माझी भटकंती भिलार भाग क्र..२३
🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸
⛰️माझी भटकंती⛰️
क्रमशः भाग-तेवीस
🍓 भिलार 🍓
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 महाबळेश्वर
महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण व प्रेक्षणीय स्थळ असून, येथे पर्यटक वर्षभर भेट देतात. ब्रिटिश काळापासून महाबळेश्वराला लाभलेला उत्कृष्ट गिरीस्थान हा लौकिक आजही कायम आहे. समुद्रसपाटीपासून १,३७२ मीटर उंचीवर पश्चिम घाटांच्या रांगेत वसलेले महाबळेश्वर हे पर्यटनाचे निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण. महाराष्ट्राचे नंदनवन , सह्याद्री पर्वताच्या पश्चिम घाटमाथ्यावर आहे..महाबळेश्वरला जाताना पांचगणी पासून पुढे गेल्यावर भिलार 🍓 फाटा लागतो.तेथून भिलार ३ किमीवर आहे..या डोंगर भागातील खास वैशिष्ट्ये म्हणजे निसर्ग पर्यटन व लालचुटुक स्ट्रॉबेरी फाॅर्म...
जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक व माजी आमदार भि.दा.भिलारे गुरुजींचे
गाव.अलिकडे पुस्तकांचे गाव व स्ट्रॉबेरी महोत्सवाचे गांव म्हणून फेमस आहे.
आमचे मित्र श्री प्रशांत वाडकर यांचे दाजी श्री शिवाजी भिलारे... यांच्या कडे यात्रेनिमित्त श्री शिवाजी फरांदे व श्री सुनील जाधव या मित्रांसमवेत नेहमी जातो.
दाजींनी तिथं गेल्यावर आदरातिथ्य केले....जेवणास वेळ होता म्हणून ते म्हणाले ,"चला आपण शेतात जावूया.".चालत चालत शेताकडे निघालो....
सगळीकडे स्टॉबेरीचे छोटे छोटे प्लॉट दिसत होते...मी पहिल्यांदाच ही शेती पहात होतो.ओरंब्यावर मलचिंग पेपरचा वापर करुन ड्रीपद्वारे केलेली शेती.हिरवेगार कमीउंचीचं वेल ,पांढरीपांढरी दिसणारी फुलं व लालचुटुक रसदार, चवदार स्ट्रॉबेरी.हिरव्यागार पानात गर्द लालभडक रंग,त्यावर पिवळे टिपके..वेगळी साल नसणार फळ फुगीर व खाली निमुळते होत जाणारे,शंकूसारखे 🍓 स्टॉबेरीचे फळ उठून दिसत होते... काहींचा आकार लहान मोठा, स्वता:च्या हाताने पाहिजे ते फळ तोडून आस्वाद घेत होतो.अमेझिंग आंबटगोड चव..आजपर्यत अनेकदा स्टॉबेरी खाल्ली पण इथल्या चवीची अवीट गोडी.जिभेवर रेंगाळणारी चव..इतर ठिकाणी उत्पादन घेतले जाते.पण या चवीची सर येत नाय.माती आणि वातावरणाच्या गुणांचा स्वाद उतरल्याने अस्सल चव असावी.स्ट्रॉबेरी व लिची खात खात दाजींबरोबर गप्पागोष्टीमारत फळाच्या प्रकाराची ,वाणांची,गोडीची व मार्केटिंग ची माहिती जाणून घेतली.. नंतर तेथील कच्च्या रस्त्याने तेथून पुढे आम्ही तसेच पठारावरुन चालत चालत कड्याजवळ गेलो..पुढे दरी दिसत होती म्हणून रस्ता सोडून पायवाटेने चालत चालत पुढे गेलो... सायंकाळच्या वेळी दरीच दृश्य मनमोहक दिसत होतं आम्ही बरोबर अंजुमन शाळेच्या पाठीमागे होतो... पावसाळ्यात भिलार धबधबा असतो त्याच पाईंटवर.एका बाजूला पांचगणी तर दुसऱ्या बाजूला आखेगणी कासवंड डोंगर. पांचगणी वरुन करहरला आषाढी एकादशीला घेल्याचे आठवले.. सायं काळच्या वेळी आसमंत न्याहाळताना विलक्षण परिसर दिसतो होता.तिथं फोटोग्राफी केली..
भिलारवरुन डोंगर माथ्याने मेढ्याला जाता येते.हे नव्याने समजले.भिलारहूनएक रस्ता कासवंड,घोटेघर करत आखेगणीला जातो.तर दुसरा उंबरी ,मार्ली मार्गे मेढ्याला जातो.हे दाजींनी सांगितले..
माघारी दाजींच्या घरी येवून मस्तपैकी यात्रेच्या जेवणाचा आस्वाद घेतला.फ्रेश बागेतली स्ट्रॉबेरी बॉक्स घेऊन घरी आलो......🍓🍓🍓🍓🍓🍓त्यानंतर अनेकदा मित्रांसमवेत व फॅमिली सोबत जाण्याचा योग आला.
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
🖋️दि.२८ एप्रिल २०२०
https://raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment