माझी ज्ञानमंदिरे अभेपुरी
माझी ज्ञानमंदिरे
📚माझी ज्ञानमंदिर 📚
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अभेपुरी ता.वाई
📊सेवाकाल- २फेब्रुवारी २०१० ते १८ मे २०१८ |८वर्षे ३ महिने.
🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅
वरिष्ठ मुख्याध्यापक व विषय शिक्षक
📓📕📗📘📓📕📗📘
कृतिशील शिक्षण देणारी जिल्हा परिषदेची आयएसओ प्राथमिक शाळा.
धोमधरणाजवळील टेकडीच्या पायथ्याशी जिल्हा परिषदेची शाळा .गावात प्रवेश करताच लक्षवेधून घेणारी इमारत. सर्व मुलांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे .विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून त्यांच्या सुप्त गुणांना अविष्कार व व्यक्त होण्याची संधी देणारी , नावीन्याचा ध्यास घेणारी माझी शाळा आहे .शाळेची अन गावाशी एकरूप होऊन सर्व शिक्षक वृंद झपाटून काम करतात. नवनवीन तंत्रज्ञान, आनंददायी व बालस्नेही ज्ञानरचनावाद पद्धतीने विद्यार्थ्यांचं शिकणं सुलभ करतात. शाळा आय एस ओ मानांकन प्राप्त आहे .सर्व शिक्षक संगणक प्रशिक्षित असून संगणकाचे बेसिक ज्ञान मुलांना दिलं जातं . एकमेकांच्या सहकार्याने व संघभावनेने काम केल्याने
🏅आय एस ओ मानांकन
🏅डिजीटल शाळा ई- लर्निंग
🎖️प्रगतशाळा
🎖️उपक्रमशील शाळा
🎖️ आदर्श शालेय रेकॉर्ड
🏅 शाळासिध्दी '' अ '' श्रेणी
शाळा उपक्रमशील झाली आहे.
आमच्या शाळेत गाव आहे कारण शिक्षकांनी शाळेचा गुणात्मक व भौतिक बदल केलेला पालकांना दिसल्यामुळेच शैक्षणिक उठाव व लोकसहभागातून शाळेस तीन- साडेतीन लाखाचा निधी वस्तुरुपाने व रोख मिळाला .शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य ,गावचे सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य, शिक्षक-पालक संघ ,माता पालक संघ ,शिक्षणप्रेमी नागरिक पालकआणि हितचिंतक यांच्यामुळेच उठावदार कार्य संपन्न झाले. यातून संगणक कक्ष, एलसीडी प्रोजेक्टर ,होम थिएटर, कपाटे ,बेंचेस ,इन्वर्टर , सेवा सहयोग संस्थेचे स्कूलकिट ,शालेय रेकॉर्ड,पोर्टफोलिओ ,स्पोर्ट ड्रेस व शैक्षणिक साहित्य इत्यादी सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत.
प्रशस्त मुख्याध्यापक कार्यालयात सीए भगवानराव मांढरे डिजिटल क्लासरूम ई- लर्निंग सुविधा असून अभ्यासक्रमातील शैक्षणिक आज्ञावली ,चित्रपट ,कथा ,गोष्टी बाल नाटके इत्यादी ऑडिओ व्हिडिओ माध्यमाचा वापर तंत्रस्नेही शिक्षक करतात.मीनाची दुनिया ,माहितीपट व चित्रफिती मनोरंजक पद्धतीने दाखविल्या जातात.यासाठी शाळेतील इंटरनेट सुविधेचा वापर केला जातो. शाळेसमोर बगीचा असून त्यात फुलझाडे व औषधी वनस्पतींची लागवड केली आहे. पाठीमागे परसबाग आहे. शाळेत सुसज्ज ग्रंथालय असूनही प्रत्येक वर्गातही स्वतंत्र वाचनालये आहेत.अवांतर वाचनासाठी मराठी हिंदी इंग्रजी ची पुस्तके असून शिक्षकांसाठी संदर्भ ग्रंथ आहेत. आठवड्यातून दर शनिवारी मुलांना घरी वाचण्यासाठी पुस्तके दिली जातात. तसेच काही विद्यार्थी स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी शाळेस पुस्तके भेट देतात .
प्रसंगानुरूप दैनिक मासिक व वार्षिक कृतीशिल अभ्यासपूरक सहशालेय उपक्रम राबवले जातात .विशेषता शाळेचे गॅदरिंग, भैरवनाथाच्या यात्रेनिमित्त विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम , शालेयनिरंतर ठेवीतून गुणवत्ता प्राप्त मुलांना बक्षीस वितरण ,शारदीयव्याख्यानमाला ,बाल आनंद मेळावा ,साने गुरुजी कथामाला, लेझीम पथक ,क्रीडा दिन, शिक्षणोत्सव कार्यक्रम ,अभिरूप बाजार ,बाल आनंद मेळावा,गावाचा एक दिवस शाळेसाठी , बालकवी संमेलन,वनभोजन ,सांस्कृतिक कार्यक्रम, वृक्षसंवर्धन ,मुलाखत क्षेत्रभेटी व विशेष दिन साजरे करणे इत्यादी उपक्रमाद्वारे संस्कारीत शिक्षण देण्याचा सर्व शिक्षक सहकारी माझ्या शाळेत प्रयत्न करीत आहेत. बालसभा,मीनाराजू मंच व बालविकास मंचाद्वारे कथाकथन ,वाचन ,निबंध चित्रकला, वक्तृत्व, समूहगीत, कविता वाचन ,फॅन्सी ड्रेस अशा स्पर्धांचे आयोजन बाल सभा मीना राजू मंच याद्वारे करून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांच्या विकासासाठी व्यासपीठ निर्माण केले आहे. मुलांचा कलाविष्कार लेख चित्रे कविता इतरांना पाहण्यासाठी प्रदर्शन फलक असून विविध शासकीय योजनांचा लाभ मुलांना मिळवून दिला जातो .या शाळेचे अनेक माजी विद्यार्थी इंजिनिअर ,डॉक्टर सैनिक ,मल्ल ,पोलीस ,मल्लखांब पटू , व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते निर्माण केलेले आहेत.यांचे सहकार्य नेहमीच शाळेला असते. शाळेची स्वतंत्र प्रयोगशाळा व सभामंडप लोकसहभागातून करण्याचा मानस
असून . मुलांना जीवनावश्यक ज्ञानाची शिदोरी देण्यासाठी आमची शाळा वचनबद्ध आहे.
विद्यार्थी ज्ञानरचनावाद पध्दतीने कसं शिकतात हे पाहण्यासाठी अनेक शिक्षकांनी भेटी देवून शाळेची प्रशंसा केली आहे .
🏵️ माझ्या भरारीसाठी पंखांना बळ दिले ते

माझे सहकारी शिक्षक बंधू-भगिनी श्री विलास पोळ ,श्री सुरेश जगदाळे,श्री राजेन्द्र क्षीरसागर,सौ नलिनी जाधव,सौ रोहिणी सपकाळ,सौ चंदा सुतार,सौ वर्षा काळे,श्री शशिकांत कदम,सौ नीता वाघदरे( गोळे ) व सौ शारदा शिंदे.या सर्वांचा महत्त्वाचा सहभाग आहे.
या शाळेचे विद्यार्थी व पालकांच्या मदतीनेच शाळा ज्ञानवैभव झाली.
💐असं हे माझं ज्ञानमंदिर💐
शब्दांकन
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे,वाई
क्रमशः भाग - ५

Comments
Post a Comment