५०|पुस्तक परिचय, अबोली
📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚
५०|पुस्तक परिचय
अबोली
लेखक-वि.स.खांडेकर तथा भाऊसाहेब
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
मराठी साहित्याला खऱ्या अर्थाने देशपातळीवर लोकप्रियता मिळवून देणारे ऋषितुल्य गुरुवर्य ज्येष्ठ साहित्यिक, पटकथा लेखक,ज्ञानपीठ पारितोषिक सन्मानित भाऊसाहेब तथा वि स खांडेकर अशा अनेकविध बिरुदावलीने सन्मानित झाले आहेत.त्यांची साहित्य संपदा विपुल आहे.त्यातील एक अक्षरकृती "अबोली" हा लोकप्रिय कथासंग्रह होय.ते आवर्जून उल्लेख करतात की,'कथाबीजं दाही दिशांनी मनात येऊन पडतात…प्रत्यक्ष अनुभवलेल्या एखाद्या भावनेच्या छटेतून तो सहजगत्या कानांवर पडलेल्या एखाद्या चार-दोन ओळींच्या घटनेत सुध्दा कथेचं बीज लपलेलं असतं.'पण ते बीजं पुरवण्याचे सामर्थ्य पुष्कळांच्या अंगी नसतं.मी ही एक प्रयत्नकर्ताच आहे.
'अबोली' हिरव्या पातीतलं नाजुकसं सुंदर,कोमल अन् केसरी रंगातलं बिनवासाचं पुष्प . पण पाहिले की आपली नजर वेधून घेते.आबोलीच्या फुलांचा वेणी आणि गजऱ्यात आनंद देण्ं जसं आहे तसंच हा कथासंग्रह रसिक वाचकांना कथा वाचताना आनंद देतो.
कथांतील भाषेचे सौंदर्य आणि सामर्थ्य पानोपानी ओथंबून भरलेले आहे.ते वाचताना मन रिजविते.काही कथांतील प्रसंगातील टर्निंग पॉइंट अफलातून शब्दात गुंफले आहेत.
भावना, संवेदना कल्पना यांच्या त्रिवेणी संगमावर आपण न्हाऊन जातो.इतकं लेखन भावस्पर्शी केले आहे.त्यांनी अनुभव कथेत प्रतिबिंबित केले आहेत.शब्दभंडारातील अस्सल चपखल शब्दसुमनांचा उपयोजना करुन कथा फुलविली आहे.निरागस अवीट गोडी चर्या प्रेमकथांना वेगळीच उंचीचा दर्जा भाषाशैलीनं जाणवितो.
अबोली कथासंग्रहात एकंदर अकरा लघुकथा समाविष्ट केल्या आहेत.सुवास,महादेवाचे देऊळ,ताईचाफोटो, राजकवी,खडकातले पाणी,पहिली चूक, आरामखुर्ची, इथले रेनकोट व सनातन धर्म, दोन गुलाम शेजारी स्वप्ने या नामांकित शीर्षक कथा आहेत.मनोरंजक कथा आहेत. फुलाचा रंग आपण विसरतो पण त्याचा दरवळणारा गंध आपण विसरत नाही.तो सदैव स्मृतीत राहतो.त्या ठिकाणची आठव आली की तो गंधच आपणाला ती आठवण ठळक करतो.
कांचन रेखा आणि शीला यांच्या मैत्रीचे संबंध दाखविणारी 'सुवास'कथा.स्त्रीपुरुषांच्या स्नेहाकडे निर्मळ दृष्टीने आपण कधी पाहतच नाही.फुलाजवळ जाणारे मनुष्य मधासाठीच जात आहे असे फुलपाखराला वाटते.दूर उभे राहूनही सहज येणाऱ्या सुवासावरही संतुष्ट होणारी माणसे असतात याची कल्पना त्याला कशी आणून द्यायची? यासम अनेक संस्करणे या लेखात वाचताना जाणवतात.
'महादेवाचे देऊळ'ही कथा मातृप्रेमाचे वात्सल्य जागृत करणारी आहे.तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला मुलगा, अचानक देशभक्तीसाठी पाईक व्हायला निघालेला असतो.त्याला आज्ञा द्यायची असते.तेव्हा महादेवापुढे देशप्रेम आणि मातृप्रेम यांच्यात द्वंद्वयुद्ध लागलेले असते. त्याचा निकाल देव कौल अथवा प्रसाद देऊन करेल यावर आईचा ठाम विश्वास असतो.म्हणून ते गोव्यातील महादेव मंदिरात निघालेले असतात.तेथील घटनेचे वर्णन सुंदर शब्दात खुलवून कथेची उत्कंठा वाढविली आहे.'ताईचा
फोटो'या कथेत दोन मुलांच्या दोस्तीचे चित्रण चहा आणि नाटक पुराणावर मार्मिकपणे केले आहे.एक हुशार आणि एक मध्यम अशा जोडीच्या मुलांच्या मनातील घालमेल आणि जिगर या कथेत उलगडताना शब्दवैभवाचा साथ दृष्टित येतो.वाचताना प्रसंग डोळ्यांसमोर तराळतात.
सुखात्म्याच्या बहीणीने त्यांच्यासाठी घेतलेल्या खस्ता आणि कष्ट प्रति बहिणीच्या फोटोला केलेली सोनेरी फ्रेम आणि सतत कोणत्याही कामाला त्याछ फोटोंचे दर्शन घेऊन शुभारंभ करणे.तसेच चहाचे पुराण यथोसांग खुलविले आहे.
'खडकातल पाणी'वरुन वाटणारी कणखर कथा भावस्पर्शी कशी होत जाते हे नकळत घडत असते.लीलाचे यजमान वीणा एजंट त्यामुळे सतत फिरतीवर असतात.
मुंबईत ते अचानक आजारी पडल्याने वीराला तडक मुंबईला जावे लागते.यजमानानं साथीचा आजार झाल्यामुळे ज्या खोलीत ते असतात.ते मालक इस्पितळात दाखल करण्याचा सल्ला देतात.पण लीला यजमानांना दाखल करीत नाही. कारण तिच्या वडिलांना इस्पितळात दाखल केल्यावर निधन झालेले असते.ते तिच्या मनात घोळत असते म्हणून ती यजमानांना इस्पितळात दाखल करत नाही.ती अनेक नातेवाईकांना भेटून त्यांच्याकडेच राहण्याची विनंती करते.पण सगळेच तिला इस्पितळात उपचार करण्याचे सुचवितातआणि घराची दारे त्यांच्या साठी बंद करतात.बंगले असणारे नातेवाईकही तीची मानहानी करतात.अवघड पेच तिच्यापुढे उभा असताना तिच्याच गावची केशर त्यांना वाटेत अचानक भेटते. स्वत:च्या बंगल्यातील एक खोली देते.ती शेठजीला गावाकडचा भाऊ आहे म्हणून सांगते.खरतर समाजभान असणारे नातेवाईक त्यांना नाकारतात आणि तिऱ्हाईत असणारी गणिका केशर त्यांना आधार देते. नात्यांची संवेदना दाखविणारी ही कथा आहे.
'पहिली चूक' ही कथाही माणसाच्या स्वभावाचे पैलू दागविणारी कथा रोमांचक आणि संवेदन जागृत करणारी आहे.गरीब मुलाने शाळेच्या दाखल्यात खाडोखोड करून शिष्यवृत्तीसाठी वय वाढविलं होतं.तो मुलगा शाळा तपासणी अधिका-याच्या घरी येऊन चुकी झालेबद्दल शीक्षा करु नका म्हणून विनवणी करतो पण अधिकारी गोडबोले यांना पाझर फुटत नाही.तो एकदाच चुक झाली माफ करा. त्यापाठीमागचे कारणही सांगतो.पण गोडबोले, पाहुणा मित्र
आठवले आला म्हणून त्या मुलास हाकलतो.त्याच्या मित्राने आणि त्याने सर्टिफिकेट मध्ये बेमालूमपणे तारीख बदलल्याने तो आय. सी. एस.झालेलाअसतो.त्याचा मुलगाही उच्चपदस्थ अधिकारी झालेला असतो.त्याच्याशी लालीचे लग्न जुळवायचे असते.'तेव्हा देव पहिल्या चुकीला क्षमा करतो.'मी आजवर तुझ्या शब्दाचे पालन करतोय? ते ऐकले,तेव्हा गोडबोलेशाळा तपासणींच्या डोक्यात प्रकाश पडतो.थोड्याच वेळापूर्वी घडलेल्या प्रसंगाने ते गंभीर होतात.
अस्वस्थ होतात.त्याचवेळी रस्त्यावर अचानक मोठा गलबला झाल्याच्या आवाजाने दोघेही खिडकीतून बाहेर बघतात.तर क्षमायाचना करणारा तोच मुलगा गाडीखाली आलेला असतो.अशी ही काळजाची ठाव घेणारी कथा आहे.नोकरी करणाऱ्यांनी सुध्दा अगोदर चूक करुन त्याचा गैरफायदा घ्यायला उद्युक्त केले असेल तर इतरजण करतात त्यांच्या चुकीला शिक्षा करण्याचा अधिकार आहे काय? तशाच इतरही कथा भावस्पर्शी, हृदयस्पर्शी आणि नात्यांची संवेदना व प्रेम उलगडून दाखवितात.
परिचय कर्ता-रवींद्र लटिंगे ओझर्डे वाई
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
पुस्तकाचे नांव -अबोली
लेखक-वि.स.खांडेकर
साहित्य प्रकार-कथा संग्रह
प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
आवृत्ती-चौथी
पृष्ठे-८४
मूल्य-८०₹
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
Comments
Post a Comment