शिक्षण महोत्सव २०१६

📢📢📢💥आता एकच धोरण...उभारूया गुणवत्तेचे तोरण💥

📢वाई तालुका शिक्षण महोत्सव सोहळा संपन्न

🎀प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत  वाई तालुका शिक्षण महोत्सवाचे आयोजन शुक्रवार दिनांक 25 नोव्हेंबर 2016 रोजी पंचायत समिती वाई येथे करण्यात आले.
प्रारंभी शैक्षणिक दालनांचे उद् घाटन सौ.पुनिता गुरव प्राथमिक शिक्षणाधिकारी सातारा जिल्हा परिषद,श्री आर.व्ही.सांगळे गटविकास अधिकारी वाई, श्री के.व्ही.म्हेत्रे गटशिक्षणाधिकारी व श्री व्ही.बी.मेमाणे शिविअ, सौ.जयश्री गुरव शिविअ व सौ.सुमन भोसले शिविअ आणि सर्व केंद्रप्रमुख  यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.157 प्राथमिक व माध्यमिक शाळेतील 217 उपक्रमशील शिक्षकांनी सहभाग घेऊन ज्ञान रचनावादावर आधारित विविध विषयांची 339  शैक्षणिक साधने व साहित्ये निर्मिती केली.शैक्षणिक तंत्राचे आदान प्रदान व शेअरिंग उत्तम झाले.भेटी देणारे लोक साधनाची निर्मिती व वापर कसा करायचा याची चिकित्सकपणे माहिती घेऊन  फोटो काढत होते तर काहीजण शुटिंग करत होते.उत्साही मुलेही साधने हाताळुन आनंद घेत होती.नवसाहित्यातून अनुभव घेत होती.
🍁🍁शिक्षण महोत्सवात दिवसभरात 1095 शिक्षक,पालक,शिक्षणप्रेमी नागरिक , पत्रकार,अधिकारी व विद्यार्थ्यांनी  महोत्सवास भेटी दिल्या.
🌴शैक्षणिक दालनांच्या 19 स्टाँल मध्ये नाविण्यपुर्ण, कृतियुक्त आनंददायी व स्वयंअध्यनावर भर देणारी  साधने होती.
 🎀काड्यांच्या सहाय्याने गुणाकार करणे
  🎀संपूर्ण संख्याज्ञान कोऱ्या  पाटीवर
🎀 नकाशा सदरे वापरून भूगोलाचा अभ्यास 
🎀भौमितिक आकारांची खिळाफळ्यावर ओळख
🎀सापशिडी
🎀शब्दबोध पाटी
🎀 चेंडू साखळी
🎀अपूर्णांक ओळख
🌴कोनमापन
🌴कँरम शिकवितो गणिती क्रिया
🌴उठावाचा नकाशा
🌴बहुउद्देशीय गणिती फलक
🌴खिळापाटीवर भूमिती संबोध
🌴चेंडू टाका संख्या बनवा
🌴खिळा फळा
🌴वाक्य डोंगर
💥बहुउद्देशीय झाड
💥मेकिंग वर्डस
💥बाँक्स खेळातुन वाक्यरचना
💥व्हेन वुईं लर्न लेसन
💥हिडन ट्रेजर आँफ व्होकँब्युलरी
🏵तराजुच्या सहाय्याने समीकरणाची उकल
🏵नकाशा वाचन स्वयंअध्ययन
🍭अभिव्यक्ती विकसित करणारी विविध साधने
🍭गणिती क्रिया संबोध
अशा विविध साधनांमुळे मुले प्रगत होण्यास मदत होईल.
आम्ही अशी साधने तयार करून  निश्चितच उपयोग करू.
      🌴 यावेळी श्री धनंजय चोपडे गटशिक्षणाधिकारी सातारा व त्यांचे सर्व केंद्र प्रमुख व उपक्रम शील  शिक्षकांनी व
 श्रीकांत जगदाळे शिक्षण विस्तार अधिकारी कोरेगांव  जावळी खंडाळा फलटण व इतर तालुक्यातून आलेल्या शिक्षकांनी शैक्षणिक दालनास भेट देवून समाधान व्यक्त केले.
💥💥🌴💥🌴💥🌴💥
          शब्दांकन
रवींद्र लटिंगे अभेपुरी वाई




Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड