माझी भटकंती भाग पाच कशेळी बीच

                       
            ⛰️🌴माझी भटकंती⛰️🌴
 
                ✒️क्रमश:भाग पाच
        🏝️⛵🛶⛵🛶⛰️🌴⛰️
 
   ✳️ देवघळी कशेळी बीच✳️
     







〰️➖〰️➖〰️➖〰️➖
                          ३० मे २०१८
➿➿➿➿➿➿➿➿
      देवघळी कशेळी बीच निसर्गाचा विलोभनीय आविष्कार
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
  फॅमिली व जिवलग मित्रांबरोबर कण्हेरी मठ, आंबोली,गोवा, सिंधुदुर्ग ते हरिहरेश्वर बीच, महाबळेश्वर अशी सहल आयोजित केली होती.तारकर्ली,देवबाग व वायरीभूतनाथ बीच पाहून रत्नागिरी कडे जात माझा गाव माझी बातमी या वृत्तवाहिनीवरील पाहिलेल्या पर्यटनासाठी ग्रामपंचायतीचाने विकसित केलेला देवघळी बीच याच वाटेवर   असल्याची आठवण ड्रायव्हर ला केली.व राजापूर आले की गाडी थांबवण्यास सांगितले.गाडीत गाणी ऐकत, गप्पा मारत वेळ घालवत होतो.कालांतराने राजापूर आल्यावर चहापानासाठी थांबलो.तीथेच हॉटेल मालकाकडे चौकशी केली.त्याने सरळ रत्नागिरी कडे न जाता राजापूर -- अडिवरे मार्गे जावा जवळ पडेल व तिथून १८ किमीवर पावसलाही जाता येईल.... त्याप्रमाणे हायवे सोडून आमची गाडी  कशेळीकडे मार्गस्थ झाली.
      कोकणातला वळणावळणाचा रस्ता,चढ उताराचा रस्ता,दाट माडाची,पोपळीची बनं, आंब्याच्या बागा असा देखावा पहात पुढे पुढे निघालो.वाटेत आलेल्या अडिवरे गावात कशेळी गाव किती लांब याची चौकशी केली त्याने पुढे नदीचा पुल ओलांडला की कशेळी गाव डाव्या बाजूला आहे...तिथं चौकशी करा... ..... थोड्या वेळाने पुढे आलेला पुल ओलांडला.छान द्श्य दुपारचे दिसत होते.कशेळी गावाचा बोर्ड पाहून गाडी थांबवून नवीन बीच कुठे याची  चौकशी केली.तिथे असणाऱ्या माणसाने याच रस्त्याने चार किमी जावा....तुम्हाला सपाटी लागेल...तिथं गाडी थांबवा व खाली पायऱ्यांनी उतरून जावा.......

    पायऱ्या उतरून जायच म्हटल्यावर गाडीतली म्हटली आम्हाला नाय वाटत तिथं बीच असेल म्हणून.....
     आपण आत्ता माथ्यावर आहोत...माथ्यावर बीच कसा काय.? चुकीचा बीच तर पहायला नाय ना मिळत अशी शंका आली.
          गाडी थांबली .खाली उतरलो.समोरच पहातोय तर काय डोळ्यांच्या कक्षेत न मावणारा अथांग सागर डोंगराच्या माथ्यावरुन पाहून सगळ्यांना आनंद झाला.माथ्यावरून खाली पायऱ्या उतरत उतरत फोटोग्राफी करत करत समुद्राच्या काठी आलो...समोर अथांग सागर, पाठी मागे डोंगरकडा, पायाखाली चकचकीत व गुळगुळीत दगडगोटे ...... रूपेरी वाळू नाहीच कुठे! कातळ खडकातील हा आगळावेगळा बीच .......केवळ पाण्याच्या लाटांचा आणि पक्ष्यांचा किलबिलाट.. गोंधळ , गोंगाट नाही. नयनरम्य सिनेमात असतं तसं दृश्य दिसत होतं.तुषार उडवत किनाऱ्यावर धडकणाऱ्या लाटा,फेसाळत्या पाण्याचा काठावरील खडकांना धडकुन उडणारा पाण्याचा फवारा...मनाला आनंद देणारं दृश्य .... मस्तच,लयभारी ,अरेव्वा,किती छान असे उद् गार बाहेर पडू लागले.माझे मित्र शिवाजी आणि प्रशांत फोटो सेशन करतच म्हणू लागले ," सर, आजपर्यंत पाहिलेल्या बीचमध्ये एक नंबर, खतरनाक. स्पॉट...❗ सगळेच पाहिजे त्या पोझिशन मध्ये राहून क्लिक करत होते.कुटूंबासह, वैयक्तिक व सेल्फी.......असं फोटोसेशन करून ही सागराची नजाकत टिपत होते..... दगडावर बसून,उभे राहून,लाटेला बॅकला घेवून, गुळगुळीत खडकांवर बसून... फोटोग्राफी चालुच होती.जवळच छोटीसी गुहा आहे.......अथांग सागराचा आणि सुर्योदय आणि सुर्यास्ताचा नजराणा टिपण्यासाठी काठावरील  टेकडीचा अमेझिंग पॉईंट व्हयू केला आहे..
   कशेळी ग्रामपंचायतीने पर्यटनाला चालना देण्यासाठी या  स्पॉटचे रुपांतर बीच मध्ये केलेय.माथ्या पासून काठापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या  आहेत.काठापर्यत जाताना थकवा आला तर वाटेतच बसण्यासाठी  बाके आहेत..खाली उतरत उतरत सागर पहाताना मन हरकून जातं.
...आमच्या बरोबरच्या सर्वांनी विविध आकाराचे सागरगोटे आठवण म्हणून  सोबत घेतले.
निसर्गाचा आगळावेगळा आविष्कार  पाहून मन उल्हासित झाले.कशेळी गावातील सूर्यमंदीरही पहाण्यासारखे  आहे.
➿➿➿➿➿➿➿
      या बीच वर जाण्यासाठी पावस-पूर्णगडमार्गे कशेळी अथवा राजापूर अडिवरे मार्गे कशेळी... असं जाता येते
⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵

✒️श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे    वाई
https://raviprema.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड