माझे डीएड कॉलेज क्रांतिस्मृती डीएड कॉलेज सातारा बॅचमेट
आमचे क्रांतिस्मृती अध्यापक विद्यालय , सातारा
मित्रांनो नमस्कार.क्रांतिस्मृती अध्यापक विद्यालयातील प्राध्यापकांनी दोन वर्षे आपल्यावर शिक्षणसंस्कार करून.व्यक्तिमत्त्वाचा विकास करून.गुणांची पारख करून आपल्या छंदांना क्रियाशील व्यासपीठावर देवून आपणास अध्यापक बनविले.आपला सन १९८८ साली स्मृतीग्रंथ निरोप समारंभात बाईडिंग केला.......एकमेकांचा निरोप घेऊन ग्रंथातील ४२ पानं आपापल्या घरी आली.परीक्षेचा रिझल्ट लागला... प्राथमिक शिक्षक पदांची वर्तमानपत्रातील जाहिरात वाचून प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळाकडे अर्ज केला..लेखी परीक्षा व मुलाखतीनंतर काहींची जानेवारी अथवा जुलै मध्ये प्राथमिक शिक्षक पदी नियुक्ती आदेश आला.काहिंना स्व: तालुका तर काहिंना परतालुक्यातील शाळेत हजर व्हावे लागले.दरम्यान काहीजण माध्यमिक शिक्षक झाले.तर काहीजण आवडीच्या क्षेत्रात पोलिस, सैन्यदलात गेले.दरम्यानच्या काळात एकमेकांच्या गाठीभेटी कारणपरत्वे होतच राहिल्या.. विशेषत प्रशिक्षणात, लग्नसमारंभ प्रसंगी व अधिघटनेच्या अधिवेशनात स्मृतीग्रंथातील पाने गाठीभेटी घेतच होती... दरम्यानच्या काळात सनई
चौघड्याच्या सुरात आप्तेष्टांच्या साक्षीने विवाहबद्ध झालो... व्यावसायिक उंची वाढविली डीएड चे काहीजण बी एड व एम एड झाले... आपल्यातील काही पाने अपघाताने काळाच्या पडद्याआड गेली... आपल्या पैकी बहुतेकांच्या शैक्षणिक कार्याची दखल व प्रशंसनिय काम दैनिक बातम्यांतून समजत होते. कुणाचे विद्यार्थी स्कॉलरशिप,स्पर्धापरीक्षा,क्रिडास्पर्धा ,स्व.यशवंतराव चव्हाण स्मृती स्पर्धा.आदीत चमकले..विविध स्तरावरील शिक्षक पुरस्कार आपल्या बॅचमेटला मिळाले..अभिमान वाटायचा.आपले उठावदार काम पाहून तुम्ही क्रांतिस्मृतीचे का? असं म्हणल्यावर समाधान वाटायचे.काहीजन आपल्या शिक्षक बॅंकेचे संचालक झाले...
अध्ययन अध्यापन सतत होणाऱ्या बदलांमुळे आपणास अपडेट रहावं लागतं.. तंत्रज्ञानाचा वापर अध्यापनात होवू लागला... आपण सगळे अन्ड्राईड मोबाईल धारक झालो.....आभासी संपर्काने जवळ येवू लागलो.आपल्या पुस्तकातलं "जिनियस पेज" बापू यांनी आपल्या नोकरीच्या शुभारंभ दिनी सन २०२० सालात शिक्षकग्रुप तयार केला....३२ वर्षांपूर्वीच्या स्मृतीग्रंथातील पाने एकमेकांशी हितगुज साधू लागली.

कमेंट करु लागली...गेट टुगेदर चा प्लॅनिंग सुरू झालं....
अन् कोविड १९ संसर्गजन्य आजारामुळे लॉकडाउन झाले.वर्क फ्राॅम होम.घरीच रहायला लागलं... साठवणीतल्या आठवणी बाहेर निघू लागल्या...अविने काल अचानक सर्वांचा ग्रुप फोटो टाकला.काल सगळे सजग होवून फोटोत स्वता: सह एकमेकांना शोधू लागले...अशोकने मस्टर तयार केले.३२ वर्षांनी पुन्हा एकदा ग्रंथाची पाने ग्रुपस्वरुपात पुनर्बांधणीने

एकत्र आली...नवबाईडिंग होवून फ्रेममधील स्थान हृदयात आले.आनंदांने फोटो घरातील सगळ्यांना दाखवत.आवडत्या ग्रुपवर फॉरवर्ड केले...प्रत्येकात काल चैतन्य सळसळत होते..दिलदोस्ती दुनियादारी आठवून... शेअरिंग सुरू झाले.... फोटो घरातल्यांना दाखवत अथवा स्वत: पहाताना.......
ह्याचा/ ह्याचे
🎥 सुंदर आवाज
कथा रंगवून सांगायचा
मोत्यासारखे सुंदर अक्षर
मस्तच गायचा
सुबक रेखाटन
गप्पिष्ट
फोटोग्राफीची आवड
सर्वांच्या परिचयाचा
सुंदर परिपाठ सादरीकरण
अभ्यासू व हुशार..
वाद्ये वाजवायचा
दररोज व्यायाम करायची
लय व्हॉलीबॉलची आवड
चुटकीसरशी प्रतिस्पर्ध्याला चितपट करायचा
मितभाषी
निवेदन छान करायचा
सर्वांच्या ओळखीचा
सहकार्य करायचा
तक्ते तयार करून देणार
एकांकिका सादर करायचा
सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी
चॅम्पियन
आशयघन निबंधलेखन
वाचनाची आवड
इतरांना सांघीक खेळायची - कौशल्य शिकवणार
वर्गप्रमुख
प्रकल्प,स्वाध्यायात सहकार्य
असे कितीतरी स्वभावगुण, नैपुण्यता व व्यासंग आदी बिरुदे नजरेसमोर आली..
कालचा दिवस चिरकाल स्मरणात राहिल..... मित्रहो धन्यवाद!
काल बापूने लिहायला सांगितलं म्हणून प्रयत्न केला...... शब्दांकन आवडले तर व्यक्त व्हा..
नाही आवडले माझ्याकडेच माझे शब्द राहू द्या.....

जुन्या आठवणींचे छान लेखन
ReplyDelete