काव्य पुष्प-२२५झाडांचं जगणे असे..

    झाडांचे जगणे असे….


झाडांचे जगणे असे…..


झाडांचा आई अन् देवासारखा आधार घेवूया

झाडातील देवपण अक्षरांच्या दिव्यांनी जपूया

कल्पवृक्षाच्या शोधात पालवीचा सूर्य ओळखूया

फुलापानांशी संवाद साधत वृक्षदिंडी काढूया||


माणुसकीचा पाऊस पाडायला रोपटी लावूया

सोन्याचे झाड पावसात बहरु द्या फुलू द्या

झाडांच्या सावलीत फांद्याव पाखरं बागडू द्या

हसत हसत झाडांना समाधानाने जगू द्या||


झाडांचे झाडपण जपत मनोगत ऐकूया  

झाडांचा वसा माणसामाणसात रुजवूया

'झाडांचे जगणे असे' काव्य पुष्प वाचूया

वठलेल्या झाडांची संवेदना जाणवूया||


लहानांसवे झाड होऊन जावूया

मुळांवर घाव घालणारे ओळखूया 

झाडांचा छंद जीवापाड जपूया

झाडांकडून जगणं  शिकूया||


(कवी अनिल बोधे यांच्या शिर्षकाव्याची रचना)


श्री रवींद्र लटिंगे ओझर्डे वाई


दिनांक-२४मे २०२१







Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड