माझी भटकंती प्रतापगड भाग क्र. २० ते २२
🐚माझी भटकंती🐚
क्रमशः भाग क्र वीस
एप्रिल २०१७
❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️
पेठपार,कुंभरोशी
➖➖➖➖➖➖➖➖
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ऐतिहासिक प्रसंग इयत्ता चौथीच्या वर्गात सौ.प्रभावती कारंजकर बाईंनी गोष्टीरुपाने नजरेसमोर उभे केले होते...प्रतापगडचा रणसंग्राम पोवाडा श्रवण केला होता.......... शिवप्रताप दिन...थरार आणि रोमांचकारी अनुभव ऐकताना येतो....
मी प्रतापगडावर प्रथमतः माझ्या ओझर्डे शाळेच्या सहलीत, मित्रांबरोबर व कुटुंबियांसोबत गेलोय..कोंढावळे शाळेची सहल घेऊन गेलोय
आमचे मित्र श्री उत्तम जरंडे यांची प्रशासकीय बदली वाडा कुंभरोशी येथे झाली होती.. तेव्हा त्यांच्या आग्रहास्तव मुक्कामी एप्रिल २०१७ मध्ये गेलो होतो......
आमचे मित्र श्री राहुल हावरे यांनी नवीन फोरव्हिलर गाडी घेतली होती.आम्ही ( श्री बाळकृष्ण पंडीत,श्री दिलीप कासुर्डे,श्री सुनील जाधव व मी ) नव्यागाडीसह देवदर्शन व पर्यटनासाठी सकाळची शाळा करुन मार्गस्थ झालो.....
वाई, पांचगणी महाबळेश्वर करत आंबेनळी म्हणजेच रडतोंडी घाटातून वळणावळणाच्या अवघड रस्त्याने निसर्ग सौंदर्य टिपत निघालो.......एका ठिकाणी गाडी थांबवली.विलोभनीय दृश्य दिसत होती.... घनदाट जंगल, चिंचोळ्या दऱ्या पहात फोटोग्राफी केली. हरोशी जवळच्या निसर्ग धाब्यावर आलो... चहापाणी घेतला. जरंडे सरांना फोन करून आम्ही हरोशी जवळ आलोय.तुम्ही पार फाट्यावर या आपण श्रीराम वरदायिनी मंदिर पहायला जायचय.असं सांगितले
थोड्यावेळाने फाट्यावर पोचलो. जरंडेसर व श्री सुरेश रवळेकर सर आले.आम्ही सर्वजण कोयना नदीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील पूल पाहिला.... उत्कृष्ट बांधकाम एवढी वर्षे झाली तरी जसाच्या तसा......पेठपार कडे निघालो..धनदाट निभिड अरण्यातील वाट .. वळणावळणाचा रस्ता.मनमोहक दृश्ये पाहून मनोमन आनंद वाटला... सरांनी गाडी देवळाजवळ पार्क केली... सुंदर मंदिर पहायला मिळाले.. सगळीकडे भगवे झेंडे फडकत होते...मी पहिल्यांदाच मंदिर पहात होतो.... प्रवेशद्वारातून आत गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिल्यावर नामघोष केला.सर्वजण नतमस्तक होऊन वंदन केले..
मंदिरात गर्दी होती.... चौकशी केली तेव्हा समजले.ताजी यात्रा आहे... थोड्यावेळाने श्रीरामवरदायिनी मातेचे दर्शन घेतले... छान,सुंदर मंदिर.सभामंडप व गाभारा..ऱ्य््मंदिराच्या गाभाऱ्यात सिंहासनावर दोन मुर्ती आहेत.डाव्या बाजूची अडीच फूट उंचीची श्री वरदायिनी देवीची मूर्ती तर उजवीकडे तीनफुट उंचीची श्रीराम वरदायिनी या नावाने ओळखली जाते.प्रभु रामचंद्रांना वर देणारी माता....मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी शैलीचे असून कळसासहित सुशोभीकरण केले आहे.घनदाट वनराईने नटलेल्या पेठपार गावात निसर्गाने मुक्तहस्ते सृष्टीसौंदर्य या परिसराला बहाल केले आहे.येथील नवरात्रोत्सव थाटामाटात साजरा केला जातो.
मंदिराच्या एका बाजूला तटबंदी तर दुसरीकडे जंगल सुरु होते.एकाबाजूला ओढा व शेती आहे. परिसरातून प्रतापगडाचे दर्शन होते.
दुसरीकडील प्रशस्त जागेत मंडप उभारण्याचे काम सुरू होते.
पेठपार येथील श्रीराम वरदायिनी मंदिरापासून काही अंतरावरच जंगल सुरु होते.मंदिराच्या पाठीमागे सायंकाळचे निसर्गसौंदर्य न्याहाळता प्रतापगडाकडे लक्ष गेले.दुर गड दिसत होता..या गावातून एक वाट प्रतापगडावर जाते.असं मित्राने सांगितले.. सुंदर आणि तिन्ही सांजेच्या वेळचं मनोहारी दृश्य मोबाईल मध्ये टिपले .व परत कुंभरोशीत आलो...जरंडे सर व रवळेकर सर तिथेच मुक्कामी रहात होते.तिथे पोहचलो.बऱ्याचदिवसांनी एकत्र आलो होतो.. गप्पागोष्टी सुरू झाल्या... इथल्या जुन्या आठवणीचि मनसोक्त आस्वाद घेतला.त्यावेळी आम्ही इथच रात्रीच सामिष जेवण सर्वांनी मिळून बनविले होते. यावेळी मात्र आम्ही सह्याद्री हाॅटेलवर मस्तपैकी जेवण केले.चेष्टामस्करीकरत झोपी गेलो...........
दिवशी सकाळी आवराआवर करून सरांच्या शाळेत जाताना एक अप्रतिम दृश्य पहायला मिळाले.शिवज्योत व पालखीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा घेऊन शिवभक्त अनवाणी पायाने चालत होते.श्रद्धा व भक्तीचा अलोट संगम दिसून आला.
'शूर आमी सरदार आमाला काय कुणाची भीती 'आणि महाराजांनी "गनिमीकावा" या युद्ध तंत्रांचा समर्पक वापर करुन स्वराज्यावर आलेल्या संकटाचा युक्तीने कसा फडशा पाडला होता... ........तोपर्यंत आमची गाडी गडाच्या पायथ्याशी पोहचली... बुरूजावर भगवा झेंडा दिसला . सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय...
लेखन दिनांक २५एप्रिल२०२०
असा जयघोष करीत गडाच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली.... महादरवाज्यातून आम्ही गडावर आलो. माचीवरुन जाताना चौकोनी आकाराचे पाण्याचे टाके दिसले.. तुळजाभवानी मंदिरात देवदर्शन केले.सभामंडप, नगारखाना , दीपमाळ व छोट्या तोफा पाहुन हस्तकला केंद्रात गेलो...स्टीकर घेतले.. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकानातून पुढेपुढे पायऱ्या चढत गेलो. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पाहिल्यावर आम्ही नतमस्तक झालो... ऐतिहासिक प्रसंग डोळ्यांसमोर आला.तिथून तटबंदी कडे फिरत फिरत गेलो... तटबंदी वरून दऱ्याखोऱ्यांचा डोंगररांगांचे सौंदर्य अप्रतिम दिसत होते..उन्हात भटकायची सतत सवय नसल्याने अंगातून घाम निथळत होता.अंगाची लाहीलाही झालेली .कडकच ऊन लागत होतं.छत्रपती शिवाजी महाराज
निस्सीम श्रद्धास्थान भक्तीस्थान प्रेरणास्रोत
स्फूर्तीस्थान आहेत.त्यामुळे घामाच्या थेंबाची तमा न बाळगता तटबंदी पाहिली.... छानपैकी फोटोग्राफी करत करत ..परत माघारी पुतळ्याजवळ आलो. निघालो....एका हॉटेलमध्ये छान वॉश घेवून यथेच्छ ताक पिलं .आंबुळक्या खाल्ल्या.कारण भुकेची जाणीव झाली होती......गड सरसर भरभर उतरून खाली पायथ्याला आलो......निसर्ग हॉटेलवर यथेच्छ भोजन करून .... परतीच्या प्रवासाला लागलो...... महाबळेश्वर मध्ये स्ट्राॅबेरी चिक्की व चणे घेतले.गुरेघर येथील मॅप्रो गार्डन मध्ये भटकंती करून बग्गीत,स्टॉबेरी मॉडेलमध्ये फोटो काढले... तिथं बनविलेले धबधबे व कारंजे पाहून आळस व थकवा गेला....लॉनवर निवांतपणाने बसलो.. मस्तपैकी बटरस्कॉच आईस्क्रीम खाल्ले..तेथील काऊंटरवर सॅम्पल टेस्ट करुन चॉकलेट, ज्युस , क्रश व जाम खरेदी केला.....भिलार,पाचगणी व पसरणी घाट उतरून वाईत पोहोचलो....
धन्यवाद साथिओ❗
काही आठवणी विसरता येत नाय
काही नाती तोडता येत नाय
दोस्ती विरंगळ्याच नातं हाय
साथीने आनंद मिळवायचा हाय
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
🖋️२५एपिल २०२०
https://raviprema.blogspot.com
🐚माझी भटकंती🐚
क्रमशः भाग क्र एकवीस
🍁⛰️. पेठपार कुंभरोशी व प्रतापगड🍁⛰️
एप्रिल २०१७
एप्रिल २०१७
❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️
दिवशी सकाळी आवराआवर करून सरांच्या शाळेत जाताना एक अप्रतिम दृश्य पहायला मिळाले.शिवज्योत व पालखीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा घेऊन शिवभक्त अनवाणी पायाने चालत होते.श्रद्धा व भक्तीचा अलोट संगम दिसून आला.
शाळेचे बाह्यांग रेखाटन,बोलक्याभिंती.आवश्यक तिथे सुविचार व तक्ते रेखाटन,वर्गांत तारांगण.... सुसंगत रंगछटा दुर्गम भागातील शाळेतील शिक्षकांचे उठावदार काम पाहून कौतुक वाटले.
तेथून कुंभरोशी स्टॅडवरील हॉटेल मध्ये मिसळ पाव खाल्ला..व वाडाकुंभरोशी मार्गाने प्रतापगडावर निघालो.
गाडीतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथल्या ऐतिहासिक प्रसंगावर शेअरिंग सुरू झाले.शिवाजीराजे व अफजलखान भेट कुठे झाली असेल.खान कुठून गडाखाली आला असेल, शामियानात अफजलखानाचा वध प्रसंग,सैन्य कुठं लपलेलं.......आत्ताच आपल्याला एवढ झाडी पाहिली तर भीती वाटते ,त्याकाळात गर्दझाडीतील वाटा, घनदाट जंगल आणि हिंस्र श्वापदांचा वावर ,मावळ्यांचा रांगडा आवेश'शूर आमी सरदार आमाला काय कुणाची भीती 'आणि महाराजांनी "गनिमीकावा" या युद्ध तंत्रांचा समर्पक वापर करुन स्वराज्यावर आलेल्या संकटाचा युक्तीने कसा फडशा पाडला होता... ........तोपर्यंत आमची गाडी गडाच्या पायथ्याशी पोहचली... बुरूजावर भगवा झेंडा दिसला . सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय...
लेखन दिनांक २५एप्रिल२०२०
🐚माझी भटकंती🐚
क्रमशः भाग क्र.बावीस
🍁⛰️. प्रतापगड 🍁
एप्रिल २०१७
➖➖➖➖➖➖➖➖
छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेवअसा जयघोष करीत गडाच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली.... महादरवाज्यातून आम्ही गडावर आलो. माचीवरुन जाताना चौकोनी आकाराचे पाण्याचे टाके दिसले.. तुळजाभवानी मंदिरात देवदर्शन केले.सभामंडप, नगारखाना , दीपमाळ व छोट्या तोफा पाहुन हस्तकला केंद्रात गेलो...स्टीकर घेतले.. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकानातून पुढेपुढे पायऱ्या चढत गेलो. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पाहिल्यावर आम्ही नतमस्तक झालो... ऐतिहासिक प्रसंग डोळ्यांसमोर आला.तिथून तटबंदी कडे फिरत फिरत गेलो... तटबंदी वरून दऱ्याखोऱ्यांचा डोंगररांगांचे सौंदर्य अप्रतिम दिसत होते..उन्हात भटकायची सतत सवय नसल्याने अंगातून घाम निथळत होता.अंगाची लाहीलाही झालेली .कडकच ऊन लागत होतं.छत्रपती शिवाजी महाराज
निस्सीम श्रद्धास्थान भक्तीस्थान प्रेरणास्रोत
स्फूर्तीस्थान आहेत.त्यामुळे घामाच्या थेंबाची तमा न बाळगता तटबंदी पाहिली.... छानपैकी फोटोग्राफी करत करत ..परत माघारी पुतळ्याजवळ आलो. निघालो....एका हॉटेलमध्ये छान वॉश घेवून यथेच्छ ताक पिलं .आंबुळक्या खाल्ल्या.कारण भुकेची जाणीव झाली होती......गड सरसर भरभर उतरून खाली पायथ्याला आलो......निसर्ग हॉटेलवर यथेच्छ भोजन करून .... परतीच्या प्रवासाला लागलो...... महाबळेश्वर मध्ये स्ट्राॅबेरी चिक्की व चणे घेतले.गुरेघर येथील मॅप्रो गार्डन मध्ये भटकंती करून बग्गीत,स्टॉबेरी मॉडेलमध्ये फोटो काढले... तिथं बनविलेले धबधबे व कारंजे पाहून आळस व थकवा गेला....लॉनवर निवांतपणाने बसलो.. मस्तपैकी बटरस्कॉच आईस्क्रीम खाल्ले..तेथील काऊंटरवर सॅम्पल टेस्ट करुन चॉकलेट, ज्युस , क्रश व जाम खरेदी केला.....भिलार,पाचगणी व पसरणी घाट उतरून वाईत पोहोचलो....
धन्यवाद साथिओ❗
काही आठवणी विसरता येत नाय
काही नाती तोडता येत नाय
दोस्ती विरंगळ्याच नातं हाय
साथीने आनंद मिळवायचा हाय
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
🖋️२५एपिल २०२०
https://raviprema.blogspot.com
Nice
ReplyDelete