बालपणीच्या आठवणी---कलाविष्कार क्रिकेट क्लब

बालपणीच्या आठवणी---- कलाविष्कार क्रिकेट क्लब


Add caption




🎖️🏅🥉🥈🥇🏆🎖️🏅

🥉🥈 बालपणीच्या आठवणी

🏏 कलाविष्कार  क्रिकेट क्लब

   📢  २१ व्या  टेनिस बॉल क्रिकेट सामन्याच्या आयोजनासाठी कलाविष्कार क्रिकेट क्लबची वाटचाल याविषयीचा वर्तमानपत्रातील लेख.          सन--२००२
➖➖➖➖➖➖➖➖➖ हॅलो  १९७५ साली  समवयस्क मित्रांनी एकत्र येऊन आझाद क्रिकेट संघ ,ओझर्डे या  संघाची स्थापना केली.पहिल्यांदा  सुताराकडून लाकडाच्या फळीची तयार केलेली बॅट आणि एकेक रुपया वर्गणी जमा करून घेतलेला रबरीचेंडूने मराठी शाळेच्या पटांगणावर व ओढ्यातील मोकळ्या जागेत मैदान समजून  सुट्टीच्या काळात खेळ खेळण्यास सुरुवात केली.      क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय सामने गावातील ग्रामपंचायतीच्या ऑफिसमधील टीव्हीवर  पाहताना गावस्कर, किरमाणी ,वेंगसरकर ,कपिल देव व इतर खेळाडू बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग कसे करतात  हे बघून  माझे मित्र त्यावेळी क्रिकेटचा खेळ खेळत असत.एकमेकाला खेळातील कौशल्य शिकवित असत. सर्वजण कुतूहलाने क्रिकेटच्या खेळाडूंच्या पोशाखाचे वर्णन गप्पा मारताना करीत असत. सर्वांच्या मनामध्ये त्यावेळी विचार यायचा की आपण या पेहरावात क्रिकेट खेळायला मिळाले तर कसे वाटेल .क्रिकेट खेळासाठी लागणारे साहित्य मिळवण्यासाठी,एकदा मराठी शाळेच्या मैदानावर सरावानंतर सर्वांची मिटिंग जमली होती.सिझन बॉलचे साहित्य खरेदी करण्यासाठी प्रत्येक जण पैसा कसा उपलब्ध करता येईल याच्यावर चर्चा करीत होते .वर्गणी काढायची तर सर्वांना पैसे कसे उपलब्ध होणार .आपले  कुणीही प्रायोजकत्व  स्विकारण्यास तयार  नव्हते. मग त्यावेळी सर्वांनी एकमताने ठरवलेकी सगळ्यांनी मिळून शेतीच्या कामाचा मारता घेवू या.रात्रीच्या वेळी शाळू  काढण्याचा मक्ता  घेऊन पैसे जमा करू या आणि आपल्याला लागणाऱ्या खेळाचे साहित्य खरेदी करू.याप्रमाणे खरोखरच सर्वजण इतरांच्या शेतात रात्रीच्या वेळी शाळू काढण्याच्या कामाला जात असत. खेळाची हौस भागवण्यासाठी शेतात काम करून जमविलेल्या पैशातून दोघातिघांनी  पुण्याहून साहित्य   खरेदी करून आणले.बॅटी, बाॅल,स्टंपस्,पॅडस् , टी-शर्ट,कॅपस व  इत्यादी साहित्य घेऊन आमचे मित्र आले त्यावेळी प्रत्येक जण साहित्याकडे आनंदाने आणि कुतूहलाने पाहत होता.साहित्य परिधान करत होता .साहित्य परिधान केल्यानंतर खेळताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. केलेल्या कष्टाचं चीज झाल्याचे सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होते .त्यावेळेस नेमके आमच्या गावची सोंगे महोत्सव कार्यक्रम सुरू होता आणि त्याच दिवशी रात्री "क्रिकेटच्या खेळाचं सोंग" आम्ही सादर करून गावातील सर्वांची वाहवा मिळविली होती.आणि 2002 च्या सोंगे  उत्सवामध्ये "लगान टीम सोंग"  सादर करून क्लबने यावेळी 21 वा वर्धापन दिन साजरा केलेला होता.की
सांस्कृतिक उत्सवाची परंपरा सर्वत्र वर्तमानपत्राद्वारे प्रसिद्ध झालेली होती
              21 व्या वर्षाच्या संघाच्या कामगिरीकडे  सिंहावलोकन करून पाहताना  आमचा क्लबने यशस्वीपणे वाटचाल केलेली दिसून येते.
गावात सार्वजनिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करणारे कलाविष्कार नाट्य मंडळाने   आमचे सामने प्रायोजित करून आम्हाला भरीव आर्थिक मदत केली होती. दरम्यानच्या काळात आमच्या क्लबचे ज्येष्ठ खेळाडू व सल्लागार श्री अशोक चव्हाण यांचे आकस्मित निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी क्लबने सभा आयोजित केली होती .. सर्वांच्या सहकार्याने व सर्वानुमते आपण त्यांच्या स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धांचे सामने आयोजित करुन श्रद्धांजली अर्पण करुया. तेव्हापासून  टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला कलाविष्कार क्रिकेट क्लबने सुरुवात केली .  या स्पर्धांचे पंच म्हणून कामगिरी पार पडणारे श्री भाऊसाहेब कदम श्री दीपक पिसाळ श्री गोविंद फरांदे व श्री  सिकंदर पठाण साक्षीदार आहेत . त्यानंतर काळाच्या ओघात आमच्या क्लबचे विकेटकिपर  राजेंद्र चव्हाण गुरुजी, समालोचक व सल्लागार  प्रदीप निंबाळकर व संस्थापक अध्यक्ष व कर्णधार उत्कृष्ट गोलंदाज राजेंद्र जाधव (गुळूंबकर)यांचे दुर्दैवीरित्या आकस्मित निधन झाले तद्नंतर या सर्वांच्या स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून त्यांची आठवण सतत रहावी म्हणून क्रिकेटचे सामने दरवर्षी भरविण्यात येऊ लागले. स्पर्धांसाठी प्रायोजक मिळणे त्यावेळेला आजच्यासारखे सोपे नव्हते परंतु ज्यांना आम्ही  हक्काने मदत मागितली विनातक्रार आम्हाला उदार अंतःकरणाने  भरीव आर्थिक मदत केली आहे. यामध्ये प्रामुख्याने कै. चंद्रकांत चव्हाण, कै.बाळासाहेब वाघ, कै नारायण कोदे ,श्री राजेश हिंदुराव पिसाळ,श्री प्रमोद निंबाळकर, श्री सुर्यकांत चव्हाण ,श्री मनोहर तुकाराम कामठे माजी सरपंच,श्री किशोर किसन तांगडे ,श्री विश्वजीत पिसाळ ,सरपंच सौ सुरेखाताई शेलार व इतर अनेक ज्ञात-अज्ञात क्रिकेटप्रेमींनी  या स्पर्धांसाठी आम्हाला भरीव आर्थिक मदत केलेली आहे. आमच्या क्लबने जिल्ह्यातील अनेक गावांमधील क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी होऊन ट्रॉफी व बक्षिसे  मिळवून गावाचे नांव उंचावण्याचा प्रयत्न केलेला आहे.
  "संघटन आणि शांततेसाठी क्रिकेट" या ब्रीद वाक्य सार्थ केल्याचे आम्हाला अभिमान आहे..
🖋️ शब्दांकन श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड