जिव्हेश्वर उत्सव २०१९

भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव वाई येथे संपन्न झाला.🌱
प्रारंभी जलप्रलयामुळे निधन पावलेल्या पुरग्रस्तांना ,देशासाठी शहीद झालेल्या वीरांना व ज्ञात- अज्ञात समाज बांधवांना श्रध्दांजली अर्पूण सर्व साधारण सभेस सुरुवात करण्यात आली.प्रास्ताविक श्री रवींद्र लटिंगे यांनी केले.प्रमुख अतिथी व महाप्रसादाचे मानकरी यांचा परिचय सौ विद्या साळी यांनी करून दिला प्रमुख अतिथी गटशिक्षणाधिकारी श्री कमलाकांत म्हेत्रे साहेब यांचे स्वागत उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर गवते यांनी केले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री कमलाकांत म्हेत्रे गटशिक्षणाधिकारी वाई यांच्या हस्ते महाप्रसादाचे आयोजक श्रीमती वत्सला विष्णू कोळेकर यांचा सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. प्रा.हणमंत कोळेकर सैनिक स्कुल सातारा यांचा सन्मान अध्यक्ष श्री भास्करराव कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला.अहवाल वाचन श्री भास्करराव कांबळे यांनी केले.जमाखर्च व ताळेबंदाचे वाचन श्री रवींद्र लटिंगे यांनी केले.यावेळी सौ मनिषाअरबुणे,प्रा.हणमंत कोळेकर यांनी मनोगत व्यक्त केले.पुरग्रस्तांना भरीव आर्थिक मदत समाजाचे वतीने करण्याचे ठरविण्यात आले.
🎙सामाजिक विषमता,इतरमागास वर्गाची सर्वांगिण स्थिती याविषयीची सद्यस्थिती यावर प्रमुखअतिथिंनी  विचार व्यक्त केले.संविधानाने दिलेले आपले अधिकार,हक्क, कल्याणकारी योजना कशा आहेत. समाजासाठी आपण नेमके काय केले पाहिजे.  जातिव्यवस्थेतील विषमता दूर करण्यासाठी काय करायला पाहिजे .आरक्षण मिळवण्यासाठी काय करावे. भारताची आर्थिक स्थिती उदाहरणे व सर्वेक्षणात्मक आकडेवारी विषद केली.
🙏🏻आभार श्री योगेश दाहोत्रे यांनी मानले.
🌸जिव्हेश्वर आरती कोळेकर कुटुंबियांच्या वतीने घेण्यात आली.
महाप्रसादाचा आस्वाद सर्व समाज बांधवांनी घेतला. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी श्री दत्तात्रय मर्ढेकर, प्रा.रमेशचंद्र बारगजे,श्री जनार्धन अरबुणे, श्री राजेंद्र लुंगे,श्री अजित दातरंगे ,श्री भगवान गवते,श्री महेंद्र धेडे,श्री स्वप्नील दाहोत्रे,श्री उमेश तांबे,श्री अजित हावरे,श्री आनंदा सुकाळे श्री राहुल हावरे व सौ पूनम दातरंगे ,सौ सारिका गवते ,श्री सागर मर्ढेकर ,श्री निलेश मर्ढेकर,योगेश पोरे  यांनी मोलाचे सहकार्य केले.
 🌹💐 कार्यक्रमास वाई शहरातील सर्व स्वकुळ साळी समाज बंधू-भगिनी उपस्थित होते.......।।
मनपूर्वक आभार...।सचिव श्री रवींद्र लटिंगे, वाई

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड