शिवस्वराज शिवराज्याभिषेक दिन
शिवस्वराज्य दिन शिवराज्याभिषेक सोहळा ! हार्दिक हार्दिक शुभेच्छा! त्रिवार मानाचा मुजरा !
हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय ...
प्रौढ प्रताप पुरंदर महापराक्रमी रणधुरंदर
क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज"
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय!
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा गागाभट्ट यांनी रायगडावर राज्यभिषेक सोहळा केला होता. हा सोहळा भव्यदिव्य आणि उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. हिंदू पंचांगानुसार 1674 रोजी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला शिवाजी महाराजांचा रायगड किल्ल्यावर राज्याभिषेकाचा सोहळा पार पडल्यानंतर ते हिंदवी साम्राज्याचे छत्रपती झाले.
---शिवराज्याभिषेक सोहळा---
सोहळा आऊसाहेब બિબાऊंच्या संस्कारांचा...
सोहळा शहाजीराजेंच्या विचारांचा...
सोहळा श्रीमंत छत्रपती रयतेचे राजे शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पराक्रमांचा...
सोहळा श्रीमंत सईंराणीसाहेबांच्या अभिमानाचा...
सोहळा स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा...
सोहळा महाराष्ट्राच्या अभिमानाचा...
सोहळा मराठा अस्मितेच्या बहुमानाचा.....
सोहळा संत तुकोबांच्या भक्तीचा...
सोहळा पराक्रमाची शर्थ केलेल्या सुभेदार नरवीर समस्त शूरवीरांचा....
सोहळा कर्तबगार मावळ्यांच्या ताकदीचा,शक्तीचा शौर्याचा....
सोहळा सह्याद्रीच्या तुफानाचा....
सोहळा या मातीच्या ऋणांचा...
सोहळा मराठी मनामनांचा.....
सोहळा गडकोटाच्या औक्षणांचा...
सोहळा इतिहासाच्या सुवर्ण क्षणांचा...
सोहळा आभाळा एवढ्या उत्तुंग स्वराज्याचा...
सोहळा भगव्याच्या प्रतिष्ठेचा...
सोहळा अजिंक्य रणांगणाचा...
सोहळा शूरवीर बहुजनांचा
सोहळा तळपणाऱ्या तलवारीच्या पातीचा...
सोहळा निधड्या पोलादी छातीचा...
सोहळा रायगडाच्या साक्षीचा...
*सोहळा શિવ राज्याभिषेकचा*
मराठा साम्राज्याच्या पराक्रमाचा,जल्लोषाचा दिवस .
.
*🚩शिवराज्याभिषेक दिवस 🚩*
सर्वांना शिवराज्याभिषेक दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
🚩🚩🚩
|| जय जिजाऊ ||
|| जय शिवराय ||
|| जय शंभूराजे ||
*सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर।*
*जातपात ना इथे पहिली जगला माणुसकीवर।*
*पुन्हा जन्म घ्या हीच इच्छा शिवमावळ्यांच्या हृदयावर।*
*माझ्या राजांच नाव गाजतय साऱ्या जगाच्या हृदयावर।*
*सर्व शिवभक्तांना शिव स्वराज्य दिनाच्या मनःपूर्वक शिवमय शिव शुभेच्छा🚩🚩🚩🚩🚩🚩*
Copy and paste
Comments
Post a Comment