➿
घेराकेंजळ घाटरस्ता ते गायदरा
कोंढावळे प्राथमिक शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न करुन सहकारी शिक्षक श्री सुनील जाधव सरांबरोबर वाईस दुचाकीवरून निघालो.जांभळीपुलावर आल्यावर सरांना विचारले,काल ठरविल्याप्रमाणे आत्ता ओहळी,भोर मांढरदेव करून जावूया का वाईला !
त्यांचा होकार येताच मी म्हणालो,पुढे माचीच्या स्टॉपवर थांबूया....
सरांनी गाडी बरोबर ओहळी 13 KM असं लिहलेल्या झाडाजवळ थांबविली. दोघांनी घरी फोन करून उशिरा येण्याचे कारण सांगितले.आणि गाडी घेराकेंजळ घाटाला लागली........ साधारणपणे दहावर्षापुर्वि झालेल्या डांबरीरस्त्याने जोर व भोर खोरे एकमेकांच्या जवळ आले होते.लोकांच प्रवास सुलभ झाला. यापुर्वी लोकं वहाणाने तालुक्याच्या गावी जाऊन मांढरदेव किंवा हायवेच्या मार्गाने इच्छितस्थळी पाहुण्याकडे जात.अथवा डोंगरदऱ्यातील वाटेने जात असत.
....चढण आणि वळणावळणाच्या रस्त्याने आम्ही घेराकेंजळ शाळेजवळ पोहोचलो.... गडाच्या कड्याखालच्या माचीवर लांब लांब घरे असणारी वस्ती . चार वर्षांपूर्वी अभेपुरी शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांना ज्ञानरचनावाद पध्दतीने प्रगत शाळेला भेट देण्यासाठी घेवून आलो होतो..त्यावेळी तिथं श्री रामदास जाधव व श्री महेश बडे सर होते.
केंजळगडाच्या कड्याखालील माचीवर छोटीसी चौधरी वस्ती त्यापुढे वाडकर वस्ती व पायथा वस्ती करत करत जांभळीखिंड,श्वानदरा व गायदरा ही स्थानिक नावे असलेल्या खिंडीत पोहोचलो.... डिसेंबर व जुलैत रायरेश्वरला आलेल्या रम्य आठवणी ताज्या झाल्या.रायरेश्वरातून दरवर्षी पायी दिंडी पंढरीला जाते. तिथं भेटलेल्या आजोबांनी ही माहिती दिली.कारण त्यांच्याकडे ओझं होतं व घरी कुणाला तरी बोलावण्यासाठी फोन लावा म्हणले होते........
नवरात्राचे दिवस होते.आकाश निळसर डोंगर हिरवे तर गवत हिरवे पिवळे दिसते होते.रायश्वेराच्या शिडीजवळील धबधबापांढऱ्या धारेसारखा नजरवेधून घेत होता.लाल पिवळी गुलाबी रंगछटेची गवतफुले ठिकठिकाणी दिसत होती. जणूकाही नवरात्रात देवीचे स्वागत निसर्ग फुलांनी करतोय.. दिवाळीत तर याभागात भटकंतीला भरपूर गर्दी असते...हौशी व साहसी पर्यटक तर रायरेश्वर ते रायगड , रायरेश्वर ते महाबळेश्वर असे ट्रेक करतात.सह्याद्रीच्या महादेव डोंगर रांगेचे विलोभनीय दृश्य चमकदार ऊनात मनमोहक दिसत होते.
सिनचे फोटो काढत,सेल्फि काढत तिथून दिसणारी आमची शाळा,मुरा,भोरपरिसर, धरणाचे दृश्य व विविध डोंगररांगा पहात चर्चा करत होतो.... घाटमाथ्यावर एकाबाजूला रायरेश्वर दुसऱ्या बाजूला केंजळगड एकमेकांच्या संगतीने दिसतो.रायरेश्वर पुण्यात तर केंजळगड साताऱ्यात, या भौगोलिक सीमां मर्यादित असल्यातरी इतिहास हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ,"स्वराज्याची शपथ". या ऐतिहासिक प्रसंगांचा गड साक्षीदार आहेत. इतिहास सीमाबध्द कधीही नसतो.
घाटातील उताराने एक-दोन ठिकाणी छोटेखानी धबधबे पहात वळणावळणाच्या रस्त्याने पाकिरेवस्तीच्या फाट्याजवळ आलो.वस्ती केंजळगडाच्या उत्तरेला कड्याखाली आहे. पर्यायी साधनव्यक्ती म्हणून डेप्युटेशनवर असताना इथं आलो होतो. त्यावेळची माहिती सरांना सांगत पुढे निघालो. . दुर्गम भागातील पाकिरेवस्तीच्या वस्तीशाळेत व ओहळीस समन्वयक श्री नागनाथ शिवशरण सरांसोबत आलो होतो.पाकिरेवस्ती शाळेत श्री धर्मेंद्र दीक्षित वस्तीशाळा स्वयंसेवक होते.ते वडवली ते पाकिरेवस्ती असा प्रवास रस्ता नसताना करायचे.
ओहळी प्राथमिक शाळेत शैक्षणिक कामानिमित्त सर्व शिक्षा अभियानांतर्गत साधनव्यक्ती समवेत व केंद्रप्रमुखांसोबत आलो होतो. तेव्हा श्री नेताजी कंक सर व श्री सागर नेवसे सर तिथं होते.
दिनांक २० एप्रिल २०२०
माझी भटकंती
✒️क्रमश:भाग चौदा
🏝️⛵🛶⛵🛶⛰️🌴⛰️
✳️ ओहळी- भोरघाट-मांढरदेव ते वाई
भ्रमंती- २ ऑक्टोंबर २०१९
➿➿➿➿➿➿➿➿
ओहळी ते आंबावडे
बाह्यांग रेखाटन सुबक व रेखीव दिसले. रंगकामाचे फोटो काढले.शिक्षकांशी व मुलांशी शाळेविषयी गप्पा मारल्या.रंगकामाची माहिती घेतली.सर्वाचा समूहफोटो घेतला.मुलांना खाऊ दिला व निरोप घेऊन पुढील प्रवासाला निघालो.
गावच्या सीमेवरील ओढ्या जवळ आलो.तिथल्या पाणीपुरवठा स्कीम व सोलर किटची पाहणी केली.मग पुढे कोर्ले ,वडतुंबी व म्हाकोशी गावातून आंबावडे गावात आलो.भोरसंस्थानच्या पंतसचिवांचे ऐतिहासिक गाव आहे.जवळच्या ओढ्यावर झुलता पूल असून त्याच्या दोन्ही बाजूला कमानी असून त्यावर मराठी व इंग्रजीत बांधकामाचा तपशील आहे, पुलावरून पुढे गेल्यावर पंतसचिववाडा आहे तेथून पुढे मोठाल्या झाडांच्या सावलीतून पायऱ्या उतरत नागेश्वर मंदिरात गेलो.मंदिर जोत्यावर बांधले आहे.प्रवेशद्वार पश्चिमाभिमुख आहे.आत कमळ व पानांची नक्षी कोरलेली आहे.शांत व रमणीय ठिकाण आहे.मंदिराच्या जवळ सभागृह आहे.तिथे गोमुख आहे.मंदिराशेजारील ओढा धबधब्याप्रमाणे वाहत होता. गावात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक जिवा महाले यांची समाधी आहे.त्यांनी प्रतापगडच्या रणसंग्रामात शौर्यगाथा गाजविली होती.त्यांचे मूळगांव वाई तालुक्यात कोंढवली येथे आहे.स्वामीनिष्ठ सरदार कान्होजी जेधे यांचीही समाधी तिथंआहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मावळातील अनेक सरदारांचा स्वराज्यासाठी पाठिंबा मिळवून देण्यात सहकार्य केले होते. जवळच नाझरे गांव आहे.रस्त्याच्या दोन्ही बाजूला भगव्या रंगाची फुले पाहून वेगळीच छटा दिसत होती .तेथून नोटंबी,चिखलावडे,आंबेघर करत वेनवडीला(महाड-भोर रस्ता)आलो.मित्राला फोन करायची आठवण जाधव सरांनी केली.संजयनगर भोर येथे रहाणारे श्री प्रविण वाडकर यांना फोन केला.ते पुण्यात होते.कधी निघणार आहे विचारल्यावर गाडीतच बसलोय.दोन तासात येईन.मग सरांना बोललो, आपण भाटघर धरणाकडे जाताना चांगलं हाॅटेल पाहून जेवण करुया.संजयनगरवरून भोर स्टॅडवर आलो. पानपट्टी जवळ गाडी थांबवून एकाला धरणाकडे जायला रस्ता कुठून आहे, असे विचारले.त्याने पुलावरून पलीकडे सरळ जावा असं सांगितले.मग पलीकडे जावून भोर -कापुरहोळमार्गे पुणे रस्त्याने पुढे निघालो.चांगल हाँटेल दिसतयका याकडे लक्ष देत पुढे जात होतो.काहीवेळाने वाटेवरील एका हॉटेलमध्ये थांबलो.शाकाहारी थाळीचा आस्वाद घेतला. कॅशिअरला बिल देताना नेकलेस पाॅईंट याच रस्त्याला आहे का याची खातरजमा केली.
दिनांक २१ एप्रिल २०२०
माझी भटकंती
✒️क्रमश:भाग पंधरा
🏝️⛵🛶⛵🛶⛰️🌴⛰️
✳️ ओहळी- भोरघाट-मांढरदेव ते वाई
भ्रमंती- २ ऑक्टोंबर २०१९
➿➿➿➿➿➿➿➿
भाटघर धरण व नेकलेस पाॅईंट
आम्हीही काठावर जाऊन फोटोग्राफीची हौस भागवली....मग पुढे नेकलेस पाॅईंट कडे निघालो.इंगवलीला जाणारा रस्ता दिसला म्हणून सरांनी गाडी थांबवली.इथून जवळच सुपरस्टार अष्टपैलू विनोदी अभिनेते दादा कोंडके यांचे गाव. रस्ता उतरून खाली आलो..नीरा नदीच्या प्रवाहाचा सुंदर आविष्कार दिसत होता....स्त्रीयांचा आवडता दागिना 'नेकलेस' सारखे दृश्य पाहून आनंदित झालो.जवळच असणाऱ्या टोलेजंग दगडावर उभे राहून फोटे काढले.खरोखरच अप्रतिम दृश्य.बऱ्याच दिवसांनी पाॅईंट पहाण्याचा योग आला..अनेक मराठी हिंदी चित्रपट व मालिकांचे चित्रण इथं झालेलं आहे.मनाला भुरळ घालणारे विलोभनीय दृश्य.सुपर रिव्हर व्ह्यू.
काहीवेळाने परत त्याच मार्गाने भाटघर गावात गेलो... तिथं धरणाच्या फुगवट्याकडे कसं जायचं याची चौकशी एका घराजवळ गाडी थांबवून केली..असंच पुढे जावा आणि खालच्या रस्त्याला वळा.असं एका बाईने सांगितले.व आम्हाला विचारले,'कुठलं गाव तुमचं 'सर म्हणाले ,वाईचे आहोत.त्यावर बाई म्हणाल्या ,"आमच्याच भागातलं हायकी तुमी."
वाई-खंडाळा - महाबळेश्वर विधानसभा मतदार संघातील पहिलं गाव मतदान केंद्र क्रमांक १ लक्षात आले.बाईने सांगितलेल्या मार्गाने आम्ही येसाजी कंक जलाशयाकडे गेलो.पाण्याच्या बाजूची धरणभिंत पाहिली.पलीकडून पाणलोट क्षेत्रात जाणारा रिंगरोड दिसत होता.पण या बाजूला भाटघर पर्यतच रस्ता दिसत होता त्यापुढे डोंगर.." येसाजी कंक"जलाशय पाहून परत भोरात आलो.मित्राला फोन केला.तो घरी आल्याचे समजताच संजयनगरमध्ये त्याच्या घरी गेलो.गप्पागोष्टी झाल्या.यांच्याकडे हर्षद अकरावी बारावी शिकायला होता ,हे जाधव सरांना सांगितले. मित्र श्री प्रविण वाडकर यापुर्वी ओझर्ड्याला पशुवैद्यकीय विभागात होते.आता ते आंबेघरला आहेत .तेव्हापासून ओळखीचे.....जेवण झालय का त्याने विचारले आमच जेवण झालंय असं सांगितलं .."शाळा सुटल्यावर रायरेश्वर ओहळी- करून मांढरदेव मार्गे जावूया म्हणून इथं आलोय नेकलेस पाॅईंट,भाटघर धरण पाहिलं "खुशाली विचारत गप्पा सुरू झाल्या.. भोर गावातील ठिकाण,विधानसभा निवडणुकीचा काळ असल्याने .. राजकीय वातावरणावर कुणाचं पारडं जड ,कोण निवडून येणार, तुमच्या कडे कसं आहे यावर गप्पागोष्टी झाल्या..सरबत घेतल्यावर मित्राचा निरोप घेतला.
➿➿➿➿➿➿➿
दिनांक २२ एप्रिल२०२०
🌴⛰️ माझी भटकंती🌴⛰️
✒️क्रमश:भाग सोळा
🏝️⛵🛶⛵🛶⛰️🌴⛰️
✳️ ओहळी- भोरघाट-मांढरदेव ते वाई
भ्रमंती- २ ऑक्टोंबर २०१९
➿➿➿➿➿➿➿➿
भोरघाट व वेरुळी
〰️➿〰️➿〰️➿〰️➿
संजयनगरवरून भोर चौपाटीवर आलो.श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशी नतमस्तक झालो.मग भोर वरून नेरे,बलवडी करत अंबाडे गावाजवळ आलो. भोरघाट सुरू झाला. सरळ चढणाच्या अवघड घाटावाटेने मांढरदेव कडे प्रवास सुरू झाला.. पहिल्या वळणानंतर एका धबधब्या जवळ थांबून फोटो काढले.छोटासा पण सुंदर धबधबा दिसला.ऑक्टोंबरातही प्रवाहित दिसला त्याचे नवल वाटले.सरळच दोन -एक किमीचे उभं चढण पार केले. हवेतील गारवा जाणवू लागला. होतो.घाटरस्त्याच्या यु टर्न जवळ गाडी बाजूला थांबवली..व तेथून रमणीय भोर परिसरातील गावे , दुरून दिसणाऱ्याडोंगर दऱ्या व शेतं हे निसर्ग वैभव पहात होतो.. तेथून पुढे घाटमाथ्यावर आलो.वेरुळीचा रस्ता दिसला तेव्हा आम्ही गेल्या वर्षी २६ जानेवारीला वेरुळी व डुईचीवाडीला गेल्याची आठवण आली..... मांढरदेव वरून सोमेश्वरवाडी,वेरुळी पठारावरून दोन्हीकडील परिसर पहात होतो.... आता रस्त्याने वाडीपर्यत चारचाकी वाहने जातात..पठारावरील कडा उतरून वाडीत गेलो होतो.वाडीच्या सुरुवातीलाच एका बंगल्याचे रंगकाम सुरू होते तिथच रस्त्यात थांबलो . येथील आमचे मित्र श्री लक्ष्मण शंकर कोंढाळकर यांना फोन केला.वाडीला आलोय कुठंय तुम्ही.त्याला खरे वाटेना म्हणून,गावात प्रवेश करताना पहिल्याच घराजवळ आहे.असं सांगितल्यावर खात्री झाली.चहापान करायला घरीजावा असं आवर्जून बोलले.... फोन चालू असतानाच पेंटरने जाधव सरांना ओळखून हाक मारली .आम्ही घराजवळ गेल्यावर त्याचा दुसरा जोडीदार माझ्या ओळखीचा निघाला.चौकशी करत,रंगकाम बघत असताना घरमालक आले.आमची विचारपूस केली..श्री धोंडेघरमालकांनी बंगला फिरून दाखवला..कड्याच्या खाली सुंदर लोकेशनवर बंगला बांधला आहे...रंगकामाची रंगसंगती सुरेख होती.त्याने आम्हाला चहा दिला.वाडी बरोबरच मांढरदेव पठारावरील चनुरा पावटा प्रसिद्ध आहे..त्याच कालवण इतर वानापेक्षा चवदार लागते. या आठवणीवर गप्पा करत घाटमाथ्यावरुन वाईकडे निघालो.... आता थंडी वाजायला सुरुवात झाली....घाट उतारायला लागलो........ वाटेतल्या धबधब्याजवळ चांगलीच गर्दी होती.प्रत्येकजण सायंकाळचा धबधब्याचे मनमोहक दृश्य मोबाईल मध्ये टिपत होता.ओंजळीत पाणी धरून,हात घालून, नृत्याची पोज घेत फोटोसेशन चालले होतं.आमाला फोटो काढायला स्पॉट दिसतोय का? याचा शोध घेत होतो.....योग्य स्पॉटवर आम्ही फोटो काढले....
तदनंतर घाटातील मालवाठार या भागात गाडी थांबवून चालत उजवीकडे गेलो.. .... सांजवेळ धोम धरण अन् डोंगररांगा व पायथ्याची छोटी छोटी गावं यांचा विलोभनीय आविष्कार दिसत होता.एका अनामिक कवीने
" क्षितीजावरून ओसांडली
सोनेरी स्वप्नांची रास
विटले बंध सारे
या सांजेच्या सहवासात.....
हेच दृश्य डोळेभरून पाहून आजच्या भटकंतीची सांगता केली. तिथून घाटरस्त्याने गुंडेवाडी,धावडी बोपर्डी करत वाईत पोहोचलो.... रायरेश्वरापासून सुरू झालेल्या डोंगररांगेच्या कधी पायथ्याशी,कधी माचीवर ,कधी घाटात,तर कधी घाटमाथ्यावर होतो.आज निसर्गाच्या सानिध्यातच फिरत होतो.
🌴🌳🍀🌴🌴🌴🌴🌴
क्रमशः भाग पंधरा
दिनांक२३ एप्रिल २०२०
श्री रविंद्र लटिंगे, ओझर्डे वाई
दिनांक २३ एप्रिल२०२०
Comments
Post a Comment