माझी भटकंती भाग क्रमांक--१७३ समाजभान जपायला मदतीचा हात देवूया| संवेदनशील भावनेने खारीचा वाटा उचलूया|| महाबळेश्वर मेटतळे परिसर चराचरांना संजीवनी देणारा पाऊस अचानक कर्दनकाळ ठरुन लोकांच्या डोळ्यातून आसवं गाळू लागला.मनं विषण्ण झाली. जुलै महिन्यातील २२व २३जुलै रोजीच्या कोसळलेल्या उच्चांकी अतिवृष्टीने सह्याद्रीच्या डोंगरांगात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या, पूरपरिस्थिती निर्माण झाली.रौद्ररूपामुळे नदीकाठच्या डोंगराच्या कुशीत पायथ्याशी राहणाऱ्या वाडीवस्तीत हाहाकार उडाला.काही ठिकाणी घरं जमीनदोस्त झाली.शेतीवर वरवंटा फिरला नदीकाठची शेती दगडधोंड्याखाली गाडली गेली.दळणवळणाच्या साधनातील छोटेखानी पूल उध्वस्त झाले.रस्ते खचले, घाटरस्ते दरडी कोसळल्याने बंद झाले. आंबेनळी घाट दुरुस्ती मुळे बंद असल्याने वाहनांना प्रवेश बंदी महाबळेश्वरातूनच होती. फक्त मदतकार्य करणारी छोटी वाहने मेटतळे पर्यत जात होती.विशेषत:महाबळेश्वर तालुक्यातील नदीकाठच्या, डोंगपायथ्याच्या , मध्यांवरच्या गावांना सर्वात झळ बसली.अशा लोकांना मदतीचा हात देण्यासाठी पुणे येथील स्वयंसेवी संस्था...