कोकण गोवा भ्रमंती कुणकेश्वर,देवगड

कोकण गोवा निसर्ग भ्रमंती,खाद्यसंस्कृती कुणकेश्वर,देवगड पर्यटन दिनांक ८ मार्च २०२१ क्रमशः भाग क्रमांक-१५ साधारणपणे रात्रीच्या आठच्या दरम्यान आमची सवारी काळोखात कुणकेश्वर कडे निघाली.गुगल मॅपच्या भरवशावर आणि वाटेतल्या दिशा दर्शक बोर्ड वाचून आमचा प्रवास चालला होता.गाव आल्याचं दिसताच नाव काय असेल ते दुकानाच्या पाट्या आणि नावाचा फलक बघताना आढळतं.लांबूनच "मिठबाव" नावाची पाटी दिसताच गाडी साइडला हळू घ्यायला लावून गावाच्या नावाच्या फलकाचा फोटो काढला.तेव्हा ध्यानात आलं की झी मराठी वाहिनीवरील गाजलेली मालवणी बोलीभाषेतील मालिका "गाव गाता गजाली" या मालिकेतील चित्रीत स्थळ असणारं गाव.पुढं वाटेतील एकाला विचारुन रस्ता बरोबर असल्याची खात्री केली. सारथी गाडी चांगलाच दामटवित होता.सपाट भागात चांगलाच वेग वाढला होता.पुढं राईट घेऊन गाडी उताराला लागली होती.समोरच कुणकेश्वर मंदिराची नेत्रदीपक रोषणाईत सजलेली आरास आणि मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या खांबावरील दिव्यांची ओळ नजरेस पडली.समुद्र किनाऱ्यावर अंधूकसा प्रकाश दिव्यांचा दिसत होता.एव्हाना नऊ वाजले होते.मंदिराजवळ पोहोचताच लगबगीने प्रवेशमार्ग...