माझी भटकंती वासोटा किल्ला प्रवास भाग क्र--४८

🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 : ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳ माझी भटकंती क्रमशः भाग--४८ ⛰️बोटिंग व भटकंती वासोटा किल्ला ⛰️ 🍀🌳🍀🌳🍀🌳🍀🌳🍀 नेहमीप्रमाणे फिरायला गेलोकी लवकर उठून परिसरात फिरायला जायचं हा शिरस्ता..सकाळच्या वेळी शांत वातावरणात फिरल्याने दिवसभरासाठी ऊर्जा मिळते . उत्साह वाढतो...जाधव सर आणि मी टेंटमधून बाहेर आलो.सगळीकडे धुकच धुकं दिसत होते.मुक्कामाच्या ठिकाणी आजूबाजूला काहीच नव्हतं.पक्ष्यांची किलबिलाट कानी येत होती ... रिसॉर्टच्या पश्र्चिमेला धरणाचा जलाशय दिसत होता.पाणी बरेच कमी झाल्याचे दिसून आले..मग आम्ही दोघं वर चढून रस्त्यावर आलो.रात्रीच्या बोर्डकडे लक्ष गेले..धुक्याने परिसर वेगळाच दिसत होता.. तदनंतर चालत पुर्वेकडे निघालो.चढ चढून गेल्यावर दोन्ही कडे घरं दिसली.गावाच्या नावाचा बोर्ड दिसला."शेंबडी ता.जावली " तसचं थोडंसं पुढे फिरुन परत माघारी आलो.आवराआवर करताना आचारी नाष्ट्याला काय बनवू विचारायला आला.त्याला फरांदे सरांनी, 'कांदेपोहे बनवायला लावले'.तोवर साळुंखे गाडी घेऊन आला होता.त्याच्याबरोबर बोट बुकिंग ...