Posts

Showing posts from April, 2020

माझी भटकंती रायरेश्वर सहल भाग क्र.चार

Image
माझी भटकंती भाग-चार    माझी भटकंती भाग-चार माझी भटकंती भाग-चार ⛰️🌴माझी भटकंती⛰️🌴       ✒️क्रमश:भाग चार ⛰️२५ वर्षांपूर्वीची वाशिवली    केंद्रसमुहाची रायरेश्वर पदभ्रमंती.......        सन १९९५-९६ चा काळ 〰️➖〰️➖〰️➖〰️➖         ⛰️⛰️आपल्या परिसरातील किल्ले तेथील ऐतिहासिक प्रसंग , रायरेश्वर मंदिर, तेथील लोकांचे राहणीमान,जंगलवाटा, आजूबाजूचा परिसर , गडावरील विविध ठिकाणं यांच्या प्रत्यक्ष प्रत्यक्ष भेटीतून इतिहासातील घटना व  प्रसंगाचे अवलोकन करता यावे .त्या काळातील गडकोटांचे महत्त्व समजावे या उदात्त हेतूने  तत्कालीन केंद्रप्रमुख श्री गुलाबराव गायकवाड  व रवींद्र लटिंगे यांच्या कल्पनेतून वाशिवली केंद्रसमुहातील सर्व विद्यार्थी व शिक्षकांची छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेल्या रायरेश्वरगडावर आयोजित केली होती.... सह्याद्रीच्या डोंगररांगांचे कुतूहलच भारी.काळापहाड,अवघड चढण तीव्र उतार व गर्द झाडीत लपलेली पायवाट..सारं काही मनाचा थकवा घालवून शारीरिक क्षमता ओळखायला लावण...

माझी भटकंती,कोंढावळे ते क्षेत्रमहाबळेश्वर भाग क्र.१ते ३

Image
    🌱🌴 माझी भटकंती . 🌱🌴      क्रमशः भाग एक ते तीन कोंढावळे ते क्षेत्रमहाबळेश्वर      🗻डोंगर दऱ्याखोऱ्यातील    पाऊलवाटा 🗻                    भाग  १ ते ३ 🌳⛰️🌳🌴⛰️🐾⛰️🌴 भाग एक         कोंढावळे ते क्षेत्रमहाबळेश्वर व्हाया डोंगरदऱ्या खोऱ्यातील रानवाटेने.... १९९४ सालातील महाशिवरात्रीदिवशी 🚶‍♂️🚶‍♂️🚶‍♂️     कोंढावळे येथे शिक्षकी सेवेला १९८९ साली सुरुवात झाली.धोमधरणाच्या पाणलोट क्षेत्रातलं गाव.ओझर्डे पासून ३५ किलोमीटर अंतर दररोज प्रवासकरणे शक्य नसल्याने  तिथेच मुक्कामी रहायचो एस.टी.ची सोयही वेळेवर नव्हती.कोंढावळे हे शुरवीर संभाजी कावजी कोंढाळकर यांच गांव . गावच्या सभोवताली डोंगरच डोंगर पुर्वेला धरणाचा जलाशय, पश्र्चिमेला किरोंडे मुरा, दक्षिणेला कोंढावळे मुरा तर उत्तरेला रायरेश्वर, केंजळगड व  वाशिवलीचा डोंगर.. त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात ,कुशीत असणारं गाव..गावची माणसं मायाळू ,प्रेमळ व समजूतदार होती.मुक्काम...

गावकडची रस्सा पार्टी

Image
गावाकडची रस्सा पार्टी 🍲गावाकडची रस्सा पार्टी 🥘        🔰✒️ २५ ते ३० वर्षाच्या पाठीमागे धाब्यावर,हाॅटेलात किंवा भोजनालयात मित्रांसमवेत जेवायला जाणे म्हणजे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जायचे. जो जेवायला घालणार आहे अथवा देणारा आहे.तो सांगेल तिथेच जायलाच लागायचे... आमच्या ओझर्डे गावापासून ३ किमीवर जोशी विहीर येथून पुणे_ बंगळूर हावये गेला आहे.त्याकाळी वेळेपासून पाचवड पर्यत हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच हाॅटेल्स होती.आज वेळ्यापासून सातारा पर्यंत किमान शंभरपेक्षा जास्त संख्या होईल.    तर अन्नदाता सांगेल तिथेच जायलाच लागे...नाही गेलो तर पेनेल्टी द्यावी लागायची... जेवण झाल्यावर ,खुशीने मनाने तृप्तीने ढेकर दिल्यावर त्याचे आभार मानावे लागायचे .थॅक्यू..          परंतु सगळ्यांना नेहमीच पार्टीसाठी हाँटेलमध्ये जायला परवडतय होय.त्यापेक्षा गावात केलेली रस्सा पार्टी एकदम झ्याक आन् लय भारी रस्सा,सुक्क अथवा बिर्याणी रस्सा केला की झालं काम...        पार्टी करायला  कारण आणि मैत्री केंव्हा आणि कधी जुळेल याचा काय नेम न...

गावच्या आठवणी---क्रिकेट स्पर्धा

Image
  🏆🥇 मर्यादित षटकांच्या  क्रिकेट स्पर्धा 🏆🥇  🏆📢🎤📢📣📢📣🏅            लाॅकडाऊन च्या काळात जुना अल्बम चाळताना क्रिकेट स्पर्धेच्या  उद्घाटनाची बातमी व फोटो पाहिला  आन् क्रिकेट सामन्यावरच लिहावं असं सुचलं आणि लिहीत गेलो.. 🗣️🎤🗣️🎤🗣️🎤🗣️🎤     रोमांचकारी फायनल मॅचका समालोचन करते हुये जानमाने काॅमेंट्रेटर इकबाल पठाण.....  🌧️⛈️आसमानमें कालेघने बादल आते हुये, लेकिन बारीशकी कोई गुंजाईश नहीं..... प्रेक्षकोंसे खचाखच भरा हुवा मराठी शालाका स्टेडियम...... टुर्नामेंट की आखरी मॅच.... जितने केलिए टीमको आखरी गेंदपे चाहिये चार रन .... ,दो विकेट हाथमें.....तालीम ओरसे आखरी गेंद डालतेहुये विजय शेलार.... भागते भागते आकर गेंद डाली...बॅटसमनने जोरका फटका लगाया ,गेंद उंच उठाई और ये स्ट्रेट डाईव्ह, सोसायटी के नजदीक सीमारेषेके पास आती गेंद विजय ढोकळेने  पकडी....और ये विकेट गिरा..............और चार रनसे कलाविष्कार टीमने यह मॅच जिती और वे पयले नंबर के हकदार बन गये.............. मैदानके नजदिक  फटाके फुटणे लगे.....

गावच्या आठवणी-- सोंगे

Image
    गावच्या आठवणी        ओझर्डे सोंगे उत्सव -  April 17, 2020           ओझर्डे सोंगे उत्सव,सोंगाडी गाव ओझर्डे १६ मार्च।  २०१७               शिमग्याची सोंगं   😿आस्ते कदमसे बिलांगकोट राज्यत राज्य स्वराज्य रक्षक  छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य या उद्घोषणेचा गजर करीत सुरू होणारा व गावचे दैवत श्री पद्मावती मातेच्या आशिर्वादाने ओझर्डे गावची लोककला  सोंगे उत्सव सोहळा दरवर्षी रंगपंचमीच्या पहाटे मुख्य मिरवणूक सोहळा  सुरू होतो..होळी पौर्णिमे पासून या उत्सवाला सुरुवात होते. 🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸 महाराष्ट्रात प्नसिध्द श्री भैरवनाथाच्या  बगाडयात्रेच्या पहाटे ओझर्डे येथे प्रबोधनात्मक व रंजनात्मक सोंगे उत्सव संपन्न होतो .सोंगे म्हणजे  चित्ररथ, शोभायात्रा मिरवणूक होय. ओझर्डे गावचा कॉर्निव्हल सोहळाच जणू.हा उत्सव रंगपंचमीच्या पहाटे सूरू होतो. .होळीपासूनच सुरुवात होते.कोणकोण कोणत्या गाडल्या बांधणार यांचे नियोजन केले जाते....

माझी भटकंती धोमधरण रिंग रोड भाग क्र.२८ ते २९

Image
⛰️             माझी भटकंती⛰️                  क्रमशः भाग क्रमांक-२८    🏝️धोमधरण रिंग रोड 🏝️      वाईतील एक दिवसाची भटकंती साठी धोम धरण रिंगरोड,जांभळी बंधारा व बलकवडी धरण तेथील निसर्ग रम्य परिसर  पहात एक दिवसाची छान टू व्हीलर वर सहल होते.इंग्रजीतल्या  M आणि V या आकारात वाईतील गणपती मंदिरापासून गंगापुरी किंवा सिध्दनाथवाडी मार्गे एका बाजूने जावून दुसऱ्या बाजूने येवून पुन्हा तिथेच येवू शकतो. एक रफेट पूर्ण होते.        वाई पासून दोन किलोमीटर अंतरावरील मेणवली येथील मेणेश्वर घाट,नाना फडणवीस यांचा वाडा व गाव ,अनेक मराठी हिंदी सिनेमातील शुटिंग पाईंटचे गाव म्हणूनलौकिकता मिळवली आहे.नानाफडणीस वाड्यासमोर प्रचंड मोठे झाड आहे.त्यांचे खोड हत्तीच्या पायासारखे दिसते.घाट आणि नदीचे दृश्य झाडाच्या कट्टयावरुन विलोभनीय दिसते.घाट आणि गर्दझाडीतून काटकोनात वाहणारी कृष्णा नदी पाहून मन प्रसन्न होते. संपूर्ण ब...

माझी भटकंती कोट्रोशी तापोळा भाग क्रं. सव्वीस ते सत्तावीस

Image
               माझी भटकंती ⛰️माझी भटकंती⛰️               क्रमशः भाग सव्वीस        🏝️ तापोळा कोट्रोशी 🏝️  ♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️     बऱ्याच दिवसात सन २०१९ आमची मुक्कामी  जाण्याची ट्रीप ठरत नव्हती.शनिवारी व रविवारी तारीख ठरवली की कुणाचीतरी महत्त्वाच्या कामामुळे रद्द व्हायची . डिसेंबर जावून २०२० साल आले तरी ठरेना.फिरायला आठही जण कंपलसरी पाहिजेतच्. एक दिवस एका मित्राकडे कामानिमित्त गेलो.तेंव्हा विषय निघाला.कधी जायचं व कुठं जायचं यावर चर्चा सुरू झाली... कोकणात बरेच वेळा गेलोय.कास, बामणोली व वासोटाही झालाय.मग जायचं कुठं..... शेवटी त्याला इतरांशी संपर्क करायला सांगून मार्च मधील शनिवार व रविवार फिक्स करुया..मी ठिकाण  शोधतो...... महाबळेश्वरातील मित्रांशी संपर्क करुन ठिकाणांविषयी माहिती घेऊन आमच्या ग्रुपमध्ये त्यावर चर्चा केली.... सर्वानुमते फायनल झाले... तापोळा        शनिवारी दुपारी दोन वाजता बऱ्याच दिवसांनी आठ जणांच्या भटकंतीला मुहूर्त मिळाला.वाईतून गाड...

माझी भटकंती श्रीक्षेत्र करहर भाग क्र-बत्तीस व तेहतीस

Image
🚩 माझी भटकंती 🚩             क्रमशः भाग बत्तीस         🛕करहर ता. जावली      आषाढी एकादशी देवदर्शन   🌸⛈️🌧️🌨️🌨️🌨️🌨️🌸  वैष्णवांची मांदियाळी अलोट भक्तीचा महासागर आषाढी एकादशीच्या दिवशी श्री क्षेत्र पंढरपूर येथे  वारकऱ्यांचा मेळा जमलेल्या असतो.संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या  व संत तुकाराम महाराजांच्या पादुका मिरवत  पायवारीपालखी  सोहळा कैवल्याच्या विठूरायाला भेटायला जातो....    सातारा जिल्ह्यातील ज्या भाविकांना  पंढरपूरी जाणे शक्य होत नाही ,असे भाविक प्रतिपंढरपूर समजले जाणाऱ्या करहरकडे श्री विठ्ठल व रखुमाईच्या दर्शनासाठी येतात......  आमचे मित्र श्री भास्कर पोतदार व सांप्रदायिक शिक्षक मित्र श्री बाळासाहेब बांडे आणि श्री वाघ सरांबरोबर करहरला जाण्याचा योग आला.वाईतून फराळ करुन पसरणी घाटाने पाचगणीत गेलो..रुईघर मार्गे आमचीही दुचाकीची दिंडी करहरला निघाली...पावसाळ्यातील  सृष्टीचा नजराणा हिरवेगार डोंगर, कड्यावरुन वहात येणारे छोटे-मोठे धबधबे, अचानक येणारा पाऊस...

माझी भटकंती भिलार भाग क्र..२३

Image
🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸 ⛰️माझी भटकंती⛰️    क्रमशः भाग-तेवीस             🍓  भिलार 🍓  🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 महाबळेश्वर  महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण व प्रेक्षणीय स्थळ असून, येथे पर्यटक वर्षभर भेट देतात. ब्रिटिश काळापासून महाबळेश्वराला लाभलेला उत्कृष्ट गिरीस्थान हा लौकिक आजही कायम आहे. समुद्रसपाटीपासून १,३७२ मीटर उंचीवर पश्चिम घाटांच्या रांगेत वसलेले महाबळेश्वर हे  पर्यटनाचे निसर्गरम्य थंड हवेचे  ठिकाण. महाराष्ट्राचे नंदनवन ,  सह्याद्री पर्वताच्या पश्चिम घाटमाथ्यावर आहे..महाबळेश्वरला जाताना  पांचगणी पासून पुढे गेल्यावर भिलार 🍓 फाटा लागतो.तेथून भिलार ३ किमीवर आहे..या डोंगर भागातील खास  वैशिष्ट्ये म्हणजे निसर्ग पर्यटन व  लालचुटुक स्ट्रॉबेरी फाॅर्म... जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक व माजी आमदार भि.दा.भिलारे गुरुजींचे गाव.अलिकडे पुस्तकांचे गाव व स्ट्रॉबेरी महोत्सवाचे गांव म्हणून फेमस आहे.    आमचे मित्र श्री प्रशांत वाडकर यांचे दाजी श्री शिवाजी भिलारे... यांच्या कडे ...

माझे डीएड कॉलेज क्रांतिस्मृती डीएड कॉलेज सातारा बॅचमेट

Image
आमचे    क्रांतिस्मृती अध्यापक विद्यालय , सातारा मित्रांनो नमस्कार.क्रांतिस्मृती अध्यापक विद्यालयातील प्राध्यापकांनी दोन वर्षे आपल्यावर  शिक्षणसंस्कार करून.व्यक्तिमत्त्वाचा विकास करून.गुणांची पारख करून आपल्या छंदांना क्रियाशील व्यासपीठावर देवून आपणास  अध्यापक बनविले.आपला सन १९८८ साली    स्मृतीग्रंथ निरोप समारंभात बाईडिंग केला.......एकमेकांचा निरोप घेऊन ग्रंथातील ४२ पानं आपापल्या घरी आली.परीक्षेचा रिझल्ट लागला... प्राथमिक शिक्षक पदांची वर्तमानपत्रातील जाहिरात वाचून  प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळाकडे  अर्ज केला..लेखी परीक्षा व मुलाखतीनंतर काहींची जानेवारी अथवा जुलै मध्ये प्राथमिक शिक्षक पदी नियुक्ती आदेश आला.काहिंना स्व: तालुका तर काहिंना परतालुक्यातील शाळेत हजर व्हावे लागले.दरम्यान काहीजण माध्यमिक शिक्षक झाले.तर काहीजण आवडीच्या क्षेत्रात पोलिस, सैन्यदलात गेले.दरम्यानच्या काळात एकमेकांच्या गाठीभेटी कारणपरत्वे होतच राहिल्या.. विशेषत प्रशिक्षणात, लग्नसमारंभ प्रसंगी व अधिघटनेच्या अधिवेशनात स्मृतीग्रंथातील पाने गाठीभेटी घेतच होती... दरम्यानच्या काळात...