Posts

Showing posts from September, 2020

फुलोत्सव काव्यरचना १०६

Image
🌸 प्रीत फुलांची फुलोत्सव 🌸 बागेतल्या फुलांनी  घराची शोभा वाढते  विविध रंग अन् सुगंधाने  माहोल उत्साही बनते ❗ नवगुलाबी रंग  प्रितीचा उमंग  डुले वाऱ्यासंग  मन पाहण्यात दंग❗ गुलाबी रंगाची नजाकत भारी  नजरेत भरली फुले सारी  प्रितीचा बहार स्पर्श हवा मनोमिलनाचा ध्यास नवा ❗ अतूट नातं निसर्ग अन् धरतीचं  स्वागत होतय सणवारांचं  फुलांचं रुप विविध रंगाचं  कोमल, नाजूक टपोरेपणाचं ❗ निसर्गाचा सोहळा फुलांनी सजतो  ऊन सावलीने रुप खुलवितो  फुलांचे सौंदर्य मन रिजवतो तनमनाला आनंदाने चिंब भिजवितो ❗ फुलांच्या उत्सवात..... कधी रजई पिवळी  कधी पैठणी निळी  कधी शालू हिरवा  कधी फेटा भगवा  ❗ फुलांच्या उत्सवात..... कधीकधी  शाल पांढरी  मोरपंखी रंगात नटली नवरी  कधी फुलोरा तांबडा,गुलाबी  त्याचा पुष्पगुच्छ झळके नभी ❗ श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प १०६ फोटो साभार श्री रत्नाकर थोपटे  यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https:// raviprema.blogspot.com

वेलाची नक्षी कविता १०५

Image
वेलाची नक्षी झाडांना गुरफटलाय गारवेल  सुबक दिसे हिरवीगार शाल  उपवनासारखा गालिचा पसरला  जाळीदार नक्षीचा डोंगर झाला || वढ्याच्या वघळीत वेल पिंजारला  मोठ्या झाडांना विळखा घातला  झाडांच्या फांद्या धूसर झाल्या  झाडं शोभे आकारात  आगळ्या|| श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प १०५ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https://raviprema. blogspot.com

पावसाचं आक्रंदन कविता १०४

Image
पावसाचं आक्रंदन  रात्रंदिन पाऊस कोसळला रानशिवारात बेभान पडला ओढे दुथडी भरून वाहिले आवेगाने पाणी रस्त्यावर उतरले|| सडकेवरुन वाहू लागले  वाढल्याने मार्ग बदलू लागले वाहतुकीला विराम आले दोन्ही कडे थांबावे लागले || पूरस्थिती निर्माण झाली पाण्याच्या वेगाने झाडं वाकली रस्त्यावर लालभडक पाणी आले  पावसानं धरतीवर आक्रंदन केले|| गाडी चालक  तुमच्या धारिष्ट्याला सलाम  तुमच्या अंदाजाला प्रणाम तुमच्या सारथ्याला सलाम  तुमच्या माणुसकीला सलाम || श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प १०४ फोटो गेल्यावर्षीचा आहे.

निसर्ग सौंदर्य कविता १०३

Image
निसर्ग सौंदर्य  गगनी मेघांची दाटीवाटी  ढग माथ्याला आनंदाने भेटी एकमेकांशी हितगुज करती निश्चल  जलधारा  बरसती  || अचानक वारे वाहती   भेट धूसर करती  लख्ख प्रकाश पडती  क्षणभर हर्ष  वाटती || निळ्या धवल रंगती  मधी हिरवी छटा उठावती  धरणी माय झळाळती  जल मोत्यावाणी चमकती || मुक्त सोंदर्याचा आविष्कार  नेत्री सुख शांती लाभती शुध्द ,स्वच्छ हवेचा परिसर  तनमनाला आल्हाद देती|| श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई  काव्य पुष्प १०३ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https://raviprema.blogspot.com

खेळ रंगला कविता १०२

Image
खेळ रंगला  टेकडीच्या पायथ्याशी क्रिकेटचा खेळ रंगलाय बसलेल्या मुलांच्या मनात ताळमेळ रणविकेटचा चाललाय || बॅटबॉल सगळ्यांच्या आवडीचा  उन्हातान्हात खेळण्याचा  टीमला चेर्अप करण्याचा  मस्ती , मजा अन् चिडाचिडीचा || मोकळ्या पटांगणात खेळ रंगतो नवा नवा  खेळण्या पेक्षा खेळाचा  निर्मळ आनंद हवा हवा || तहानभूक विसरतात मुलं खेळात रमतात एकमेकाला शिकवतात निकोप स्पर्धा करतात|| श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प १०२ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https://raviprema.blogspot.com

जीवनवाहिनी कृष्णामाई कविता १०१

Image
⛈️जीवनवाहिनी कृष्णामाई🌧️ चार दिवस संततधार पावसाने  मुसळधार बॅटिंग केली  धरण क्षेत्रात पाणीच पाणी करून जलाने सीमारेषा गाठली  || श्रावणातल्या सरी कोसळल्या ओढे नाले नद्या प्रवाहित झाल्या  पाझर तलाव बंधारे ओसंडले  जनजीवन विस्कळित झाले|| धरणातल्या विसर्गाने  पाणी आलय कृष्णातिरी  अवखळ झाली कृष्णामाई  पाऊस पडतोय सरीवर सरी || अचूक वेळी पडल्याने  पीकांना बहार आली  जमीनीत पातळी वाढली जलाची साठवण झाली|| श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प १०१ रचना दिनांक १७आॅगस्ट २०२० यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https://raviprema.blogspot.com

निसर्ग सौंदर्य कविता १००

Image
निसर्ग सौंदर्य आकाशी ढगांचे  पुंजके फिरती  वाऱ्याच्या झुळुकीने तनमन शहारती || आकाशी मेघ दाटले  पुंजके माथ्यावर आले ढग वाऱ्यांचा खेळ चाले  क्षणोक्षणी दृश्य बदले || कातळातल्या खिडकीचा तोरा   एलिफंट पॉईंट्सचा नजारा दुरुन बघण्याचा हर्ष खरा  घोंघावत नादाने वाहे वारा || गर्द हिरव्या डोंगररांगा घनदाट जंगलझाडी सभोवरी  अंथरले गवताचे गालिचे  रमणीय दृश्य दिसे कड्यावरी|| श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प १०० यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https://raviprema.blogspot.com फोटो साभार श्री बाळकृष्ण पंडित वाई

पिवळाई कविता ९९

Image
पिवळाई  हिरव्यागार गवत फुलात  सोनकी ,बरका बहरली  पिवळ्या धमक फुलोऱ्याने अचूक नजर वेधली  || हळद कुंकू लेवूनी सजली साज शृंगारात अवनी नटली सुंदरतेची बहार आली  सोनदुलई झळकू लागली || पितांबरी शालू भरजरी  रुप साजिरे लयभारी  नाजूक कोमल रानफुले भंडाऱ्याची तळी उधळे|| फुलपाखरं मुक्त विहरती फुलांसमे पिंगा घालती   हसती खेळती नाचती मस्ती करती वाऱ्यासंगती|| श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प ९९ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https://raviprema.blogspot.com

मायेची बाग कविता ९८

Image
         मायेची बाग मायेची पाखर,कष्टाची भाकर घामातनं शिंपले बागेचे मखर हिरव्यागार छटेची झाडं डवरली  लालभडक रंगाची फळे बहरली || गेंददार , टपोरी फळे लगडली चवदार रसना संचित झाली   मातेचे संस्कार दरवळू लागले  मातीचे रंग बीजात उतरले || कष्टाचे सिंचन ,मातीचा सुगंध मातेच्या मायेचा दरवळे गंध  वरखत अन् जीवामृताचा स्नेहबंध.  प्रयोगशील शेतीचा मम छंद || पिताजींचे कर्तृत्व आईचे मातृत्व तुमचं सामाजिक दातृत्व  त्यातून उभारले  नेतृत्व || श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प ९८

मेणवली घाट कविता ९७

Image
           मेणवली घाट  कृष्णेच्या काठावर घाट चंद्रकोरी मस्त दिसते उतरंड पायरी चौकोनी मंच वाड्याच्या समोरी घाट दिसे पारावरुन लयभारी || सिनेसृष्टीचे चित्रण स्थळ  गावाचं धार्मिक स्थळ मेणेश्वर देतो आत्मबळ   निसर्गरम्य पर्यटनस्थळ|| कृष्णामाईचं सौंदर्य घाटाने खुलवले झाडीचे बिंब जलात दिसले  प्रवाहित जल दर्पण झाले नयनरम्य दृश्य घाटाचे सजले|| घंटेचा निनाद आसमंती घुमे  घाट बघण्यात सगळेच रमे  पोरांचं डुंबण अन् सूर मारणं मजेत चेकाळत होतं पोहणं|| श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प ९७ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https://raviprema.blogspot.com

योगासने कविता ९६

Image
योगदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🏵️ योगासने 🏵️ थंडीचे दिवस सकाळची शाळा  मैदानावर उभारलाय योगाचा फळा योगासनाचा लागलाय लळा आरोग्यदायी सवयींचा फुलवू मळा ||   योगासने करुया  कमानदार शरीर बनवूया  प्राणायाम करुया मनःशांती मिळवूया|| वज्रासनात बसूया मनचक्षूने  बघूया उन्हं अंगावर घेऊया नवचेतना मिळवूया|| शाळेची रंगीबेरंगी खोली  वारली कला चितारली राऊळीचा कलश अंबरी  हिरव्या पिवळ्या डोंगररांगी|| श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प ९६ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी https://raviprema.blogspot.com

सप्तश्रृंगी माता डोंगर कडा कविता ९५

Image
सप्तश्रृंगी माता, डोंगर कडा  डोंगरकड्यात मातेचे मंदिर  पायऱ्यांची चढण वाट  नामस्मरण करत जायूया   राउळाचा पाहूया  थाट || थंडगार वाऱ्याच्या झुळूकीने  गारवा मिळतो जीवाला  सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनाने  समाधान  लाभतं मनाला || राकट कणखर कातळ पहाड  माथ्यावरी शोभतेय चंद्रकोर भटकंतीचा मार्ग खडतर  धाडसाने फिरायला पायजे जिगर || उन्हाळ्याच्या दिसात तहानतो जीव  तिखटमीठाच्या काकडीची घेवूया चव  उन्हाच्या झळ्याने अंग घामजले  उन्हाच्या चटक्याने डोके तापले||  सुंदर दृश्य नजरेस पडते डोंगरकड्याचे स्वरुप कळते  वाऱ्याच्या वेगाची जाणीव होते  मातेच्या दर्शनासाठी गर्दी दाटते|| श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प ९५ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https://raviprema.blogspot.com

बहार कारवीचा कविता ९४

Image
बहार कारवीचा  पांढर कळ्यातून  फुलदाणी फुलली निळसर फुलांची  सजावट झळकली | डोंगर कड्यात  उतारत्या रानात  कारवीच्या बनात हिरव्यागार पानात | निळ्याधवल पुष्पमाला  दिसे लायटिच्या माळा फुलांनी तोरण बांधले  वसुधेचे स्वागत केले | निळसर पुष्पांचा बहारदार नजारा  संगतीला धवल  कळ्यांचा  गजरा| श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प ९४ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी https:// raviprema.blogspot.com

निसर्ग सोबती कविता ९३

Image
       निसर्ग सोबती  घनदाट झाडीत भटकताना  पाखरांची किलबिलाट कानी येते  एकाएकी वाटेनं चालताना  पक्ष्यांची जोडी नजर वेधते हिरव्या पोपटी छटेची बहार  पानांपानांची नक्षी छानदार  पाखरं बागडती खेळती  फिरुन येवून चारा टिपती  निसर्गाचे संवर्धन सोबती  आकाशात झेप घेती  आनंदाची गुजगोष्टी करती   मुक्तपणे खग विहारती श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई  काव्य पुष्प ९३ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https://raviprema.blogspot.com

जिद्द बालमनाची कविता ९२

Image
     जिद्द बालमनाची  ध्यास माझा शिकण्याचा सुसंस्कारित होण्याचा  व्यक्तिमत्त्व विकासाचा  चांगला माणूस बनण्याचा  खडतर प्रवासात  अनेक खाचखळगे  ओलांडीन मी  संघर्षाचे जिणे आभासी जगात वास्तव जगण्याचा  माझ्या स्वप्नांना  साकार करण्याचा उंच भरारी  मी घेईन  कार्य कर्तृत्व  सिद्ध करीन मनाची उलघाल इतरांना न ठावे  बालमनातले वेध  मी का सांगावे? श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प ९२  फोटो साभार श्री रमेश जावीर सर

काव्य पुष्प-९१ मोबाईल

Image
मोबाईलशी मैत्री  मोबाईलच्या संगतीने गेला कंटाळा सहल,भटकंतीला बसलाय आळा फेसबुक-व्हाटसअप चॅटिंग संपर्क मोबाईलवर आठवणी लिहिण्यात गर्क|| यापूर्वी लिहा वाचायला वेगळे मार्ग  याच्यात एकत्र सगळेच वर्ग लाॅकडाउनच्या काळात किंमत कळली नातेवाईकांशी भेट  व्हिडिओ कॉलिंगने घडवली| एकलेपणात  खरी याचीच गरज आता फावला वेळ नाही उरत घरातल्या सर्वांची काळजी घेतोय घरीच राहून काम करतोय|       बोललकी लिहीतोय        कुतूहल वाढवतोय       नव नव शिकतोय      वेळ मजेत जातोय......| मानवतावादी दृष्टिकोन  ठेवून घरीच थांबलोय...  शारीरिक अंतर ठेवून    इतरांशी वागतोय.| श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई  काव्य पुष्प९१ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी https:// raviprema.blogspot.com

काव्यपुष्प- ९० स्ट्राॅबेरी

Image
         स्ट्राॅबेरी  रसरसीत लालचुटुक स्ट्राॅबेरी गिरीस्थानची प्रसिद्ध बेरी  हिरव्या पानांत शोभतेय भारी  पर्यटकांची आवडती बेरी || अवीट गोडी स्वादाची पल्प,क्रश सरबताची  चिक्की जाम चॉकलेटची  नानाविध पदार्थांची || आधुनिक तंत्र जोडीला  अपार कष्टाची साधना थंडगार हवेची किमया लाल मातीची रसना || आकर्षक सजावटीने   बहारदारपणे  मांडलेली  आंबटगोड स्वादाने ओतप्रोत भरलेली   हौसनं जाऊया  फिरायला रेंगाळणारी चव चाखायला || श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प ९० यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी https://raviprema.blogspot.com

विहीरीचे सौंदर्य कविता ८९

Image
🔆विहीरीचे सौंदर्य🔆 कलाकुसरीचे संगमरवरी चिरे  नक्षीदार जाळीदार खांब बहरे  पाच इमली आखीवरेखीव सदरे  कोरीव कामाचे सौंदर्य न्यारे || रेखीव पायऱ्या नक्षीदार विहीरीतलं जल थंडगार  अद्भुत कलेचा आविष्कार  नजरेत भरले कलेचे द्वार || लौकिक जागतिक वारसा स्थळाचा  बहारदार नजारा राणी विहीरीचा  उत्तम नमुना वास्तूकलेचा  ऐतिहासिक ऐश्र्वर्य संपन्नतेचा|| वास्तू बघताना देहभान हरपले  कुतूहलाने न्याहाळले नक्षीचे इमले    नयनरम्य दृश्ये कॅमेऱ्याने टिपले वास्तूशैलीचे कवतिक केले|| श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प ८९ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी https://raviprema.blogspot.com

मित्रवर्य वाढदिवसाच्या शुभेच्छा

Image
 आदरणिय श्री रविंद्र लटिंगे  सर (मुख्याध्यापक जि.प.शाळा कोंढावळे)  यांचे जन्मदिनानिमित्त  काही गोष्टी शेअर कराव्यात असे आवर्जून वाटते. तसे पाहता फार जवळचा सहवास,अती जवळचा संपर्क असे काहीही सरांचे बाबत नाही. पण एक मात्र खरे कि, मी वाशिवली येथे हायस्कूलला असलेपासून सरांना पाहिलंय. तेव्हा शाळेतील विद्यार्थ्यांचे पटांगणावर सर खेळ घ्यायचे. काही अंशी का होईना सरांचे काम तेव्हा पाहिले असेल. नंतरच्या काळात २००१ ला माझा प्रवेश शिक्षणक्षेत्रात झाला. तेव्हा श्री.लटिंगे सर नंतरच्या काळात पंचायत समितीमध्ये साधनव्यक्ती म्हणून सेवा पाहत होते. तेव्हा बर्‍यापैकी त्यांचेशी संपर्क यायचा.तेव्हा सर बर्‍यापैकी मोटिवेट करायचे.कारण सेवेत संधीची आशा नव्हती. मित्रा,अशा संबोधनाने हाक मारुन सर जीवनात आशा पेरायचे. आजही मित्रा हाच शब्द सरांचे ओठावर असतो. मागच्या काही काळात सरांची कोंढावळे शाळेत बदली झाली. आणी शाळेचा चेहरामोहरा बदला हे सदर परिसरात गेलेवर आणी तेथील माणसे भेटल्यावर  समजते. या वर्षी सदरील ग्रामस्थ यांचेमार्फत सरांचा उत्कृष्ट कार्याबद्दल यथोचीत  स्वागत-सत्कार होणार होता. पण ...

निसर्ग नेकलेस रोड कविता ८८

Image
🛣️नेकलेस रोड🛣️ गोलाकार वळणाची वाट मस्तच शोभतोय थाट  सुंदर नजारा घाटाचा  निसर्गाच्या आभूषणाचा || सह्यगिरीच्या रांगांचे  निसर्ग सौंदर्य मनोहारी  डोंगरकडे खुणावती  रानवाटा नजरेत भरी|| हिरव्यागार जंगलझाडीला तृणपात्यांची संगत लाभते  वाऱ्याच्या मंद झुळूकीने  बासरीची गुंज कानी येते || दळणवळणाची वाट पायथा माथा सांधते  निसर्गाच्या सहवासाची  मनी भूरळ घालते|| श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प ८८

आनंदाचे हास्य कविता ८७

Image
        आनंदाचे हास्य  पारंपरिक फुगडीच्या खेळानं       आनंदाच्या उकळ्या फुटल्या  रंगात आलेल्या फुगडीनं  नव्या हास्यसाजात नटल्या| बाईंच्या फुगडीचे चकार वाढले  मुलामुलींचे कुतूहल प्रगटले   निरागस आनंद चेहऱ्यावर झळकले  मुलांच्या ओठी हास्य उमटले | झिम्मा फुगडी आनंदाचे खेळ लय अन् ठेक्याचा जमतोय मेळ  लोकगीतांचा सजतोय मेळा श्रावण मासात उत्साहाने खेळा | बाईंच्या फुगडीने नजर वेधती  मुले-मुली हास्याने दाद देती  मुलींच्या मनात विचार दाटती  बाई माझ्या संग कधी खेळती | श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प ८६  यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी https://raviprema.blogspot.com फोटो साभार गुगल प्रतिकात्मक चित्र

बाल आनंद मेळावा कविता ८६

Image
बाल आनंद मेळावा 🥰🍭🍬🍫🥳 बालकांच्या कलेचा  मेळा सगळ्यापरी आहे  निराळा मनी त्यांच्या मोद हर्ष रुजावा हाच खरा आनंदाचा सोहळा || वेगवेगळ्या पदार्थांची दुकानदारी खाऊसाठी गर्दी खवय्यांची सारी मनोरंजक खेळांची मेजवानी  धमाल मजेची आनंदगाणी|| आनंदाला आले उधाण   टीम जमली फारच छान नृत्य बसवलं चित्रफित पाहून  सरावाची तालीम नाच करुन || मुलांना संधी मिळाली  कला सादर करण्याची  बहारदार अदा दिलखेचक लयबद्ध नाच मनमोहक|| नवरी नटली सुपारी फुटली  या गाण्याव पावलं थिरकली भंडारा उधळला आकाशी अन् लगीन लागलं बानूशी || नृत्याने ठेका धरायला लावला टाळ्यांचा गजर वाजायला लागला  रसिकांनी उत्स्फूर्त कडकडाट केला  वन्स मोअरचा ठेका सुरू झाला|| श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई  काव्य पुष्प ८६ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी https://raviprema.blogspot.com

नयनरम्य निसर्गातील गाव कविता ८५

Image
नयनरम्य निसर्गातील गाव धवल आकाशी मेघ दाटले डोंगररांगेला धुक्याने वेढले  नभ माथ्याला भेटायला आले निसर्गाचं न्यार  रूप बहरले || टेकडीवरच्या मखमली गवतानं हिरवेगार दिसती गालिचे  पावलं हळुवार पडती अलगद सिंचन होतेय जलधारांचे || गर्द फिक्कट हिरव्या छटा  धूसर दिसतायत घरांच्या वाटा पायथ्याला घरांची दाटीवाटी लाल पांढऱ्या रंगाची ठळक दाटी || चहुबाजूच्या  छटा हिरव्यागार  पाऊसधारांचे दृश्य बहारदार झाडांच्या तोरणांनी वाडी सजली  नव्या साजात चमकू लागली || श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प ८५  यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी https://raviprema.blogspot.com

निसर्गरम्य परिसर कविता ८४

Image
     निसर्गरम्य परिसर स्वराज्याचा साक्षीदार रायरेश्वर  प्रतिज्ञा प्रसंगाचे स्मरण होते, इतिहासाच्या पाऊलखुणा पायथ्याचे गाव अभिमानाने जपते || डोंगर गावाला सेतूनं जोडलाय  जवळी बंधारा बिलगलाय  एका रेघेत खांबांचीओळ  जलबांधाला फळ्यांची खोळ || धवल कळसाचे दर्शन होते झाडीनं गाव नजरेआड होते जलबांधाने शिवारशेती फुलते  गावागाड्याला समृद्ध करते || श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प ८४ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी htpps://raviprema.blogspot.com

गंमत जंमत कविता ८३

Image
गंमत जंमत  पायवाटेने वनात जाई  आकाशी दिसले पक्षी  उंचच उंच  डेरेदार राई  फांद्यांची जाळीदार नक्षी || वाटेतल्या फांदीनं नजर वेधली   मन बावरलं अल्लड झाले  फांदीचा मग झुमकूळा केला  मजे मजेचे झोके घेतले || लयबद्ध तरंग अनुभवले  आयुष्याचे झोके कळले क्षणभर मन बालक झाले  पारंब्याच्या झोके आठवले|| आवडत्या ठिकाणी जाणं  मन मानेल तसं भटकणं  रमत गमत परिसर बघणं  निसर्गाचा आनंद घेणं|| श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प ८३ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.htpps://raviprema.blogspot.com

बालमनातला पाऊस कविता ८२

Image
🌧️⛈️🌧️⛈️🌧️⛈️🌧️ बालमनातला पाऊस अल्लड पावसात चिंब भिजले सरींचा गारवा मनाचे झुले  अंग शहारून रोमहर्षक झाले  आनंदाने नाचू बागडू लागले  भिजण्याचा  आनंद लुटती  सरीवर सर टपटप नाचती  तनमनाची  पाखरं  बागडती  मजा,मौजमस्ती आस्वादती हर्षोल्हास पोरसवदा वयात  आनंद मावेनासा  गगनात  पावसाची रिमझिम बरसात गतकाळाची सय होते मनात लहानपणीचा सुखद आनंद काळजाच्या कुपीत रहातो  पावसाच्या शिडकाव्याने  अत्तराचा सुगंध दरवळतो ⛈️🌧️⛈️🌧️⛈️🌧️⛈️ श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प ८२  यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी htpps://raviprema.blogspot.com फोटो साभार श्री रमेश जावीर सर

शिक्षक कविता ८१

Image
५सप्टेंबर शिक्षकदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा❗🌹🍁💐          शिक्षक  राष्ट्राचा विकासक  शाळेचा अध्यापक  विद्यार्थ्यांचा शिक्षक पालकांचा मार्गदर्शक  संसर्गजन्य आजाराने  आमची शाळा बंद झाली विद्यार्थी शिक्षक नात्यात  नसती आफत आली  फळ्याला खडूचा खंड पडला मुलांचा किलबिलाट धूसर झाला  स्वच्छता,परिपाठ बंद झाला  घंटेचा निनाद स्तब्ध झाला  बाई मी, सर मी म्हणाल्याचा  कानी होतोय भास  मग फोनवरून संपर्क  साधला जातोय खास  स्वातंत्र्यदिनाला मुलांची     आठवण झाली  शारीरिक अंतर ठेवून       घरभेट घडली  सर शाळा कधी भरणार  हा एकच लडिवाळ सवाल  तुम्हीच तुमचे स्वयं अभ्यासक  घरीच करा अभ्यास अन् धमाल श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई  काव्य पुष्प ८१

आवडती गाणी कविता ८०

Image
🎼आवडती गाणी 🎼 मधूर सुर कानी येते धूनांची सूरावट  गुंजते  ह्रृदयात मन गुंतते थकवा कंटाळा दूरते|| मोहरुन मन झाले बावरे  मंत्रमुग्धतेने देहभान हरपले गाणं दिलखुलास रंगते वाद्यांच्या तालाने फुलले|| गाणं भावना खुलविते  मनीचा पिसारा फुलवते  ‌क्षणात माहोल बदलते  मन मोहरुन  दाद देते|| श्रवणाचा आनंदानुभव आनंदाचे क्षण करतो  आवडीच्या तालावर  भान हरपूनी नाचतो || श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प ८० यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी https://raviprema.blogspot.com

निसर्गातील रानमेवा कविता ७९

Image
निसर्गातील रानमेवा  फुलांतील पुष्परस शोषून  साठवणूक मकरंदाची मधाचं पोळं फांदीवर बांधलं वसती कामकरी माश्यांची गुंजारव करत  भ्रमंती करतात कणकण मध  मव्हात साठवतात आपण आयत्यावर  पायत करतो  मधाच्या पोळ्याव  डल्ला मारतो महू चघळून खाण्यात  खरीखुरी लय मजा  मधाच बोटं चाटून  खायला वाटते मजा  पोळं मधानं ओथंबलेलं रानच्यामेव्यानं भरलेलं   मध मधाळ चवीचं अस्सल निर्भेळ स्वादाचं  श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प ७९ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी https://raviprema.blogspot.com

बागेचा नजारा कविता ७८

Image
बागेचा नजारा  मनमोहक दृश्यांची रेलचेल उपवनात  तहानभूक हरपून फिरतो  उद्यानात || थुईथुई नाचणारं कारंजे  मनाला भुरळ घालते  जलाचे तुषार नाचरे बागेचे सौंदर्य सजवते || झुडूपांची रेखीव नक्षी  गोलाईतली नजरेत भरते  नाजूक सुंदर फुलझाडांची  बहारदार रंगावली शोभते || चोहीकडे हिरव्यागार पर्णराजी मखमली गवताची रजई  रमणीय स्थळी निवांत क्षणी सुखद गारवा मनाला दुलई|| श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प ७८  यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी https://raviprema.blogspot.com

सांजचा सागर कविता ७७

Image
सांजचा सागर   सोनेरी बिंब दिनकराचे ढगात पसरले रंग हळदीचे धवल रेषांच्या आकाशाचे  जादूई दृश्य दिसे सांजचे || नयनरम्य नजारा समिंदराचा  प्रवाहित जलतरंग लहरींचा   रुबाब देखणा दर्याचा   भान हरपून बघण्याचा || बघताना मन मयूर होते  आनंदाने फुलून नाचते अंबर सागराचे अतूट नाते रमणीय दृश्यांना येते भरते|| आजचं दृश्य उद्याची   सुखद आठवण होते  निसर्गाचे वैविध्य दर्शन  आनंदाचं उधाण आणते || श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प ७७ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी htpps://raviprema.blogspot.com