२२|पुस्तक परिचय,भारत कधीकधी माझा देश आहे.

वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई पुस्तक क्रमांक-२३ पुस्तकाचे नांव--भारत कधीकधी माझा देश आहे लेखकाचे नांव--रामदास फुटाणे प्रकाशक-श्रीविद्या प्रकाशन,पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती-जानेवारी २०१०पंचमावृत्ती एकूण पृष्ठ संख्या-९६ वाङमय प्रकार ( कथा, कादंबरी, ललित ई. )--काव्यसंग्रह मूल्य--६०₹ 📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚 २३|पुस्तक परिचय भारत कधीकधी माझा देश आहे रामदास फुटाणे 🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾 'नऊ ऑगस्टमुळे ,पंधरा ऑगस्ट दिसला पंधरा ऑगस्टमुळे,सव्वीस जानेवारी दिसला तरी एकाहत्तर वर्षांपासून,प्रजासत्ताक हरवला आहे! व्यक्तिसत्ताक पुष्पचक्र पाहून,स्मृतिस्तंभ गहिवरला आहे' "भारत कधीकधी माझा देश आहे" या उपहासात्मक काव्यसंग्रहातील 'खंत' या कवितेतील हे भाष्यकाव्य आहे.या काव्यसंग्रहातील विडंबन,वात्रटिका आणि चारोळ्या महाराष्ट्रातील नामवंत प्रसिध्द उपाहासिकाकार, वात्रटिकाकार,भाष्यकवी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक बहुआयामी व्यक्तिमत्त्व रामदास फुटाणे यांच्या आहेत. राजकारणग्रस्त समाज वास्तवाचे विडंबन करून उपहासात...