आधारवड आमचे आण्णा

                       'आण्णा 'आमचे आधारवड
एक मार्च वाढदिवस


श्री गणपत तुकाराम लटिंगे माझे वडील आण्णा या नावाने आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान व कुटुंब प्रमुख आहेत.
१ मार्च हा त्यांचा वाढदिवस
आज ७६व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांना लटिंगे परिवाराकडून लक्ष लक्ष ह्रदयपुर्वक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...।
🎂🎁🍫💐🌺🌹
सिंहावलोकन करताना ७५ वर्षातील  अनेक सुखदु:खाच्या घटना समोर येतात.आमचा परिवार म्हणजे आजी ,आजोबा ,आण्णा आणि आई.उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करून आपल्या संसाराचा गाडा चालवित होते.आमचासाळी  समाज पारंपरिक व्यवसाय करणारा होता.स्वातंत्र्य पुर्वकाळात हस्तव्यवसायांना घरघर लागल्याने मजुरी शिवाय अन्य पर्याय नव्हता.
आण्णा सातवी पास झाले.परंतु त्याकाळात चांगला व विश्र्वासु जामिनदार न मिळाल्याने सरकारी नोकरीत जावू शकले नाहीत. इचलकरंजी, सांगली येथे मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करीत होते.त्यातच त्यांना लग्नानंतर  आईची साथ मिळाली.आई शेतात मोलमजुरी करीत होती.तर आण्णा धान्य व्यापा-याकडे दिवाणजीची नोकरी करत होते.आर्थिक विवंचना होत असताना आहे त्यात समाधान  माणणारे असल्याने ,  आम्हाला शिक्षण देण्यासाठी कष्ट उपसले.स्वताची कधीही हौसमौज केली नाही. त्यांना न मिळालेली सरकारी नोकरी मुलाला कोणताही वशिला न लावता मिळवून दिली.मला शिक्षक करण्यात आण्णांचे प्रयत्न सर्वात जास्त कारण उच्च शिक्षण घेवून मग मला  नोकरीयची होती.पण गरिबी पुढे शिक्षण न घेता  नोकरी स्विकारून आई वडिलांना मदत करणे महत्त्वाचे होते. त्यामुळे ज्ञानदानाच्या कार्याला सुरुवात केली.
आमचे आण्णा मितभाषी गरजे पुरतच बोलणारे पण बोलण्यात वैचारिकपणा होता.सामाजिक कार्याची आवड असल्याने घरचे कार्यसमजुन इतरांचे काम करीत असत.सोंगात ड्रेपरी नसविणे लग्न समारंभात मदत करणे,यात्रेचा वसूल संकलन करण्यात मदत करणे व साळी समाजातील व पाहुणे रावळ्यांचा कार्यक्रमात सहकार्य करून त्यांच्या सुखदुखात सहभागी होणे.
   आण्णा पुरागोमी विचाराचे होते.
 समाज कारण व राजकारणाची आवड असल्याने थोरल्या सुनेस ग्रामपंचायत सदस्य केले.तर धाकट्या सुनेस नोकरी करण्यास परवानगी दिली.परिवारातील सुखदुखाच्या प्रसंगी खचुन न जाता आम्हाला आधार देण्याचे कार्य केले. भावनेच्या आहारी न जाता वैचारिक पणे परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे त्यांनी शिकविल्याने व पुरोगामी विचारामुळेच ते आमचे आधार वड आहेत.
ह्रदयाचे दुखणे असुनसुध्दा आजही सकाळ व सायंकाळी फिरायला जातात,मोजकाच आहार  घेतात,दररोज ग्रामदैवत श्री पद्यावतीचे देवदर्शन करतात.  आरोग्याकडे लक्ष देतात.
आण्णा आमचे संचित आहेत. कारण त्यांच्या काटकसर,प्रामाणिकपणा,मर्यादित गरजा,मदत,मितभाषीपणा,समाजसेवा, सहकार्य वृत्ती या विशेष आचरणीय गुणांमुळे आम्हाला  समाधानी जीवन लाभत आहे..खाऊनपिऊन संसारात सुख मानायला सांगणारे  आमचे आण्णा आहेत.
आमच्या आण्णांना नातवांच्या बाबांना वाढदिवसाच्या लटिंगे परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा ।।

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड