गावचे वैभव-श्री क्षेत्र सोनेश्वर
गावचे वैभव-श्री क्षेत्र सोनेश्वर ओझर्डे
🛕गावचे वैभव🛕
☘️श्री क्षेत्र सोनेश्वर☘️
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌿नवनाथांच्या वास्तव्याने पावन झालेले ओझर्डे येथील श्री क्षेत्र सोनेश्वर मंदिर.
♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️ओझर्डे, ता. वाई गावच्या
पश्चिमेला दीड ते दोन किलोमीटर अंतरावर वाई तालुक्याची वरदायिनी कृष्णा नदीच्या काठावर नवनाथांच्या वास्तव्याने पावन झालेले श्री क्षेत्र सोनेश्वर मंदिर आहे.पंचक्रोशीत परिचित आहे. येथील देखणे निसर्ग सौंदर्य खळाखत वाहणारी कृष्णानदी ,नदीचा डोह, नदीवरील पूल, काठावरील कंजाळुची दाट झाडी, मंदिराच्या सभोवताली गर्द वनराई असल्याने येथे भाविकांची वर्दळ सतत असते. दर सोमवारी येथे रुद्राभिषेक , पूजापाठ व महाप्रसादाचे आयोजन भाविकांमार्फत केले जाते.नित्यनियमाने श्री दत्त सेवेकरी मंडळा मार्फत पूजा अर्चा केली जाते.
नवनाथापैकी मच्छिंद्रनाथांनी कृष्णा नदीतील डोहात टाकलेल्या सोन्याच्या विटेवरुन या तिर्थ क्षेत्राला सोनेश्वर असे नाव पडले अशी अख्यायिका आहे. तेव्हा पासून आजपर्यंत या डोहातील पाणी कधीच आठले नाही. मंदिर परिसराचा विकास करताना मातीच्या ढिगार्याखाली पाच जिवंत समाधी घेतलेल्या अवस्थेतील मानवी सांगाडे सापडले आहेत. दगडी बांधकाम केलेल्या समाध्या सापडल्या.या समाधीच्या तोंडावर गोल मोठ्या दगडी चाकांच्या आकारांचे झाकण असून त्यावर सूर्याचे चिन्ह आहे. त्यामुळे ते सूर्य उपासक असावेत, असा अंदाज असावा.
येथे "सोनेश्वर" नावाचे जागृत महादेवाचे पुरातन हेमाडपंथी मंदिर पश्चिमाभिमुखआहे. नित्य नियमाने आरती रुद्राभिषेक मंत्रोच्चारात केले जातात. मंदिरापुढे सभामंडप असून पुढे नंदी आहे.छोट्याश्या प्रवेशद्वारातून पायऱ्या उतरून गाभाऱ्यात जाता येते. तिथं शंकराची पिंड आहे.गाभाऱ्यातील शांत वातावरणात मनःशांती लाभते.प्रसन्नता वाटते.

सभामंडप व अभ्यासिकेची सोय ओझर्डे गावचे सुपुत्र विधानपरिषदेचे माजी सभापती मा.प्रा. ना.स.फरांदे (काका) यांच्या फंडातून झाली आहे.
ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी या परिसराचा जिर्णोद्धार केला आहे.श्रावणमास सणउत्सवांची रेलचेल,ऊनपावसाचा खेळ सुरू असतो,शेतात पिक डौलत असतात,नदीला पूर येत असतो.निसर्गसृष्टी हिरवीगार दिसत असते.धार्मिक व्रतवैकल्ये करण्याचा श्रावणमास ...
दीपअमावस्या झाली की.दररोज सकाळी भल्या पहाटे लवकर उठून एकमेकांना हाका देत सोबतीला घेऊन चालत चालत सोनेश्वरला श्रावणमासात पवित्र स्नानाला जायच असा प्रघात होता. गावातील अनेक जण गटागटाने जात असत.स्नान करून शंकराला जलाभिषेक करत मुखाने ओम नमो शिवाय, नामघोष करत सकाळच्या प्रसन्न वातावरणात मनःशांती होते..सकाळी लवकर स्नानाला जायची मजा यायची.पहाटेचा चालण्याचा व्यायाम व्हायचा..
श्रावणात व चातुर्मासात भक्तगण गुरु चरित्रांचे पारायणे तिथं करतात. श्रावण अमावास्येला छोटेखानी यात्रा भरते. जिल्ह्यातील अनेक ग्राम दैवताच्या पालख्या महादेवाच्या भेटीला येतात. परिसरातील शाळांच्या सहली देवदर्शनाला व क्षेत्रभेटीला येतात.

ओझर्डे ग्रामस्थ व दत्त सेवेकरी मंडळा तर्फे सर्व भाविकांना महाप्रसाद दिला जातो..हा परिसर म्हणजे रमणिय निसर्ग. या सौंदर्य स्थळावर अनेक मराठी हिंदी सिनेमातील गाणी व प्रसंग शुट झालेत..खळाळत वाहणारे नदीचे पात्र,डोहातून पाणी वाहताना येणारा आवाज कानात गुंजन करत रहातो, मंदिराच्या पाठीमागे सोंनजाई मंदिर व स्मशानभूमी तेथील रस्त्याकडेचे टोलेजंग वडाचं झाड .त्याच्या लोंबणाऱ्या पारंब्या धरुन लोंबकळत झोका घेण्याचा वेगळाच आनंद मिळायचा.उंचावर शंकराचे मंदिर, शेजारी आश्रमखोली,पुढे ऋषींची समाधी, जलशुद्धीकरण केंद्र, नदीवरील पूल ,पुलाशेजारी छोटासा घाट,घाटावर छत्रपती शिवाजी महाराजांचे केंजळ ता. वाई येथील सरदार जगताप घराण्यातील शुरवीरांचे आखीवरेखीव समाधीस्थळ. त्याच्यापाठीमागे श्रीशंकराचे मंदिर. पुलावर मधोमध उभं राहून सभोवताली आसमंत न्याहाळताना मन तजेलदार होते.कृष्णा नदीचं इथलं रुप मनाला मोहिनी घालतं.फुलाच्या एका बाजूला छोट्याशा काठाला स्पर्शून आणि कंजाळूच्या छायेतून संथ वाहणारी कृष्णामाई तर दुसऱ्या बाजूला राकट खडकातून फेसाळत वाहणारी नदी डोळ्यांचे पारणे फेडते.
नदीच्या पलिकडे कडेगांव व बावधनचा शेतीपरिसर. महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या बावधनगावची श्री भैरवनाथाची बगाडयात्रा पलिकडील तिरावरुन सुरु होते.यावेळचं इथलं वातावरण भक्तीमय व उत्साहपूर्ण असते.तिथं बगाडाचागाडा, देवादिकांच्या पालख्या, बगाड मानकरी,हलगी -सनईचा सूर, बैलांच्या जोड्या, गुलालाने माखलेले गावकरी,बगाड पहायला आलेले हौशीभाविक आबालवृद्ध यांची प्रचंड गर्दी असते. फिरतीखाऊची दुकाने दिसतात." काशिनाथचं चांगभलं "गजर करीत बगाडयात्रेला सुरुवात होते.
वाई तालुक्याचे लोकनेते माजी मंत्री व आमदार मदनरावजी (आप्पा) पिसाळ यांनी दुरदृष्टीने बावधन आणि ओझर्डे गावाला जोडणारा पुल बांधल्याने दळणवळणाची चांगली सोय झाल्याचे लक्षात येते.
श्री. सोनेश्वर महाराज की जय,
ReplyDeleteहर हर महादेव
आम्ही श्रावणात फिरायला जायचो.
ReplyDeleteश्री. सोनेश्वर महाराज की जय 🙏🌹🌹🌹
ReplyDeleteछान माहिती...
ReplyDelete