माझी भटकंती रायरेश्वर सहल भाग क्र.चार


माझी भटकंती भाग-चार

   माझी भटकंती भाग-चार
माझी भटकंती भाग-चार




⛰️🌴माझी भटकंती⛰️🌴

      ✒️क्रमश:भाग चार

⛰️२५ वर्षांपूर्वीची वाशिवली    केंद्रसमुहाची रायरेश्वर पदभ्रमंती.......
       सन १९९५-९६ चा काळ
〰️➖〰️➖〰️➖〰️➖
       
⛰️⛰️आपल्या परिसरातील किल्ले तेथील ऐतिहासिक प्रसंग , रायरेश्वर मंदिर, तेथील लोकांचे राहणीमान,जंगलवाटा, आजूबाजूचा परिसर , गडावरील विविध ठिकाणं यांच्या प्रत्यक्ष प्रत्यक्ष भेटीतून इतिहासातील घटना व  प्रसंगाचे अवलोकन करता यावे .त्या काळातील गडकोटांचे महत्त्व समजावे या उदात्त हेतूने  तत्कालीन केंद्रप्रमुख श्री गुलाबराव गायकवाड  व रवींद्र लटिंगे यांच्या कल्पनेतून वाशिवली केंद्रसमुहातील सर्व विद्यार्थी व शिक्षकांची छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेल्या रायरेश्वरगडावर आयोजित केली होती....
सह्याद्रीच्या डोंगररांगांचे कुतूहलच भारी.काळापहाड,अवघड चढण तीव्र उतार व गर्द झाडीत लपलेली पायवाट..सारं काही मनाचा थकवा घालवून शारीरिक क्षमता ओळखायला लावणारा रांगड्या मातीचा वतनवारसा..त्यावेळी गडावर जाण्यासाठी खावली घेराकेंजळ, जांभळी व जांभळी पुलाच्या ठिकाणाहून पायथ्या पासून शिड्यांपर्यत डोंगर चढून जावे लागे.हल्ली ग्रामसडक योजनेमुळे खावली मंदिरा पासून घेराकेंजळ,पाकिरेवस्ती ते सातारा व पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या  ओहळी गावापर्यंत पर्यंत रस्ता झाल्याने..घाटातून वर माथ्यावर आल्यावर गाडीवाटेने पायऱ्या पर्यत सहज जाता येते...लोखंडी शिड्या चढल्याकी आपण रायरेश्वर गडावर जातो.
      त्यावेळी आजच्या इतक्या सुखसोयी नव्हत्या...शिड्यांचढून  माथ्यावर आलो.  सगळीकडेदिसणाऱ्या सह्याद्रीच्या  डोंगररांगांची ओळख प्रत्येक शाळेतील शिक्षक  मुलांना करून देत होते.
  तो पहा कमळगड,त्याच्यापुढे तो नवरानवरीचा डोंगर, रायरेश्वराच्या समोरील  केंजळगड,वाशिवली डोंगर रांग,भोर खोरे,धोम धरण ,पाकिरेवस्ती,कोंढावळे मुरा, भोरच्या बाजूच्या डोंगररांगा . पायवाटेने चालत  गायमुखावर आलो.त्याची माहिती गायकवाड साहेबांनी दिली.रायरेश्वर मंदिरात देवदर्शन केले रयतेचे राजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील स्वराज्याची शपथ या अविस्मरणीय  प्रसंगावर मुलांशी चर्चा केली. गडाचे ऐतिहासिक महत्त्व सांगितले.छत्रपती शिवाजी महाराज ....की जय ! हर हर महादेव ! अशा घोषणा करून ऐतिहासिक वातावरण निर्माण केले.तदनंतर तिथेच असणाऱ्या झाडाखाली बसून सर्वांनी भोजन घेतले.  मंदिरापासून  १ किमी वरील छोटेखानी  गुहा पाहून परतीचा प्रवास सुरू केला...
         या सहलीत माडगणी, तुपेवाडी,वासोळे,कोंढावळे, देवरुखवाडी,वाशिवली ,किरोंडे, जांभळी,पाराटवस्ती व वडवली शाळा सहभागी झाल्या होत्या.
    विशेष म्हणजे तत्कालीन गटशिक्षणाधिकारी श्रीमती प्रभावती चव्हाण मॅडम,श्री एम.के.वाशिवले विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख सहभागी झाले होते..
   आमचे शिक्षक सहकारी श्री बाळकृष्ण पंडीत सर व इतर सहकारी शिक्षकांनी स्वहस्ते बनविलेल्या मसालेभाताचा आस्वाद सर्वांनी घेतला होता.......
त्या जेवणाची अवीट गोडी
     अशा या  पदभ्रमंतीच्या  आठवणींना उजाळा त्यावेळच्या बातमी व फोटोने दिला.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
  क्रमश:भाग चार
दिनांक १५ एप्रिल २०२०

      ✒️श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई

Comments

Popular posts from this blog

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड