माझी भटकंती भाग--३८ रांजणखळगे टाकळी हाजी







🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼
   माझी भटकंती
क्रमशः भाग क्र--३८
      दिनांक- १२ एप्रिल २०१७
 🖼️ रांजणखळगे (कुंड माऊली) टाकळी हाजी व निघोज 
                🖼️
♾️➖♾️➖♾️➖♾️➖♾️

पहिल्या दिवसाचे कामकाज उरकून सायंकाळी  श्री किसन शिंदे सरांसोबत  आम्ही शिरुरला निघालो..उचाळे वस्तीपासून थोडंसं पुढे आलो.दोन रस्ते होते एक टाकळीहाजीला जाणारा व दुसरा मळगंगा देवीकडे जाणारा होता.सर आम्हाला म्हणाले , आपण देवीचे दर्शन करू व माऊली कुंड बघून जाऊ जवळच आहे..मी चालेल म्हणालो.नवीन ठिकाण पाहून जाऊ या.मग श्री सोमनाथ भाग्यवंत सरांनी गाडी त्यादिशेला घेतली.
पाचसाडेपाचची वेळ असेल.ऊन्ह कमी झालेली होती... बागायती शेती दोन्हीबाजूला  दिसत होती . थोड्यावेळाने मंदिर आल्यावर गाडी भाग्यवंत सरांना थांबवायला सांगितली..आम्ही खाली उतरलो... समोरचं  दृश्य  वेगळच दिसत होते... दोन्हीकडे मंदिरे, नदीपात्रावर पुल, खडकातील नदीपात्र .

    आम्ही मंदिराकडे निघालो.. श्री मळगंगा देवीचे मंदिर कुंड माऊली व कुकडी नदी याविषयी माहिती शिंदे सर सांगत होते... मळगंगा देवीचे दर्शन घेऊन आम्ही नदीच्या पात्रात आलो...अमेझिंग  अप्रतिम निसर्गसौंदर्य खडकांच्या कातळात तयार झालेले रांजणापेक्षाही मोठे खळगे पाहून चकित झालो..

 तिथल्या नदीच्या पात्रात सगळीकडे विविध आकाराचे खळगे पाहिल्यावर.शिंदे सरांना धन्यवाद दिले.व तुमच्या मुळे आज जगप्रसिद्ध भौगोलिक ठिकाण पहायला मिळाले. भौगोलिक स्थान पाहू  मन हरकले.कुकडीनदीचा प्रवाह खडकांना भेदत पुढे मार्ग काढतो. पाण्याचा प्रवाह वाट शोधताना ,खडकातील खोलीमुळे भोवरे निर्माण होतातपाण्यासोबत असलेले दगडगोटेही खडकातील आतील भागात सतत फिरत राहतात..त्याने पाचतेदहा फूट खोलीचे रांजणासारखे आकार तयार झालेले बघायला मिळाले...यालाच माऊली कुंड , रांजणखळगे म्हणतात. विलोभनीय स्थळाचे फोटो काढले.. जोडीदार श्री सोमनाथ भाग्यवंत सरही हे ठिकाण पाहून आनंदित झाले. या रांजणखळग्यामुळे नदीचं पात्र जमीनीपासून‌ खाली दगडात गेलेले दिसते.कातळशिल्पे हात फिरवून बघितल्यावर गुळगुळीत लागत होती. सुबक व रेखीव वाटत होती. अविस्मरणीय निसर्गाचे कातळशिल्प रांजणखळग्याच्या आकारात दिसले.कुंडाच्या वरील बाजूस बंधारा आहे.सूर्यास्ताच्या वेळी मनमोहक दृश्य दिसत होतं.पावसाळ्यात इथलं दृश्य कसे असेल याचा अंदाज येवू लागला.शिंदे सरही सांगत होते.. लांबून पहाताना  बंधाऱ्यातून पडणारे पाणी प्रवाहित होत न दिसता पुढं जाते. प्रत्येक रांजण भरल्यावर पुढे जाणारा प्रवाह वाहताना दिसतो. या जलप्रवाहाचे येणारे वेगवेगळे आवाज ऐकून नादमाधुर्य  संगीतवाद्यासारखे वाटते.तरंगवाद्यच जणू वाजतय .एक वेगळाच अनुभव असेल.तिथं असणाऱ्या झुलत्या पुलावरून खाली बघितले.
रांजणखळगे किती खोल असतील याचा अंदाज आला.
आसमंत वेगळाच दिसत होता.तसेच पलीकडील  तिरावर गेलो.तिथही श्री मळगंगेचे मंदिर.. शिंदे सरांना  गावाचे नांव विचारले, सर म्हणाले,"हे निघोज ता.पारनेर अहमदनगर जिल्ह्यातील गाव."दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवरील गाव.परिसर पाहून मन थक्क झाले..कातरवेळेला सुरुवात झाली होती.दोन तास कसे गेले, हे पहाताना लक्षातच आल नाही.....
पुन्हा या नजाऱ्याकडे पाहून श्री मळगंगामातेला वंदन करून शिरुरला जायला निघालो..सर म्हणाले ," देवीचा मराठी सिनेमा 'कुंडमाऊली मळगंगामाता' या नावाचा असून त्यात अलका कुबलने देवीचा रोल केला आहे.ही आणखी माहिती दिली.आज एक नदीपात्राच वेगळं नैसर्गिक रूप पहायला मिळाले.  रांजणखळगे (कातळशिल्प) प्रत्यक्ष पहायला मिळाल्याचे समाधान वाटले.
    धन्यवाद प्राथमिक शाळा  शाळा उचाळेवस्ती शिक्षकवृंद. 

क्रमशः भाग- ३८ समाप्त.
दिनांक १०मे २०२०

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड