नाविन्यपूर्ण उपक्रम समूह नृत्य

🎭        आनंदी आनंद, मजेत नाचूया 🦚

🦋🦋🦋🦋🦋🦋
🔰✒️ मुलांच्या भावविश्वात काय दडलेलं असतं याचा उलगडा आपणाला लगेच होत नाही.त्यांना सतत कामात गुंतून रहायला , करून पहायला फार आवडतं .
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🌴🍃मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून सातारा  जिल्हापरिषदने  बाल आनंद मेळाव्याचे आयोजन केंदस्तरावर केले होते.त्यात विविध स्पर्धा व रेकॉर्ड डान्स इत्यादी कार्यक्रम असायचा.यात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा समावेश नसायचा .. ... सर्वांच्या सहभागा साठी काय करता येईल याचा विचार करत असताना   असं लक्षात आलं ...की ..मुलांना गणपती उत्सवात,लग्नात,वरातीत,मिरवणूकीत व यात्रेच्या छबीन्यात नाचायला फार आवडते .मजा येते यात सगळेच सहभागी होतात..ठेक्यावर,तालावर डीजेच्या आवाजावर सगळे मनमुरादपणे नाचायचा  आनंद घेतात..याच पध्दतीने आपण आपल्या शाळेत सर्व मुलांना सहभागी करून गाजलेल्या मराठी गाण्यावर समुहनृत्याचा कार्यक्रम घेतला तर.....
मग काय उपक्रम अमलात आणण्याचे मनात नियोजन सुरू झाले.मुलांना न सांगता तयारीला सुरुवात केली.सर्व मुलांच्या साठी प्राणी, पक्षी  ,फुले व नटनट्यांचे मुखवटेही विकत घेतले.... सायंकाळी चार वाजता सर्वमुलांना मैदानावर येण्याची सूचना दिली.कवायती सारख्या ओळीत मुले उभी राहिली.लाउडस्पिकर लावला होता....वर्ग मंत्र्यांना मुखवटे वाटण्याची सूचना केली... तशी मुलांच्यात चुळबूळ सुरू झाली हे लक्षात आल्यावर मी वाटप चालू असतानाच माईकवरुन आता आपण काय करायचे आहे .ते सांगितले.... आमच्या उपक्रमाला सुरुवात झाली.
अन् नाच रे मोरा, चिऊताई चिऊताई , चांदोबा चांदोबा ही बालगीते व गाजलेली मराठी सिनेमातील  गाणी क्रमाने लावायला सुरुवात करायची ठरविले.
पहिली बालगीते लावून सुरूवात केली मुले एकमेकांना पहात डोळयांनी खुणवत होती . काहीजणांनी ताल धरायला सुरुवात केली. ज्यांना नाचायची आवड होती त्यांनीच पुढाकार घेवून नाचायला सुरुवात केली.बाकीचे अंदाज घेत होते......हळूहळू नाचनाऱ्यांची संख्या वाढत होती.बालगितावर सगळे सहभाग दिसून आला  नाही. जशी आवडीची गाणी वाजायला लागली तशी तशी  हळूहळू नाचाणाऱ्यांची संख्या वाढू लागली.  मुखवटे घालून नाचायला लागली .एकमेकांना नाचायला तयार करु लागली......शा़ंताबाई,ताशाचा आवाज,झिंगाट, रिक्षावाला ही गाणी वाजायला लागल्यावर तालावर, हावभाव करून,ठेकाधरुन वेगवेगळ्या पध्दतीने बेभान होऊन  मुलं मस्तपैकी नाचत होती....
त्यांचा नाच पाहुन आम्हा शिक्षकांना आनंदी आनंद होत होता....त्यांचे छान,शब्बास,मस्त वाहवा असं कौतुक करुन चेतवत होतो. .मुलं  समूहनृत्यात मनापासून सहभागी  झाल्याचे पाहून आनंदित झालो.वेगळाच आनंद मुलांनी दिला..
🦚
चित्रावरून शाळेत केलेल्या उपक्रमाची स्मरणभेट करण्याचा छोटासा  प्रयत्न..

✒️श्री रविंद्र लटिंगे,वाई

Comments

  1. छानच उपक्रम आहे।

    ReplyDelete
  2. अतिशय चांगले उपक्रम राबवून मुलांना परिपूर्ण बनवणे यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते शिक्षका साठी ... खुप छान सर .. असच कार्य करत रहा..छान वाटलं खुप! धन्यवाद आपला.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड