माझी भटकंती भाग सहा-जांभळी निसर्ग पर्यटन

⛰️🌴माझी भटकंती⛰️🌴

      ✒️क्रमश:भाग सहा
 🏝️⛵🛶⛵🛶⛰️🌴⛰️

   ✳️ निसर्ग पर्यटन ✳️
〰️➖〰️➖〰️➖〰️➖
                       

   दिनांक १३ जुलै  २०१९ रोजी  जांभळी येथील वनविभागाने विकसित केलेल्या खुटेकर वस्तीनजिकच्या  निसर्ग पर्यटन स्थळाची वर्षा  सहल
➿➿➿➿➿➿➿➿
          रायरेश्वरच्या  दक्षिणेला  पायथ्याशी  व  कमंडलू (जुने नाव वळकी) नदीच्या काठावर  जांभळी  गाव लागते.तेथून पुढे २ किमीवर  पाराटवस्ती व तेथून १किमीवर खुटेकर वस्ती येते.एका बाजूला  रायरेश्वरचा कडा धबधबा पहात तर दुसऱ्या बाजूला नदीपल्याडचा वाशिवली डोंगररांग न्याहळत  आपण वस्तीवर येतो.  तिथं गाडी पार्क करून पायवाटेने  आपण  वनविभागाच्या कमानी जवळ येतो. 🌴निसर्ग पर्यटन केंद्र जांभळी 🏝️तीचं आपले स्वागत करते....... तेथूनच फिरायला, भटकायला  सुरुवात....
            पावसाची रिपरिप सुरू होती.कोंढावळे शाळेतील शिक्षकवृंद सोबतीला होते.भिजत ,चालत  फोटो काढत निसर्गाचा विलोभनीय आविष्कार आम्ही न्याहाळत होतं........ नवीन काय दिसलेकी दृश्यांना टिपत होतो.. सगळं ठिकाणच फोटो काढण्यासारख.
       काय पहावे काय वर्णावे..अगगं नवलाईचा नजराणा सगळीकडे दिसत होता. हिरवीगार वनराई, काळेभोर मेघ, नदीचं खळाळणारं पांढरशुभ्र पाणी...पाहून मन तजेलदार झालं.सगळीकडे हिरवीगार झाडी, डोंगर अन् त्याच्या कडेवरून खाली कोसळणारे छोटे-मोठे धबधबे पाहून मन पावसात चिंब भिजू लागलं.   
            पहिल्यांदा पाऊलवाटेने नदीकाठी गेलो... पांढऱ्याशुभ्र,दुधासारख्या पाण्याजवळ गेलो.विविध आकाराच्या खडकांवर उभे राहून फोटो काढायला सुरुवात केली... शिक्षकमित्रांनी विविध पोजमध्ये फोटो काढत दृश्यांवर बोलकं झालो....जसं एखाद्या कॅलेंडर मध्ये दृश्य असते तशी सिनरी दिसत होती. एखाद्या सिनेमाला पावसात भिजतंनृत्य सादर करण्यासाठी छित्रणस्थळाची निवड करावी  लागते तस दिसत होतं.हिरव्यागार गालिच्यावर कोसळणारे धबधबे, सुसाट वारा,ढगांचा गडगडाट अन्य अचानक येणारी पावसाची सर  या  सगळ्यांनी मिळून  केलाय
 वाद्यवृंद ,खळाळणाऱ्या पाण्याचं झालंय  गाणं  अन्  त्यांच्या तालासुरावर   नाचणारी ,डुलणारी झाडं,वेली...........सृष्टीचं  स्वागतगीतच.
          वनविभागाने विविध ठिकाणी झाडांचा कल्पकतेने वापर करून वाटेत कट्टे (चौथरे)बांधले आहेत.बैठकव्यवस्था केली आहे.
तेथीलच दगडांचा वापर करून पायवाटा केल्या आहेत.घनदाट  झाडीतील वाट तुडवत तुडवत आपण दोन-तीन किमीची रपेट करु शकतो.जोराचवारं अंगावर घेत, पावसात चिंब भिजत भटकताना येणारा अनुभव फारच वेगळा  वाटत होता........ एरवी जर्किन ,टोपीसह पॅकबंद असणारे आम्ही त्या वेळी चक्क पावसात भिजलो.... ..घनदाट भागात  जंगली प्राण्यांचा अधिवास असल्याने व पावसाच्या सरी वाढू  लागल्याने  त्याच मार्गाने  परत वळलो.
अर्ध्या -पाऊण तासानंतर अचानक पावसाच्या सरी कमी कमी होवू लागल्या,ऊन पडू लागलं.वस्तीवर   आलो.थोड्या वेळाने बरोबर आणलेल्या भोजनाचा मनसोक्त आस्वाद  बंधाऱ्याच्या काठावर बसून घेतला....जांभळी बंधारा व रायरेश्वर पाहून  निसर्गरम्य ठिकाणांची आठवण  व काढलेले फोटो  न्याहाळत मनात साठवत परतीचा प्रवास सुरू झाला......
➖〰️➖〰️➖〰️➖〰️
इथं भटकंतीला जाताना वनविभागाची परवानगी घ्यावी. स्थानिक गाईडची मदत घ्यावी.वाईपासून हे ठिकाण ३० किमी आहे.एक दिवसाची सहल निसर्ग पर्यटन केंद्र ,बंधारा व रायरेश्वर अशी  होते.
🏝️🌴🏝️🌴🏝️🌴🏝️
क्रमशः भाग.पाच
लेखन दिनांक १८ एप्रिल २०२०
✒️श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे    वाई
https://raviprema.blogspot.com

Comments

  1. खूपच सुंदर आणि प्रेरणादायी कार्य .आमचे मार्गदर्शक आणि सहकारी आदरणीय श्री लटिंगे सर यांचे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील भरीव असे योगदान नेहमीच आम्हांला प्रेरणादायी ठरेल . आपल्या भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!!!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड