आमची शाळा आमचे उपक्रम-कलाविष्कार

कलाविष्कार मेळावा कोंढावळे दिनांक १८ नोव्हेंबर २०१८







प्राथमिक शाळा कोंढावळे व देवरुखवाडी शाळेचा श्री सालपाई
वरात्रोत्सवा निमित्त बाल आनंद मेळावा विविध गुणदर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रम  सादर करुन प्रेक्षक पालकांची वाहव्वा मिळविली.
  बांधुनी तोरण
आनंदाचे ,कलाविष्कारांनी हा दिन साजरा व्हावा ।
बालकांचे मन इथे रूळावे ,तयांना आनंदी आनंद मिळावा ।
अशा आनंदीमय कार्यक्रमाची सुरुवात हीच अमुची प्रार्थना, अन् हेच आमुचे मागणे ,माणसाने माणसाशी माणसासम वागणे  या गाण्याने केले.स्वागतगीताने सर्वांचे स्वागत केले.🎭मराठी गौरव गीताने पारंपारिक लेझीम नृत्याची झलक दाखविली.
💥कलाविष्कारामध्ये शाहिरी पोवाडा ती तलवार आण पुन्हा रे, व धर सोन्याचा नांगर हाती या छत्रपती शिवरायांच्या गौरवशाली गीतांवर समुहनृत्ये सादर करुन पालकांची टाळ्यांच्या गजरात शाबासकी मिळविली.
🎭देवीची गाणी,लोकनृत्य, गोंधळ, छबिना व जय मल्हार गाण्यावरील मुलांच्या नेत्रदीपक  सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली. स्वच्छतेचे संदेश देणारे नाटक,बडबडगीतांवरील लहान मुलांची नृत्येही बहारदार झाली. लावणी,भजन ,पारंपरिक व रिमिक्स च्या ठेक्यावरही डान्स करून पालकांची वाहव्वा मिळवली.
👨🏻‍✈देशभक्ती पर गाण्यांवर डान्स करुन सैनिकांनी व शहीदवीरांनी दाखविलेल्या शौर्या बद्दल  अभिवादन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक ग्रामस्थ ,नवरात्र उत्सव सेवेकरी मंडळ,व शिक्षक सौ वर्षा पोळ,सौ संगिता सोनावणे, श्री संजय  पांढरे,श्री दीपक मोहिते  यांनी सहकार्य केले

Comments

  1. छान कार्यक्रम सादर

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड