गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड
गावाकडच्या आठवणी यात्रेतील कुस्त्यांचा फड
बालपणीच्या साठवणीतल्या आठवणी....
कुस्त्यांचा फड (मैदान)
🤼♂️🤼♀️🤼♂️🤼♀️🤼♂️🤼♀️🤼♂️🤼♀️🤼♂️
महाराष्ट्राच्या मातीतल्या लोकप्रिय रांगडा व मर्दानी खेळ,मनगटातील रग,मनातला डाव -प्रतिडाव आणि मेंदुने कौशल्याचा वापर करीत खेळला जाणारा क्रिडा प्रकार.चपळता, अचूकता व निर्णयक्षमता असणारा कुस्तीचा श्वास गावोगावच्या पहिलवानांना यात्रेनिमित्त फडात कुस्त्या खेळण्याची नामीसंधी तर शौकिनांना पहाण्याची संधी.. मैैैैदानात नारळ फुुुुुटल्यापासून ते चांंगभलं होईपर्यंत उभं राहून नाहीतर पुढं बसून कुस्त्यांचा आनंंद लुुुुुटायचो.

श्री पद्मावती देवीच्या देवळात शिंग फुंकून, हलगीताशा ,झांज वाजवत पुलाजवळच्या शेतात तयार केलेल्या आखाड्यात यात्रा कमिटी ,गावकरी, पहिलवान , यात्रेकरू आणि हौशी कुस्ती शौकीन जमत.पुलाकडील शेतात कुस्तीसाठी मैदान तयार केलेलं असायचं.वावार फणूून फड तयार केलेला असायचा.ढेकळं फोडलेली असायची.सगळेजण गोलाकार बसत.पाठीमागे काहीजण उभे असत. आमचीही आळीतली दोस्त कंपनी कुस्त्या खेळायला जात...श्रीफळ वाढवून कुस्तीला सुरुवात व्हायची.बजरंग बली की जय असा जयघोष करत लहानग्यांच्या नारळावर कुस्त्या होत...शर्ट काढून पॅन्टवर किंवा लंगोट लावून काहीजण कुस्त्या खेळायचे.एकमेकांच्या हातात हात देऊन,बजरंग बली की जय म्हणत,माती कपाळाला लावून कुस्ती करत.दोस्तांनी जिंकली की आम्ही मुलं आनंदाने उड्या मारायचो..
नारळातील खोबऱ्याचे बारीक बारीक तुकडे करून एक दोघेजण फिरत फिरत मुठीने प्रसाद म्हणून तुकडे हवेत टाकत असे.आपल्या दिशेने येताच , झेलण्यासाठी व मिळवण्यासाठी धडपड व्हायची...
माईकवरून सुचनेनुसार कुस्त्या लावायला सुरुवात करायची...पंच मंडळींच्या सहकार्याने वस्ताद एका गावच्या मल्लाचा हात धरून आखाड्यात फिरताना इनाम रुपये एक्कावन्न असा पुकारा करत.व दोघांचा हात वर करत ...एकदोघं मल्ल कुस्तीसाठी उठून त्यांच्या जवळ येत.दोघेजण हातात हात देत.वस्ताद कुस्ती खेळणार का म्हणून विचारीत. मग दोघांचा होकार आला की वस्ताद कुस्ती फिक्स करत.काहीवेळाने वार्माप करून दोनी मल्ल आखाड्यात उतरत.निकाल देणारे पंच तथा वस्ताद दोघांना यात्रा कमेटीकडे घेऊन जात. माईकवर त्यांचे नाव पुकारत, बजरंंग गाढवे गाढवेवाडी,भिलारे वस्तादांचा पठ्ठया विरुध्द कांंता शिर्के पसरणी महांगडे दादांचा पठ्या इनाम रुपये पाचशे एक्कावन्न... असा माईकवर पुकारा झाला की कुुस्तीला सुरुवात होय..

कुस्ती निकाली करा.... तरच इनाम असं वस्ताद दोघांना इशारा वजा ताकिद करत...मग दोघांची लढत सुरू व्हायची.दंड थोपटून सलामी व्हायची. आवाजानं मैदानात कुस्तीचा माहोल तयार व्हायचा. दोन्ही पैलवान मग एकमेकांना भिडत,ताकतीचा अंदाज घेऊन,मग कुस्तीला रंग चढायचा...शौकीन बघे व त्यांचे साथीदार चेअरर्प करत.फडात एकाचवेळी पाच-सहा कुस्त्या सुरू असत.काही मल्ल डोळ्याचं पातं लवतयनां लवतयं तोवर प्रतिस्पर्ध्या कडून चितपट झालेला असायचा.. शौकिन टाळ्या वाजवून शाबासकी देत.काही कुस्त्या ढालीवर ,तर काही गदेवर होत.तर ज्यांच्या
घराण्याचा कुस्तीचा वारसा आहे.त्यांच्या
आजोबा किंवा वडिलांच्या स्मरणार्थ वैयक्तिक रोग इनामावर कुस्त्या लावत.
पंचक्रोशीतील व गावातील कुस्ती परंपरा जोपासणारी मंडळी इतरही भागातील पहिलवानांना बोलवत..काही नामांकित मल्ल सुध्दा हजेरी लावत...काहींची लढत लगेच होत.काहीजण अंदाज घेऊन खेळत तर काहींची रांबळत राही त्या सोडवून इनाम दोघांत वाटून देत असत..
कुस्ती निकाली झाली की जिंकणारा पठ्ठया आनंदाने बेभान होऊन एका पायावर नाचत.किंवा एका हातावर चक्री काढत.आनंदाने बेहोश होउन जात."है बघ वरखडवाडीचा पठ्या", असं म्हणत आपल्या वस्तांदांकडे पळत जावून आशीर्वाद घेत. लगेच वस्ताद त्याला अभिमानाने उचलायचे व पाठीवर शाबासकीची थाप मारुन कौतुक करायचे.जिंकलेला पहिलवान चिठ्ठी घेऊन इनाम देणाऱ्याकडे जावून इनाम घेत. काही हौशी कुस्ती शौकीन त्याला वैयक्तिक बक्षिसही देत.फडात पाचदहा रुपयांपासून पाच हजार रुपये इनामाच्या कुस्त्या होत..कुस्ती कशी जिंकली कुठला डाव टाकला याच्या चर्चा कानावर पडत.यानं एकेरी पट काढला.त्याने ढाक लावली,आपल्या पहिलवानाने गदालोट केली.ह्याने दुहेरी पट काढला, कलाजंग ढाकावर चितपत केले.मोळी बांधली,तर पाचपुतेवाडीच्या पहिलवानाने धोबीपछाड डाव टाकून ढाल जितली. असे कुस्तीचे डावप्रतिडाव आणि डावपेच कळत.नामांकित पहिलवान निकाली कुस्त्या करत.महत्त्वाच्या व नामांकित कुस्त्या झाल्या की आखाडा संपत असे. आळीतल्या पहिलवानांनी कुस्त्या जिंकलेल्या असत त्याच्याबरोबर घोळक्याने घरी येत असू. किशोर वयापर्यत यात्रा आली की आनंदी आनंद व्हायचा.मजा वाटायची, पुढल्या वर्षी यात्रा कधी येतेय याची हुरहूर लागायची..नवीन कॅलेंडर घरी आणले की यात्रा कधी आहे त्या महिन्यातील तारखेला गोल करायचो.......रम्य ते बालपण.....कितीही मोठं झालो तर बालपणीच्या आठवणी मनाला तजेला देतात...
श्री पद्मावती आईसाहेब की जय....
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
🖋️ १ मे २०२०
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
🖋️ १ मे २०२०
खूप छान दादा
ReplyDeleteखूप छान आठवणी सर
ReplyDeleteधन्यवाद मित्रहो
ReplyDelete