माझी भटकंती गोवा भाग क्र ३५ ते ३७- गोवा

माझी भटकंती--- गोवा








⛵🛶⛵🛶⛵🛶⛵🛶⛵माझी भटकंती
             🖼️ गोवा 🖼️
क्रमशः भाग क्र-- ३५
दिनांक २९ मे २०१८
🌿🍁🌿🍁🌿🍁🌿🍁🌿
गोवा म्हणजे स्वप्न.मौजमजा, खवय्येगिरी आणि सागरकिनारे यांचा सुरेख संगम म्हणजे गोवा...जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ..कोणी मित्रांसोबत, फॅमिली सोबत,शाळा-कॉलेजच्या सहलीत जातात. वेगळीच मजा असते..मी इयत्ता दहावीत असताना पहिल्यांदा ट्रेनने गेलोय.. तदनंतर अनेकदा मित्रांसोबत व कुटूंबातील सर्वांबरोबर गेलोय.. देशी विदेशी पर्यटकांचे आकर्षण, निसर्गरम्य ठिकाण, सागराच्या काठावरील पोर्तुगीजांचा प्रभाव असलेले ऐतिहासिक राज्य...स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे, पर्यटकांची वर्दळ, समुद्रसफरी,,बीचवरील विविध इव्हेंट,चर्च  , मंदिरे,खाद्यसंस्कृती व नारळी पोफळीच्या बागा.
        भटकंती आणि हौस....
यासाठी गोवा ट्रीप.
गो-गोडवा
वा- वातावरणाची खासियत
 निसर्ग पर्यटन करीत  आनंदाचे क्षण साजरे करायचे....
   गोव्यात आपण  प्रसिद्ध कलंगुट बीच,पणजी शहर,दोनापावला बीच,जुने व नवे चर्च,मंगेशी मंदिर , शांतादुर्गा देवी मंदिर व समुद्र सफर.. आणखी एक-दोन बीच  पहातो......... याशिवायही जंगल सफारी , डोंगरदऱ्या, धबधबे व गडकोट ही सुध्दा प्रेक्षणीय स्थळे  आहेत.
     मी  मित्रपरिवार व कुटूंबासह गोवा फिरायला गेलो होतो.      आंबोली व सावंतवाडी करून रात्री उशीरा म्हापश्यातील एका गावात घरगुती बंगला घेऊन  राहिलो...
    सकाळी हर्षद( माझा मुलगा) आम्हाला जॉईन झाला...त्याची दुचाकी आणि आमची गाडी ..  सकाळी लवकर नाष्टा आटोपून आम्ही कलंगुट बीचकडे निघालो.... हल्ली मोबाईलमध्ये GPSअॅप सुरू करुन इच्छित स्थळ सिलेक्ट करून go व  start वर  क्लिक केलेकी आपल्या ठरविलेल्या लोकेशनवर कसं कसं जायचं  हे अगोदरच समजते...हे तंत्रज्ञान अजमावलकी सहलीत गाईडची उणीव क्वचित भासते.वीसेक मिनीटात आम्ही बीचवर पोचलो.... अलौकिक नजारा गोव्यातील एक नंबरचे प्रेक्षणिक स्थळ. भरपूर देशी विदेशी पर्यटकांची गर्दी, टी-शर्ट व हाफपॅन्ट पेहरावातील पर्यटक,  मजाच मजा.आनंदी आनंद,निखळ मनोरंजन,स्वच्छ व सुंदर बीच,  आबालवृद्ध सागराच्या पाण्यात वयविसरुन धमाल मस्ती करत होते. .लाटांच्या उसळीनंतर किनाऱ्यापर्यंतचत्यांच येणं. छान दृश्य दिसते. गंमत वाटते बघताना.काही जण कपडे नभिजवताही गुडघाभर पाण्यात ऊभं राहून आनंद घेतात.  बीचवरील खुप वेगवेगळ्या राईड करून आपण वेगळा अनुभव घेतो. मुलायम रुपये वाळूत खेळायला , फिरायला मजा येते...सागरात मनसोक्त पोहून किनाऱ्यावर सुर्यस्नान करणारेही भरपूर. सर्वत्र फोटोग्राफी सुरू...सेल्फिची हौस लय भारी.








क्रमशः भाग क्र. ३६

             कलंगुट बीच ते सापोरा फोर्ट प्रवास

एखादं नवीन जोडपं तिथ असेल आणि एकत्र फोटोसेशन करायचं असेलतर.. फिरीस्त्याला excuse me please म्हणत हाताने किंवा नजरेच्या भाषेत फोटो क्लिक करण्याची विनंती करतात.... ग्रुपमध्ये काहीवेळा एकाला सगळ्यांची पादत्राणे ,पर्स व पाणी बाटल्या यांचा संभाळ करत सागरकिनाऱ्यावरील सौंदर्याचा आस्वाद घ्यावा लागतो...जरा वेळाने तो ग्रुपमधील कोणाला तरी कॉल करतो...ये लवकर मजी मला बघायला जायला...शक्यतो हे काम अगोदर आलेले असतात ते हमखास करणार.आम्ही छान पैकी जोडीने व ग्रुपने विविध पोजमध्ये फोटोग्राफी केली.. फिरलो.निवांत बसून सागराला डोळ्यात साठवत होतो..निखळ आनंद घेतला.
   ...हर्षद फोंडा  येथील कंपनीत नोकरीला असल्यामुळे दर रविवारी तो विविध ठिकाणी भटकंती करायला जातो.. त्याला विचारले ,'इथं जवळपास एखादा किल्ला आहे का ? 'तो म्हणाला,होय सापोरा(चापोरा)फोर्ट आहे.दहा-बारा किमीवर आहे... समुद्रकिनारी आहे. सगळ्यांचा विचाराने आम्ही  तिकडे निघालो..तो पुढे त्यामागे आमची गाडी....
    थोड्यावेळात  ड्रायव्हरने अचानक गाडी बाजूला घेऊन थांबवली.तो खाली उतरून चाकं पाहु लागला..पाठीमागचं एक  बसलं होतं...ते पाहून म्हणाला, पंक्चर झालय चाक...लगेच त्याने हर्षदला फोन करुन परिस्थिती सांगितली.. आम्हीही गाडीतून खाली उतरलो...तोवर हर्षद आला.. पप्पूने जॅक लावून  चाक खोलायला सुरुवात केली. इतरांनी स्टेपनी काढली. हर्षद तसाच पुढे गेला...एका हॉटेलमध्ये चौकशी करून गाडीजवळ आला. पप्पूला म्हणाला पाठीमागे एक किमीवर दुकान आहे.इथं खोलत बसण्यापेक्षा तिथं स्टेपनी लावू आणि माघारी येईपर्यंत पंक्चर काढून होईल.मग पप्पू गाडी घेऊन  पंक्चर दुकानाकडे गेला.आम्ही चालत चालत गाडीच्या मागे...... दुचाकीवर  दोघे... पंक्चर दुकानाजवळ आलो..... ते काम होईपर्यंत नाष्टा करायला जवळच्या हॉटेलात  गेलो..नाष्टा करताना आपण फोर्ट बघून आल्यावर समुद्रसफर करुया का? असे  प्रशांतने विचारले.मी 'नको बाबा ' म्हणालो.. गेल्यावेळी शिक्षकमित्राबरोबर आलो होतो.त्यावेळी समुद्रसफर केली होती. लाईफ जॅकेट घातले होते.दोन-तीन किमी आत गेल्यावर.वळून माघारी येताना अचानक बोटीच इंजिन बंद पडल.बोट जाग्याव  डळमळायला लागली आमची घाबरगुंडी उडाली.भीती वाटाय लागली.
सभोवताली पाणीच पाणी.
जरावेळाने शेजारुन  जाणाऱ्या दुसऱ्या बोटमन कडून पाना  व डिझेल कॅन घेतला.... तदनंतर बोट सुरू झाली तेव्हा हायसं वाटलं.थरार अनुभवला..

  ती दोघेही हॉटेलमध्ये आली.ट्यूब खराब झालीय नवीन टाकायला सांगितल आहे...
     नंतर सगळेच गाडीकडे आलो.गाडीच काम झालं होत.जवळच एक काळ्या रंगाची ओपनजीप ( हंटिंग रायडर) होती.तिला पाहून मित्रांनी स्वता:ची असल्यासारखी मस्त पैकी फोटो काढले......

क्रमशः भाग क्र.३७

              सापोरा फोर्ट गोवा

     पंधरा वीस मिनिटांनी आम्ही सापोराफोर्टच्या पायथ्याशी पोहोचलो.
  तसेच खाली उतरून किल्ल्यावर  चालायला लागलो... उन रखरखत होतं...
आपल्या सारखा उंच पहाडावरील काळा कातळ नव्हता...जांभळ्या कातळातील किल्ला.खडकावरील किल्ला असल्याने ठिकठिकाणच्या ओबडधोबड पायऱ्या चढत प्रवेशद्वाराजवळ पाच एक मिनिटात गेलो.... तिथंला फोर्टच्या माहितीचा फलक वाचला. पोर्तुगाल काळातील बांधलेला फोर्ट.प्रवेश द्वारातून आत गेल्यावर तटबंदीच्या कडेकडेने फिरत फिरत दूरवर जाता येतं. पूर्वेचा समुद्रकिनारा ,बोटी आणि नारळाच्या झाडांचे दृश्य मस्तच दिसत होतं.सगळीकडे नजर जाईल तिथपर्यंत अथांग सागर दिसतो.  याला"दिल चाहता है  " किल्ला असेही म्हणतात.अमीरखानाच्या "दिल चाहता है" या  सिनेमाचे बरचसं  शुटिंग इथं झालेलं आहे त्यामुळेच हौशी पर्यटक हे लोकेशन पहायला आवर्जून येतात.इथं दारुगोळा व तोफेचे अवशेष बघायला मिळतात.... तटबंदी वरून सागर आणि आकाशाच दृश्य विविध अॅगलने पाहिलं की नजरहटेपर्यंत पाणीच पाणी..... भरपूर गर्दीच्या ठिकाणापेक्षा ज्याला शांतता, निवांतपणा असणारं ठिकाण. हवं असेल त्याने आवर्जून इथं भेट द्यावी.
घाईगडबड वव गाड्यांच्या कर्णकर्कश आवाजा पासून अलिप्तता ठेवणारं  ठिकाण....व्यस्त जीवनापासून निवांतपणा व विरंगुळा सागराच्या सहवासाने अनुभवायचं ठिकाण.चढ-उताराचा भाग आहे.फोर्टवर  बरीच भटकंतीची ठिकाणं आहेत.प्रत्येक ठिकाणचा वेगवेगळा लुक दिसतो. अनेकजण गटागटाने निवांतपणे गप्पामारत बसलेले दिसतात. 
     ज्यांना एकट्याने निसर्गाशी हितगुज साधत आसमंत सागराच्या साक्षीने  बघायचा आहे त्यांना  उत्तम ठिकाण. विरंगुळ्यासाठी विविध लोकेशन.तटबंदीवरुन बीचचे दिसणारे रुप, नारळाच्या झावळ्यांचा आवाज,पक्ष्यांचा किलबिलाट,अथांग निळे पाणी दूरवर आकाशाची आणि सागराची निळ्या रंगात सामावलेल्या दृढ मैत्रीचा होणारा भास...... कॅमेऱ्याने फोटोग्राफीला सुपर लोकेशन...फोर्टच्या तिन्ही बाजूला समुद्र.. विहंगम दृश्येच दृश्ये पहायला मिळते.शांततेत निसर्ग सौंदर्य पहायला, लोकेशन शुट करायला रम्य ठिकाण... सूर्यास्ताचा देखावा पहायला  अप्रतिम स्थळ.. आमच्या कडे वेळ कमी असल्याने व पुढील ठिकाणं पहायला जायचं होतं...पण इतरवेळच्यापेक्षा नवीन आणि शांतताप्रिय ठिकाण पहायला मिळाल्याने.मन तजेलदार झाले...
प्रवास दिनांक २९ मे २०१८

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड