आमची शाळा आमचे उपक्रम अभिरूप बाजार

अभिरूप मंडई,बाजार प्राथमिक शाळा अभेपुरी येथे संपन्न. मुलांनी शेतातील भाज्या,फळे,चिक्की,शेंगदाणे लाडू,भेळ,बासमती तांदूळ व खाऊचे पदार्थ विक्री साठी आणून वस्तू खरेदी व विक्री चा मनसोक्त आनंद घेतला.🍆🍅🍍🌶🍆🍅🍍🍒
प्राथमिक शाळा अभेपुरी मार्केट डे ( बाजार ) संपन्न
अभेपुरी, वडाचीवाडी,पाचपुतेवाडी व धोम शाळेतील सर्व मुलांनी व शिक्षकांनी घेतला आठवडाबाजाराचा आनंद.
🍭शाळेत शिकलेल्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करता यावा,मुलांना बाजारातील  खरेदी..विक्रीचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा.प्राप्त ज्ञानाचा कृतीतून अनुभव, कौशल्य विकास,मालाची विक्री व खरेदी व्यवहार कसा करतात.  कोणत्या वस्तू नखांवर, डझनभर,किलोमध्ये,लीटरवर व अंदाजे विकतात यांची माहिती मिळावी. वस्तुंचे मापन ,दर याची माहिती.आपल्या घरचा बाजारहाट कोण कसा करते इत्यादी बाबीची प्रत्यक्ष माहिती होण्यासाठी बाजाराचे आयोजन आज केले होते.
बहुतांशी मुलांनी शेतातील फळभाज्या,फळे,पालेभाज्या,कांदा मुळा,बासमती तांदूळ., राजगिरे,व घरीच तयार केलेल्या भाजक्याशेंगा ,
चिक्की,खारेशेंगदाणे, हरभरा, फरसाण भेळ,.व शेतातील शेवग्याच्या शेंगा,मेथी व सुकी फळे इत्यादी वस्तु अथवा पदार्थ विक्री साठी उपलब्ध होते.
🍎महिला पालकांची उपस्थिती लक्षणीय होती.त्यांनीही भाजी खरेदी केली.
साधारणपणे पाच हजारांची उलाढाल झाली.
🍍मुलांनी खाऊ खरेदी केला.व बाजारात असल्याचा आनंद घेतला.
🍇मुलांनी त्यांना आलेले अनुभव शिक्षकांशी शेअर केले.
काही पालकांनी सर दर शनिवारी अशी मंडई आयोजित करण्याची सूचना केली.



🍏🍎🍎🍐🍊🍋🍏🍎

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड