काव्य पुष्प-२२६ मैत्रीचे नाते




जागतिक मैत्रीदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
मैत्रीचे नाते जपणाऱ्या तमाम मित्रमैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा!!

 मैत्रीचे नाते..........
आपुलकीने जपते  
निरपेक्षपणे उभारते 
सुखदुःखात उमगते 
हितगुजाने बहरते |

मैत्रीचे नाते..........
जिवापल्याडचे नाते
शुभचिंतक असते 
लढण्याचे बळ देते
उर्मीला प्रेरणा देते |

मैत्रीचे नाते..........
संकटात मशाल होते 
गगनाचा आधार बनते 
प्रसंगावेळी धीर देते 
स्पष्टतेने व्यक्त होते |

मनाचे कवाड उलगडते 

मर्म जाणून मंथन करते  

मोद हर्षाचा झरा होते 

कौतुके खांद्याव मिरवते|



दुःख अडवायला उंभऱ्यासारखा ,
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा……… १

वाट चुकणार नाही जीवनभर कोणी,
एक तू मित्र कर आरशासारखा,
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा……. २

आत्महत्याच करणार नाही कोणी,
मित्र असला जवळ जर मनासारखा,
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा…….. ३

त्रासलो जिंदगी चाळताना पुन्हा,
बस धडा मैत्री वाचण्यासारखा,
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा……. ४

मैत्री चाटते गाय होऊन मना,
जा बिलग तू तिला वासरासारखा,
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा…… ५

कवी अनंत राऊत

काव्य पुष्प-२२६



Comments

  1. मैत्री दिन

    ReplyDelete
  2. सुंदर कविता,दादा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड