माझी भटकंती श्रीक्षेत्र करहर भाग क्र-बत्तीस व तेहतीस

🚩 माझी भटकंती 🚩
            क्रमशः भाग बत्तीस
        🛕करहर ता. जावली


     आषाढी एकादशी देवदर्शन
  🌸⛈️🌧️🌨️🌨️🌨️🌨️🌸
 वैष्णवांची मांदियाळी अलोट भक्तीचा महासागर आषाढी एकादशीच्या दिवशी श्री क्षेत्र पंढरपूर येथे  वारकऱ्यांचा मेळा जमलेल्या असतो.संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या  व संत तुकाराम महाराजांच्या पादुका मिरवत  पायवारीपालखी  सोहळा कैवल्याच्या विठूरायाला भेटायला जातो....
   सातारा जिल्ह्यातील ज्या भाविकांना  पंढरपूरी जाणे शक्य होत नाही ,असे भाविक प्रतिपंढरपूर समजले जाणाऱ्या करहरकडे श्री विठ्ठल व रखुमाईच्या दर्शनासाठी येतात......
 आमचे मित्र श्री भास्कर पोतदार व सांप्रदायिक शिक्षक मित्र श्री बाळासाहेब बांडे आणि श्री वाघ सरांबरोबर करहरला जाण्याचा योग आला.वाईतून फराळ करुन पसरणी घाटाने पाचगणीत गेलो..रुईघर मार्गे आमचीही दुचाकीची दिंडी करहरला निघाली...पावसाळ्यातील  सृष्टीचा नजराणा हिरवेगार डोंगर, कड्यावरुन वहात येणारे छोटे-मोठे धबधबे, अचानक येणारा पाऊस   खळाळत वाहणारे ओढे-नाले,येणारे धबधबे पहात आम्ही निघालो.सभोवताली  पहात आम्ही  बेलोशी गावाच्या पुढे दिंडी दिसली म्हणून थांबलो... दिंडी पहात बांडे सरांना,"पालख्या व दिंड्या ही असतात काय तिथं" असं विचारल्यावर ते म्हणाले," एवढंच नाही सर करहर पंचक्रोशीतील अनेक गावांचा पायीदिंडी सोहळा येतो.वाटेत रिंगण होते.
तुझ्या पालखी संग,होतो मी दंग ! भावतो तुझा रंग ,तूच आमचा पांडुरंग ! अशी करहरची मोठी यात्राच भरते.."  वारीत कुणा हाती भगव्या पताका,मुखी विठ्ठलाचे नामस्मरण करत,टाळमृदुंगाच्या गजरात ,अभंग व ओव्या
 गातं सोहळा मार्गस्थ होत होता... महिलांच्या डोक्यावर तुळस, अभंग हात टाळमृदुंगाच्या ठेक्यावर फेर धरुन,फुगडी खेळताना  पाहिल्यावर सारेजण भक्तीरसात न्हाऊन जातायत...खरच पालखी-दिंडी सोहळा म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक लोकजीवनाचे वैभव.
थोड्यावेळाने आम्ही करहरच्या अलिकडेच गाडी पार्किंग करायला थांबलो.. तेथून चालत चालत निघालो.... अनेक गावच्या दिंड्या ,वारकरी, लेझीम पथक, झांज पथक पाहून मन आनंदित झाले.सगळीकडे चैतन्य आणि भक्तीचा मिलाफ होऊन सगळे पंढरीच्या वाटेवर पांडूरंगाच्या भेटीला निघाले होते....आम्हीही त्या सोहळ्याचे वारकरी होऊन नामघोष करत पुढे पुढे निघालो... दर्शनासाठी मोठी रांग होती... रांगेत उभे राहिलो...अनेक नामघोषणा,सुचना निवेदन,किर्तनाचा आवाज कानावर घेत मुखाने माऊली माऊली व विठोबा रखुमाई म्हणत पुढे पुढे सरकत होतो.दीडएक  तासाने दर्शन झाले.मनोभावे पांडुरंगाच्या व रखुमाईच्या चरणी लीन झालो.. आषाढी एकादशीच्या दिवशी दर्शनाने आत्मानंद मिळाला....



🚩 माझी भटकंती 🚩
            क्रमशः भाग-तेहतीस

        🛕करहर ता. जावली🛕
     आषाढी एकादशी देवदर्शन
  🌸⛈️🌧️🌨️🌨️🌨️🌨️
    मंदिरापासून वाट काढत रस्त्यावर आलो...अनेक वाद्यांचे नादमय आवाज , टाळमृदुंगाचा आवाज व वारकऱ्यांचे नामस्मरण सुरू होते.तिथच शेजारच्या हाॅटेलात चहापाणी व फराळ केला... माईक वरुन सुचना आली.

थोड्याच वेळात शाळेतील मुलांची दिंडी सुरू होणार आहे.सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा... दिंडी सोहळा थोडा वेळ पाहून आल्या मार्गी जावूया...
 जावली तालुक्यातील विविध शाळांचे  संतांची परंपरा जपत वेगवेगळ्या प्रसंगांचे चित्ररथ , सामजिक संदेश देणारे चित्ररथ ,बालगोपालांची दिंडी पारंपरिक पोशाख घालून टाळमृदुंगाच्या ठेक्यावर फेर धरून नाचत होती.फुगड्या घालत होती.सामाजिक संदेशाच्या घोषणा देत सोहळा पाहुन मन भारावून गेले.. आपणही आपल्या शाळेत बालदिंडी काढून मुलांना संतांची शिकवण देण्याचा उपक्रम घेवूया.. असा विचार आला.
  भक्तीच्या अलोट ऊर्जेत काही क्षण घालावायला मिळाले.पुन्हा मंदिराच्या कळसाचे लांबून दर्शन घेऊन माघारी परतलो .......

दिंडी  भक्तीचा आविष्कार
जीवनाचा सदाचारी सुविचार
    रिंगणी पळा पळा
     वारकऱ्यांचा सोहळा !!
परतीचा  सुरू ....त्याच मार्गाने सुरू झाला. पांचगणित आल्यावर वेळ होता म्हणून टेबललॅंडवर गेलो... बारावीला असताना धोम धरणाच्या पायथ्याशी  व्याहळीत एनसीसी कॅम्प होता.त्यावेळी जवळील डोंगरातून चालत आम्ही पांचगणी व टेबललॅंडवर आलो होतो ते आठविले.
फिरताना खाण्यासाठी शेंगदाणा  पुडी घेतली..पहात पहात पुढे येवुन एका बाकड्यावर  बसलो.पाकिट फोडुन थोडेथोडे तिघांना दिले.एका हातात पुडी व दुसऱ्या हाताने दोनतीन शेंगदाणे चघळत असताना अचानक माकडाने हातातली पुडी पळविली.चकाट पळत गेले..मी अवाक झालो.तोंडाला पाणी सुटायला अन् खायला काय नसायला एकच गत झाली... यावर सगळ्यांना हसू आले.पण माझा तोंडचा घास पळविला
माकडांची फराळ झाला....

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई

क्रमशः भाग तेवीस
दिनांक २८ एप्रिल २०२०

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड