आमची शाळा आमचे उपक्रम-कलाविष्कार मेळावा अभेपुरी

🎭 .           कलाविष्कार मेळावा अभेपुरी



कलाविष्कार मेळावा
 दिनांक २३ फेब्रुवारी २०१७💃🏼🎭💃🏼🎭💃🏼🎭💃🏼
    अभेपुरी शाळेचा कलाविष्कार मेळावा बहारदार वातावरणात संपन्न झाला.
कलाकारांच्या तालबध्द व दिलखेचक  पदलालित्याने रसिकांची मने जिंकून त्यांना ठेका धरायलालावला .
अवघी अभेपुरी नगरी विविध नृत्याविष्काराने आनंदी झाली.
🎭कार्यक्रमाची सुरुवात उपसरपंच श्री रविंद्र मांढरे,शाळाव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रामदास गुरव व शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्री
विजय मांढरे यांचे हस्ते श्रीफळ वाढवून झाली.
💐ईशस्तवन,स्वागतगीताने व देशभक्तीपर समूहगीताने कलेचा माहोल निर्माण केला.
🎹हार्मोनियची साथ सौ.शारदा शिंदे मँडम यांनी दिली.
🎵गजानना गणराया या गाण्यावर आर्या,शनि या कलाकारांनी दिलखेचक नृत्य  केले.
🎷कोणास ठाऊक कसा,पण सर्कशीत गेला ससा डान्स बहारदार केला.
🇨🇮इंडिया वाले या गाण्याच्या  ठेक्यावर मुलानी लयभारी डान्स करुन प्रेक्षकांची कौतुकाची थाप मिळविली.
🎵मल्हारवारीने सर्व देव..देवता नाचत नाचत आले.
💃🏼💃🏼पिंगा ग पोरी पिंगा या गाण्यावरील डान्सने रसिकांची वाहवा मिळविली
🌷🌷पापा ओ पापा या डान्सने तर सर्व पालकांचे डोळे ओले झाले.छोट्या कलाकारांनी बेस्ट परफाँर्म दिला.
🎻🎷कुऱया चालल्या रानात या गीताने ग्रामीण लोकजीवनाचे दर्शन झाले.
🗡🗡 ती तलवार या शाहीरी पोवाड्यातील कलाकारांनी बहारदार डान्स करून प्रेक्षकांना बक्षिसांची खैरात करायला लावले.
💃🏼💃🏼सेव्ह गर्ल ,शुभंकरोती कल्याणम व स्वच्छ भारत या नाट्यछटांनी सामाजिक प्रबोधन केले.
🎭रिमिक्स कृष्ण जन्मला या गाण्यावरील पदलालित्याने,लय व तालबध्द नजाकतीने व दिलखेचक नृत्य सादर करून प्रेक्षकांनी वन्समोअर वन्समोअर असा ठेकाच धरला.
⚔झिंग झिंग झिंगाट,गोंधळ गीत ,बजने दे धडक,मैंने पायल ही झनकाई व देश रंगिला या रेकॉर्ड डान्स ने विविध अविष्कार सादर केले.
⚔⚔या भगव्याचा रंगच न्यारा या गाण्यावरील मराठमोळ्या डान्सने प्रत्यक्ष शिवशाहीचे वातावरण होवून.छत्रपती शिवाजी महाराज व आऊसाहेब यांच्या
दरबारी आगमनाने चैतन्यमय वातावरण झाले.
शिवाजी महाराज की जय जय शिवाजी,जय भवानी अशा ललकाऱ्या देवून आनंद व्यक्त केला.
💃🏼ढोलकीच्या तालावर
असं वाजवाकी रात जागवा
आमी नाय जा.....
साताऱ्याची गुलछडी या लावण्यांनी प्रेक्षकांना ठेका धरायला लावला,रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
🇭🇺वंदे मातरम् या डान्सने मुलांचे देशप्रेम विविध डान्सप्रकारांनी सादर करून कलाविष्कार कार्यक्रमाचा समारोप केला.
🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सौ.वर्षा काळे,श्री शशिकांत कदम,श्री राजेंद्र क्षीरसागर सौ.शारदा शिंदे  व मुख्याध्यापक रविंद्रकुमार लटिंगे व शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी  बाल कलाकार व पालकांनी विशेष सहकार्य केले.
🎤🎼🎧गुरव साऊंड सिस्टिम ,अभेपुरी
यांची साऊंड सिस्टिम , इस्टमनकलर लाईट इफेक्ट
व रंगमंच नेत्रदीपक सजविला होता.
🎹🎼🎧🎤🎭🎺🎸🎭
शब्दांकन  श्री रविंद्रकुमार लटिंगे

Comments

  1. जुन्या आठवणीतला उपक्रम

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड