बालपणीच्या आठवणी --शेंगा काढणी
🥜☘️🥜🍀🥜☘️🥜🍀🥜☘️
बालपणीच्या आठवणी
🥜 शेंगा काढणी🥜
गावाकडे लहानपणी शेतकरी दोस्ताकडे कारणपरत्वे जाणं झाली की हमखास उकडक्या शेंगांचा नाहीतर गुळशेंगाचा नाष्टा व्हायचा.. अवीट चवदार मीठाच्या पाण्यात उकडलेल्या शेंगातील शेंगदाणे खायला एकदम भारी.बरेच जण हा मेवा पोतं पोत शेंगा उकडून तयार करून ठेवत असत.. लहानपणी बऱ्याच जणांच्या घरी हा मेवा खायला मिळालाय..विजू भाऊच्या घरीतर हातानं घेऊन कच्च्या, भाजक्या आणि शिजक्या शेंगा घ्यायला मिळायच्या.. काही वेळा शेंगा फोडत फोडत खायलाही मिळायच्या. पावसाळ्याच्या दिवसात तर लय भारी चव लागायची. हल्ली ही प्रवासात भुकेची जाणीव झाली की भाजक्या -शिजक्या शेंगा अथवा शेंगदाणे खाल्ल्याने फास्टफूडसारखा त्रास नाही.
अलीकडे उन्हाळी हंगामात भरपूर ओली शेंग उपलब्ध होते...
आज मी नोकरीला असल्यामुळे सहज शेंगा विकत घेवू शकलो..शेंगा खात सहज आठवण आली... लहानपणीच्या शेंगाखाणतीची(भुईमुगाच्या शेंगा तोडायची) आमची आई शेतात काम करुन प्रपंच्याला मदत करायची....
घटस्थापना झाली की दसरा दिवाळी यायची दिवाळी फराळ करायला तयारीची सुरुवात व्हायची.शेतातील कडधान्ये,हायब्रीड काढायचा हंगाम सुरू व्हायचा. त्याच्या जोडीला शेंगा काढायलाही सुरुवात व्हायची.. शनिवारी अर्धी शाळा झाली की मी आणि माझा भाऊ आईला शेंगा तोडायला मदत करायला इतरांच्या शेतात जायचो.त्याकाळात भरपूर कच्चा-भाजक्या-शिजक्या शेंगा खायला मिळायच्या.लालदानी,पसऱ्या, उपट्या
,जपानी फुले प्रगती ,जेल चोवीस असले वाणं प्रकार असायचे..
वावरात गेल्याव पहिल्यांदा शेंगांचे डहाळे उपटायचे मग एकाजागी गोळा करुन सावलीत दिवसभर तोडत बसायचे..मग सायंकाळी शेंगाचा वाटा व्हायचा.त्यावेळी आमची आई पाऊण एक पोत शेंगा दिवसभरात तोडायची.आम्ही मदतीला असलो तर एक पोत्यापेक्षा जास्त व्हायच्या.
वावरात गेल्याव पहिल्यांदा शेंगांचे डहाळे उपटायचे मग एकाजागी गोळा करुन सावलीत दिवसभर तोडत बसायचे..मग सायंकाळी शेंगाचा वाटा व्हायचा.त्यावेळी आमची आई पाऊण एक पोत शेंगा दिवसभरात तोडायची.आम्ही मदतीला असलो तर एक पोत्यापेक्षा जास्त व्हायच्या.
तवा वाट्यानं शेंगा तोडायला जायचो "वाटा" म्हणजे एका सतरंजीवर आपण तोडलेल्या सगळ्या शेंगा ओतायच्या.मग मालक शेंगांचा उतार व गावातील इतरांनी काय वाटा दिला.याचा अदमास घेऊन उत्पन्न कसं झालंय यावरून वाटा ठरवून सतरंजीवर ओतलेल्या शेंगांचे समसमान दहाची वाटणी असेलतर दहा ढीग,बाराची असेल तर बारा याप्रमाणे ढीग करणार अन् कोणताही एक ढीग आपल्याला घ्या म्हणणारं.सगळे ढीग बघून एक ढीग आपल्याला घ्यायचा...तो आपला हक्काचा वाटा व्हायचा.. काहीवेळा मालक आपला ढीग देताना वर दोन-तीन ओंजळीभरुन शेंगा आपल्या टोपल्यात घमेल्यात टाकायचा.... दररोज शेंगा तोडायला जावून आई वाळवून दोन पोत्यापेक्षा जास्त शेंगा करायची..काही वेळ त्याच शेंगांचा घाणागाळून आलेल्या शेंगतेलात दिवाळीचे पदार्थ घरीच बनवायची....
आज मी वाईत शेजारच्या श्री नंदकुमार डोईफोडे सरांच्या मदतीने भुईमुगाच्या शेंगांचे अर्धे पोते खरेदी केले. लाॅकडाऊन मुळे होलसेल मार्केट मधून घरपोच मिळाले. रोख मूल्य देवून खरेदी केलेल्या एका शेंगाच्या पोत्याने .भूतकाळातील वाट्याने मिळवलेल्या कष्टाच्या शेंगांच्या पोत्याची आठवण मनात रुंजी घालत होती. आई व वडिलांच्या कष्टामुळे मला नोकरी मिळाली. आज पाहिजे तेव्हा बाजारात शेंगा उपलब्ध असतात.त्या मोल देऊन मिळतात. पण वाट्यानं मिळालेल्या शेंगांचे मोल अनमोल आहे.
धन्यवाद आई-आण्णा
लेखन दिनांक ७मे २०२०
लेखन दिनांक ७मे २०२०
मस्तच आठवण
ReplyDelete