माझी भटकंती हरिहरेश्वर भाग- चोवीस ते पंचवीस
🌸🌱🌸🌱🌸🌱🌸🌱🌸
🛶माझी भटकंती🛶
क्रमशः भाग क्रमांक चोवीस
⛵ हरिहरेश्वर किनारा⛵
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️. प्रवास दि.८ जून २०१९
कोकणपट्टीतील निसर्गरम्य पवित्र तीर्थक्षेत्र एकाबाजूला डोंगर तर दुसऱ्या बाजूला नयनरम्य डोळ्यात न सामावणारा नयनरम्य समुद्रकिनारा .खडकांवर आदळत येवून फुटणाऱ्या लाटांची गंमत पहात , विविध आकारांच्या गुळगुळीत खडकांवर विविध पोजमध्ये फोटोग्राफी करण्याच आवडतं ठिकाण .. विलोभनीय निसर्गाचा आविष्कार दिसतो.
मित्र परिवारासोबत कोल्हापूर-आंबोली_सावंतवाडी-गोवा- सिंधुदुर्ग- रत्नागिरी-गणपुतीपुळे करून -महाडवरुन हरिहरेश्वर ला गेलो होतो.त्यावेळी प्रदर्शन मार्गातील समुद्र किनारा पहायचं राहिलं होतं म्हणून मुरुड जंजिरा करून खास हरिहरेश्वरला हा उदभुत लोकेशनवरील समुद्र किनारा पहायला आलो होतो..
सावित्री नदी जिथे समुद्राला मिळते तिथं मुखावर हे गाव असून पवित्र तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ आहे.अमर्याद व नयनरम्य समुद्रकिनारा.चार डोंगरदऱ्यांच्या कुशीत वसलेले आहे.डोंगराच्या पायथ्याशी हरिहरेश्वर मंदिर असून हरिहरेश्वर,कालभैरव सिध्दीविनायक व हनुमान अशी मंदिरे लगतच आहेत.उतरत्या छपराची मंदीरे आहेत.मंदिरापासून किनाऱ्यावर जायला सिमेंटचा रस्ता केलेला असून त्यावर साइडबार लावलेले आहेत. समुद्रकिनारा तीर्थ व कुंड नावाने प्रसिद्ध आहे.हरिहरेश्वरला रायगड जिल्ह्यातील दक्षिण काशी मानले जाते.पेशव्यांचे कुलदैवत आहे.अनेक आख्यायिका तीर्थक्षेत्राविषयी आहेत..
🛕🚩⛵🛕🚩⛵🛕🚩⛵माझी भटकंती
क्रमशः भाग पंचवीस
❄️हरिहरेश्वर बीच❄️
➖〰️➖〰️➖〰️〰️➖〰️➖
हरिहरेश्वर व कालभैरवाचे दर्शन घेतल्यावर एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी " प्रदक्षिणेचा मार्ग " डोंगर आणि खडकावरील पायऱ्या उतरून समुदकिनारी जावे लागते.या मार्गाने जाताना खडकांवरुन दिसणारे समुद्राचे सृष्टी सौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडते. व्ही आकारातून समुद्राची नजाकत बघायला फार मजा वाटते. अमेझिंग थ्रील पायऱ्या उतरून खाली जाताना वाटते. दोन्ही बाजूला उंचच उंच डोंगरकडा अन् मधून पायऱ्या उतरून किनाऱ्यावर जायचं.माथ्यावरुन समोर बीचचे दृश्य खुप छान दिसते.मग तेथून तीव्र उताराच्या पायऱ्याने खाली उतरलो... अप्रतिम सागर आणि
फेसाळणाऱ्या समुद्राच्या लाटा , लाटांचा नाद कानात घुमतो.खडकावर येऊन लाटा आपटतात.फेसाळत पाणी वर उडताना पाहून मजा वाटते.हे आगळ्यावेगळे संगीत आपण शांतपणे ऐकत रहातो.कुठला कुठला आणि कसा कसा फोटो काढावा इतकं अप्रतिम लोकेशन आहे.छोटेमोठे गुळगुळीत दगडगोट्यांवर उभे राहून सेल्फि व ग्रुपचे विविध पोजमध्ये फोटोग्राफी केली. पायच निघेना तेथून... समुद्राची,लाटांची आणि किनाऱ्याची दृश्ये मोबाईलमध्ये घेतली. पाण्यात पाय सोडून बसलो तर ओलेचिंब झालो.उन्हाचा सुखद गारवा मिळाला. तेथून माघारी फिरुन मंदिराजवळ आलो.श्री प्रशांत वाडकर ,श्री शिवाजी फरांदे व श्री सुनील जाधव ,श्रेयस फरांदे आणि मी होतो.धमाल आली.ही वेगळी समुद्राची नजाकत पाहून मन तृप्त झाले.गेल्यावर्षि हिरावलेला आनंद हा पाॅइंट पाहिल्यानंतर मिळाला..........
मंदिराजवळ छान पैकी कोकम व लिंबू सरबत घेऊन दुसऱ्या पाईंटकडे निघालो....एका बाजूला वाळू तर पायथ्याशी असणाऱ्या खडकावर येणाऱ्या लाटांमुळे फार मजा यायची.अगदी किनाऱ्या जवळील खडकांवर बसून समुद्राचे सौंदर्य न्याहाळताना विलक्षण आनंद वाटायचा......पुन्हा एकदा सर्व कुटुंबियांसमवेत फोटो काढून निसर्गाचा अनमोल ठेवा मनात साठवून परतीच्या प्रवासाला लागलो.....
💫🍂💫🍂💫🍂💫🍂💫🍂क्रमश:भाग पंचवीस
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https:// raviprema.blogspot.com
दिनांक--चार मे २०२०
..
Nice location and trip
ReplyDelete