Posts

पुस्तक परिचय क्रमांक:२८६ फिरता फिरता

Image
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २८६ ||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव -फिरता फिरता  लेखक: द्वारकानाथ व सुप्रिया संझगिरी  📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२८६ पुस्तकाचे नांव-फिरता फिरता  लेखक-द्वारकानाथ व सुप्रिया संझगिरी  प्रकाशन-दिलीपराज प्रकाशन, पुणे  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-२५मार्च २०२३ द्वितीयावृत्ती पृष्ठे संख्या–१८२ वाड़्मय प्रकार-प्रवासवर्णन  किंमत /स्वागत मूल्य-२६०₹ ””””””””””””””””””””””””””””””””””””””””” केल्याने देशाटने आणि पहावी रम्य मनोहारी आणि नेत्रदीपक स्थळे मग ती निसर्गसंपदेची असो वा मानवनिर्मित असो!त्या स्थळांना ऐतिहासिक संदर्भ असतो.अशीच स्थळे देशविदेशात पाहण्यासाठी गेलेल्या श्री द्वारकानाथ व सौ सुप्रिया संझगिरी यांचे‘फिरता फिरता’हे प्रवासवर्णन वाचक रसिकांना घरबसल्या परदेशवारी घडवून आणते.इतकं सुंदर आणि समर्पक शब्दात  भेट दिलेल्या स्थळांचे आणि कळतनकळत घडलेल्या किस्स्यांचे वर्णन अफलातून आहे. परदेशातील लोकप्रिय व देखण्या स्थळांची रंगीबेरंगी चित...

पुस्तक परिचय क्रमांक:२८५ शब्दांच्या अल्याड पल्याड

Image
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २८५ ||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव - शब्दांच्या अल्याड पल्याड  लेखक: अनुजा जोशी  📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२८५ पुस्तकाचे नांव-शब्दांच्या अल्याड पल्याड  लेखक-अनुजा जोशी प्रकाशन-अक्षरधन प्रकाशन, पुणे  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-मार्च २०२६ प्रथमावृत्ती पृष्ठे संख्या–१४४ वाड़्मय प्रकार-ललित  किंमत /स्वागत मूल्य-२५०₹ ””””””””””””””””””””””””””””””””””””””””” आपल्या अवतीभोवती घडलेल्या घटना आणि साहित्य यांचे कुतूहल निर्माण करणारे वेल्हाळ म्हणजे निळ्या शाईचा साहित्य प्रवाह…लेखिका तथा कवयित्री अनुजा जोशी यांच्या लेखणीतून सजलेला ‘शब्दांच्या अल्याड पल्याड’हा ललित संग्रह म्हणजे वाचक रसिकांना साहित्यातील विविध साहित्य प्रकार,भाषा,वाचन संस्कृती,रुपक,प्रतिमा,मिथक आणि नियतकालिकांच्या सहवासातील एक अनोखे सुंदर पर्व लेखिका अनुजा जोशी भेटीला घेऊन आल्या आहेत.सन २०१६ मध्ये दैनिक गोवादूत मध्ये ‘शब्दांच्या अल्याड पल्याड'नावाचं एक सदर चाललं होतं,त्यातील ह...

पुस्तक परिचय क्रमांक:२८४ मराठी साहित्य शोध आणि बोध

Image
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २८४ || पुस्तक परिचय पुस्तकाचे नाव – मराठी साहित्य शोध आणि बोध लेखिका – अनिता जाधव 📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 वाचन साखळी समूह, महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता – श्री. रवींद्रकुमार गणपत लटिंगे, ओझर्डे–वाई पुस्तक परिचय क्रमांक – २८४ पुस्तकाचे नाव – मराठी साहित्य शोध आणि बोध लेखिका – अनिता जाधव प्रकाशन – समीक्षा पब्लिकेशन, पंढरपूर प्रकाशन वर्ष व आवृत्ती – १ एप्रिल २०२६, प्रथमावृत्ती पृष्ठसंख्या – १५० वाङ्मय प्रकार – समीक्षा ग्रंथ किंमत / स्वागत मूल्य – ₹२२०  --- मराठी भाषा म्हणजे सौंदर्याची खाण आणि तिचे वैभव म्हणजे लिखित साहित्य. विविधांगी साहित्यप्रकारांतील पुस्तकांचे वाचन व लेखन करून, समर्पक शब्दांत लेखक-कवींचे विचारविश्व आपल्या ओजस्वी शैलीत उलगडून दाखवणे आणि वाचक-रसिकांना ‘शब्दगंध’ अनुभवण्यासाठी उद्युक्त करणे, हे एका साहित्यसमीक्षकाचे महत्त्वाचे कार्य असते. पण लेखिका अनिता जाधव यांनी केवळ वाचन-लेखन न करता, त्यांना आवडलेली, भावलेली, चिंतनात्मक आणि सकारात्मक विचार करायला लावणारी पुस्तके निवडून त्यांचे समीक्षण एका सुंदर ग्रंथात गुंफले आहे. हे पुस्तक प्रकाशित करण्य...

पुस्तक परिचय क्रमांक.२८३ कृष्णामाई

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२८३ पुस्तकाचे नांव-कृष्णामाई  लेखक: प्रदीपकुमार कांबळे -बहेकर प्रकाशन-न्यू इरा पब्लिशिंग हाऊस, पुणे  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-२०२५ प्रथमावृत्ती पृष्ठे संख्या–१५२ वाड़्मय प्रकार-कथासंग्रह किंमत /स्वागत मूल्य-२५०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २८३ ||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव -कृष्णामाई लेखक: प्रदीपकुमार कांबळे -बहेकर  📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 कृष्णाकाठच्या गावातील माणसांच्या वास्तव कथा.. महाराष्ट्राची जीवनदायी, जीवनवाहिनी संथ वाहणाऱ्या कृष्णामाईच्या तीरावर अनेक तीर्थक्षेत्र वसलेली आहेत.अगदी उगमापासून ते सागराला मिळेपर्यंत वेगवेगळ्या देवादिकांची आहेत.कृष्णामाई महाबळेश्वर येथे उगम पावते अन् वाई, सातारा,सांगली जिल्ह्यातून कर्नाटकात प्रवेशते.कृष्णेच्या काठावरील बहे गावचे सुपुत्र लेखक श्री प्रदीपकुमार कांबळे यांनी ‘कृष्णामाई’या कथासंग्रहाचे लेखन केले आहे.या पुस्तकावरील आकर्षक आणि देखणं मुखपृष्ठ कृष्णामाईच्या बहे येथील तीरावरील ‘रामलिंग बेट’ अतिशय सुंदर आणि पवित्र तीर्थक...

वाढदिवस शुभचिंतन

Image
आपुलकीच्या नात्याचा नवा आयाम… वाढदिवसाचे शुभचिंतन!  काही नाती रक्ताची नसतात… ती मनाची असतात. काही भेटी मोलाच्या नसतात… त्या भावनेने अनमोल ठरतात. आणि काही क्षण क्षणिक असतात… पण आयुष्यभराच्या आठवणी बनून मनात घर करून राहतात! शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं हे अशाच निरागस, निर्मळ आणि संस्कारमय भावबंधाचं असतं. शिकवताना शिक्षक ज्ञान देतात; पण नकळत ते विद्यार्थ्यांच्या मनात मूल्यांची, संस्कारांची आणि माणुसकीची पेरणीही करत असतात. म्हणूनच शिक्षकांचा वाढदिवस हा विद्यार्थ्यांसाठी केवळ शुभेच्छा देण्याचा दिवस राहत नाही; तो आपुलकी व्यक्त करण्याचा, ऋणानुबंध जपण्याचा आणि आपल्या मनातील प्रेम कृतिशील करण्याचा एक सुंदर उत्सव बनतो. वाढदिवस जर आपल्या वर्गशिक्षिका किंवा वर्गशिक्षकांचा असेल, तर त्या दिवशी विद्यार्थ्यांच्या मनातील उत्साहाला वेगळंच उधाण आलेलं असतं.त्यांच्या छोट्या-छोट्या कल्पना, आग्रह आणि प्रेमळ सूचना शिक्षकांनीही आनंदाने स्वीकाराव्यात लागतात. कारण शाळेत विद्यार्थी आणि शिक्षकांचं नातं हे केवळ शिक्षणापुरतं मर्यादित नसतं; ते मूल्ये आणि संस्कृती यांच्या आचरणाचे, अनुकरणाचे आणि संवर्धना...

पुस्तक परिचय क्रमांक:२८२ क्रिकेटर्स मनातले

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२८२ पुस्तकाचे नांव-क्रिकेटर्स मनातले लेखक: द्वारकानाथ संझगिरी  प्रकाशन-सुरेश एजन्सी, पुणे  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-२०२४ प्रथमावृत्ती पृष्ठे संख्या–२५६ वाड़्मय प्रकार-ललित किंमत /स्वागत मूल्य-३४०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २८२ ||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव -क्रिकेटर्स मनातले लेखक: द्वारकानाथ संझगिरी  📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚  भारतीय क्रिकेटच्या इतिहासाला ज्यांच्या अत्युत्तम खेळीने सुवर्ण झळाळी लाभली. त्या दिग्गज क्रिकेटपटूंच्या कार्यकर्तृत्वाचा उंचावणारा आलेख म्हणजे ‘क्रिकेटर्स मनातले’.  हल्ली तेच क्रिकेट भारतीय क्रिडा रसिक प्रेक्षकांच्या हदयसिंहासनी विराजमान झाले आहे.त्या महान क्रिकेटपटूंच्या ऐतिहासिक कसोटी सामन्यातील,रणजी सामन्यातील आणि काउंटी सामन्यातील  संस्मरणीय खेळीची ओळख ‘क्रिकेटर्स मनातले’या पुस्तकाचे लेखन लोकप्रिय  स्तंभलेखक, चतुरस्त्र लेखक आणि क्रिडा समिक्षक क्रिकेटच्या विश्वासातील संदर्भ आपल्या लेखणीतून बोलके करणारे द्वारकानाथ संझग...

पुस्तक परिचय क्रमांक :२८१ वारी एक आनंदयात्रा

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२८१ पुस्तकाचे नांव-वारी एक आनंदयात्रा  लेखक: संदेश भंडारे  प्रकाशन-मनोविकास प्रकाशन, पुणे  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-२०१८ तृतीयावृत्ती पृष्ठे संख्या–१५६ वाड़्मय प्रकार-छायाचित्र मालिका किंमत /स्वागत मूल्य-५५०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २८१ ||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव -वारी एक आनंदयात्रा  लेखक: संदेश भंडारे  📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚        पंढरीच्या वारीची छायाचित्र दर्शनकथा  वारकऱ्यांची भजन-कीर्तनाची मांदियाळी अन् मुखाने ‘माऊली’नामाचा जयघोष, टाळचिपळ्याची संगत अन् मृदंगाच्या ठेक्यावर पताकांचे झेंडे नाचवत अन् तुळशीवृंदावन डोईवर घेत पाउले चालतात देहु-आळंदी ते पंढरपूरी…. वारकऱ्यांची पायवारी…..अफाट जनसमुदाय लोटतो. ‘वारी एक आनंदयात्रा’या छायाचित्रांचे पुस्तक प्रकाशित केले आहे;प्रसिध्द छायाचित्रकार संदेश भंडारे यांनी.  छाया-प्रकाशाच्या लिपीने मानवी स्थिती-गतीची, अवस्थांची अभिव्यक्ती करणारे छायाचित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत.पुणे...

प्रवेशोत्सव माझेरी पुनर्वसन

Image
जिल्हा परिषद मॉडेल स्कूल, माझेरी पुनर्वसन येथे आनंदमयी वातावरणात शाळा प्रवेशोत्सव साजरा जिल्हा परिषद मॉडेल स्कूल, माझेरी पुनर्वसन (ता. फलटण, जि. सातारा) येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी शाळेचा पहिला दिवस व शाळा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला. इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत शिक्षण संचालनालय, पुणे येथील शिक्षण उपसंचालक डॉ. वंदना वाहूळ (योजना विभाग), भाऊसाहेब सरक आणि संभाजी देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी आदरणीय डॉ. वंदना वाहूळ यांनी प्रवेशोत्सवातील विविध उपक्रमांची माहिती घेत इयत्ता पहिलीच्या वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज आणि सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास विनोद शिंदे, मा. सरपंच ज्ञानेश्वर दिघे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू दिघे, उपसरपंच प्रवीण दिघे तसेच व्यवस्थापन समिती सदस्य बशीर शेख व वैभव पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या शुभहस्ते नव...

पुस्तक परिचय क्रमांक:२८० वंगचित्रे

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२८० पुस्तकाचे नांव-वंगचित्रे लेखक: पु.ल. देशपांडे  प्रकाशन-साकेत प्रकाशन, पुणे  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-२०१३ दहावी पृष्ठे संख्या–२२४ वाड़्मय प्रकार-ललित व्यक्तिचित्रं  किंमत /स्वागत मूल्य-२००₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २८० ||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव -वंगचित्रे लेखक: पु. ल. देशपांडे  📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 महाराष्ट्राच्या साहित्यविश्वातील बहुआयामी लाडके व आदरणीय व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांडे यांच्या निरीक्षणातून, ऐकून आणि प्रत्यक्ष भेटीतून पाहिलेल्या बंगाल राज्यात बंगाली भाषा शिकायला तीन महिने गेले होते.तेंव्हा पाहिलेली शहरे, शांतिनिकेतन प्रवासात पाहिलेल्या व भेटलेल्या व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि समाजातील प्रवृत्तींचे वर्णन मार्मिकपणे हलक्याफुलक्या शैलीत लेखकांनी केले आहे.वाचताना हास्याचे लकेर उमटतेच.इतकं समर्पक शब्दचित्रण लेखणीतून साकारलेले आहे.प्रत्यक्ष वंग प्रांताची घरबसल्या भटकंती करायला लावणारं लेखन आहे. भाषा शिकायची असेल तर ती जिथं आतून उमटते अशा ...

पुस्तक परिचय क्रमांक:२७९ समासातल्या नोंदी

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२७९ पुस्तकाचे नांव-समासातल्या नोंदी लेखक:प्रा.कुंडलिक कदम प्रकाशन-परिस पब्लिकेशन सासवड ता पुरंदर जि.पुणे  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-२०२६,प्रथम आवृत्ती  पृष्ठे संख्या–१५२ वाड़्मय प्रकार-ललित लेख किंमत /स्वागत मूल्य-३५०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २७९||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव -समासातल्या नोंदी लेखक: प्रा.कुंडलिक कदम ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~    दोन पिढ्यांतील वैचारिक अधिष्ठान वैचारिक लेखांतून गुंफणारे लेखक प्रा कुंडलिक कदम यांचे तिसरे अक्षरधन ‘समासातल्या नोंदी’.बालपणाच्या साठवणीतील आठवणी जाग्या करणारे लेख वैचारिक मंथन करायलाही भाग पाडतात.इतकं सकस आणि सहज सोप्या शब्दात त्यांनी आपल्या सहवासातील व्यक्तींच्या अंतरंगाची ओळख करुन देताना त्यांच्या इतरांपेक्षा वेगळ्या स्वभाव वैशिष्ट्यांची ओळख करून देतात. लेखक तथा प्राध्यापक कदम सरांचा गोतावळा मोठा आहे.माणसं पारखून त्यांच्यावर लेखन करण्याची कला ही सहजसाध्य नाही.यासाठीआशयाच्या  निरीक्षणाचे अवकाश विस्तीर्ण करुन,...

सेवा गौरव सौ राजश्री कुंभार मॅडम

Image
       सेवापुर्तीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹  शुभचिंतनपर मनोगत  सेवाप्रारंभ आणि सेवापुर्ती या दोन शब्दांमधील यशस्वी वाटचाल म्हणजे आपण शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घकाळ केलेली तपस्या… आदरणीय सौ राजश्री संभाजी कुंभार मॅडम,  प्राथमिक शिक्षिका पदावरून सुरू झालेला आपला प्रवास आज केंद्रप्रमुख पदापर्यंत यशस्वीपणे पोहोचून 31 मे ला आपण नियतवयोमानाने सेवानिवृत्त होत आहात.  ही केवळ पदोन्नतीची वाटचाल नसून कर्तव्य,प्रामाणिकपणा आणि शिक्षण सेवेच्या निष्ठेची प्रेरणादायी गाथा आहे.     मॅडम आपण हिंदी विषयाच्या पदवी परीक्षेत सुवर्णपदक विजेत्या आहात  याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आपले यजमान कुंभार सर म्हणजे इंग्रजी विषयाचे गाढे अभ्यासक.आपल्या सोबतीने शाळेत भेटीला आले की ते आवर्जून वर्गात जाणार अन् मुलांच्या  इंग्रजी ॲक्टिव्हिटी घेणारच…कुंभार परिवार म्हणजे शैक्षणिक कृतीशीलतेचा  दीपस्तंभ…        जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांप्रती असलेली ममता, सहकारी शिक्षकांविषयी जिव्हाळा, प्राथमिक शाळांविषयीची तळमळ आणि प्रशासनातील स...

सेवा गौरव वर्षा गायकवाड मॅडम

Image
आदरणीय सौ. वर्षाताई गायकवाड मॅडम यांना सेवानिवृत्ती निमित्त शुभचिंतन शिक्षण क्षेत्रात सेवाभाव, कर्तव्यनिष्ठा आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली अपार तळमळ यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आदरणीय शिक्षण विस्तार अधिकारी सौ. वर्षाताई गायकवाड मॅडम. नियतवयोमानानुसार त्या सेवानिवृत्त होत असल्या तरी त्यांचे कार्य, विचार आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शिक्षण क्षेत्रात कायम स्मरणात राहील. अध्यापिका म्हणून कार्यरत असताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अथक परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाची गोडी निर्माण करणे, त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला यशस्वी होण्यासाठी प्रोत्साहित करणे हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य राहिले. त्यामुळे त्या विद्यार्थीप्रिय अध्यापिका म्हणून सर्वांच्या मनात विशेष स्थान निर्माण करू शकल्या. पुढे शिक्षण विस्तार अधिकारी या जबाबदारीच्या पदावर कार्य करताना त्यांनी प्रशासकीय कार्यातही उत्कृष्ट कामगिरी बजावली. शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावणे, शिक्षकांना प्रेरणा देणे, नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन देणे आणि शिक्ष...

पुस्तक परिचय क्रमांक:२७८ तू भ्रमत आहासी वाया

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२७८ पुस्तकाचे नांव-तू भ्रमत आहासी वाया  लेखक: व पु काळे प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-२०११,पुनर्मुद्रण आवृत्ती  पृष्ठे संख्या–८४ वाड़्मय प्रकार-कादंबरी किंमत /स्वागत मूल्य-९५₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २७८||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव -तू भ्रमत आहासी वाया  लेखक: व पु काळे  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ सुगंधाचा प्रारंभ आणि शेवट शोधता येत नाही म्हणून वाऱ्याचा एक हलकासा झोका त्याला जिथपर्यंत नेईल तिथपर्यंत त्याचं आकाश.वारा म्हणजे जमीन आणि आकाश ह्यांचं मिलन अंकुरित झालं हा संदेश माणसापर्यंत नेणारा दूत….. —-व पु काळे  सुंदर मनांवर आणि विचारांवर आधारित असणाऱ्या अप्रतिम कथा गुंफणारे लेखक कथाकथनकार आणि उत्तम रसिक व पु काळे यांनी शब्दबध्द केलेली एक सुंदर कादंबरी ‘तू भ्रमत आहासी वाया’.  ज्यांचं बोलणं ऐकत राहावं,अशा सौ सरोजिनी वैद्य, श्रीमती शांता शेळके,सौ वीणा देव आणि अरुणा ढेरे.स्पष्ट वाणी, नेमके विचार, योग्य विवेचन आणि नि...

पुस्तक परिचय क्रमांक:२७७ पालकांशी शिक्षकांशी हितगुज

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२७७ पुस्तकाचे नांव-पालकांशी शिक्षकांशी हितगुज  लेखक: डॉ ललिता गुप्ते प्रकाशन-उन्मेश प्रकाशन, पुणे  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-११९२,प्रथमा आवृत्ती  पृष्ठे संख्या–११९ वाड़्मय प्रकार-ललित किंमत /स्वागत मूल्य-४०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २७७||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव -पालकांशी , शिक्षकांशी हितगुज  लेखक: डॉ ललिता गुप्ते  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ “शिक्षण म्हणजे दळण नव्हे तर जीवनाला उत्तम वळण लावण्याचे एक उत्तम साधन” प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व्ही व्ही चिपळूणकर यांचा वैचारिक अभिप्राय ‘पालकांशी शिक्षकांशी हितगुज’या पुस्तकाचा आशय विषय अधोरेखित करतो.तसेच शिक्षण आनंददायी व कृतीयुक्त होण्यासाठी पालकांशी व शिक्षकांशी संवाद साधण्यासाठी नेमके काय करावे? हे प्रयोगशील उपक्रमशील विद्यार्थीप्रिय लेखिका डॉक्टर ललिता गुप्ते यांनी अनुभवाची शिदोरी या पुस्तकातून कथारुपाने गुंफली आहे. या पुस्तकाचे मुखपृष्ठ आकर्षक व वेगळ्या संकल्पनेचे असून,फुलपाखराचे गुलाबपुष्पाशी गुंजारव हे ...

पुस्तक परिचय क्रमांक:२७६ दुनियादारी

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२७६ पुस्तकाचे नांव-दुनियादारी लेखक: सुहास शिरवळकर  प्रकाशन-दिलीपराज प्रकाशन, पुणे  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-२०२०, सोळावी आवृत्ती  पृष्ठे संख्या–२८३ वाड़्मय प्रकार-कादंबरी किंमत /स्वागत मूल्य-४५०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २७६||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव -दुनियादारी लेखक: सुहास शिरवळकर  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ कॉलेज जीवनावर आधारित लोकप्रिय कादंबरी मैत्री,प्रेम आणि वास्तव जीवनाचा सुंदर आविष्कार‘दुनियादारी’ या कादंबरीत शब्दबध्द केला आहे.  महाविद्यालयीन तरुणतरुणींचे विश्व उलगडून दाखविण्याचे काम रहस्यमय कादंबरीचे लोकप्रिय लेखक सुहास शिरवळकर यांनी केले आहे. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणांची लाईफस्टाईल दिल दुनियादारी आणि दोस्ती हा मुख्य आशय घेऊन एका काल्पनिक कादंबरीचे लेखन केले आहे.कॉलेजविश्वातील मित्रमैत्रिणींचे अनुभव,लाईफस्टाईल,लव्हस्टोरी आणि  दुष्मनी ‘दुनियादारी’या कादंबरीत मांडले आहेत.ही कादंबरी वाचताना आपल्या कॉलेजच्या काळातील आठवणी रुंजी घालतात.इतक...

पुस्तक परिचय क्रमांक:२७५ सृजनाची वाट

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२७५ पुस्तकाचे नांव-सृजनाची वाट लेखक: संदीप वाकचौरे  प्रकाशन-चपराक प्रकाशन, पुणे  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-२०२५, दुसरी आवृत्ती  पृष्ठे संख्या–१५२ वाड़्मय प्रकार-विचारधारा किंमत /स्वागत मूल्य-२५०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २७५||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव -सृजनाची वाट लेखक: संदीप वाकचौरे  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~   सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही.तसेच आपले जीवनमान आनंदमयी करण्यासाठी चांगले संस्कार आचरणात आणणे म्हणजे चांगले शिक्षण.अशा शैक्षणिक विचारांचे लेखन करणारे ज्ञानसाधक,पत्रकार संतसाहित्याचे अभ्यासक तथा लेखक श्री संदीप वाकचौरे यांनी ‘सृजनाची वाट’या बाराव्या पुस्तकाचे लेखन केले आहे. ‘सृजनाची वाट’या पुस्तकाचे मुखपृष्ठ आकर्षक असून नवनवीन शिक्षणाचे विचार रसग्रहण करायला मिळतील.याची साक्ष देणारे आहे.लेखकांनी हे पुस्तक शिक्षणाची वाट सुलभ करणाऱ्या थोर महापुरुषांना ‘कर्मवीरांना’ व सर्व गुरुजनांना अर्पण केले आहे.तर मलपृष्ठावरील प्रकाशक ...

विनम्र अभिवादन सामाजिक कार्यकर्ते

Image
              आमचे श्रध्देय पिताश्री ओझर्डे येथील स्वकुळ साळी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व श्री. गणपत तुकाराम लटिंगे (वय ८४) यांचे वार्धक्याने व किरकोळ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. श्री. लटिंगे यांनी आपल्या कष्टाळू आणि प्रामाणिक स्वभावाच्या जोरावर आयुष्यभर समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली. वाई येथील अडत व्यापाऱ्याकडे त्यांनी अनेक वर्षे दिवाणजी म्हणून प्रामाणिकपणे सेवा बजावली. व्यवहारातील सचोटी, नम्रता आणि लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध यामुळे त्यांना सर्व स्तरांत मानाचे स्थान प्राप्त झाले होते. गावातील सोंगे उत्सव, यात्रा तसेच जिव्हेश्वर उत्सवामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. धार्मिक व सामाजिक कार्यात ते नेहमी अग्रेसर राहून गावच्या परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी योगदान देत असत. समाजातील युवकांना एकत्र आणणे, उत्सवांमध्ये सहकार्य करणे आणि सामाजिक ऐक्य टिकवून ठेवणे यासाठी त्यांचे विशेष प्रयत्न असत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मोलमजुरी व अर्धकुशल काम करून त्यांनी आपल्या कुटुंबाचा संसार उभ...