काव्य पुष्प-२५० शुभेच्छा पत्रे
शुभेच्छा पत्रे
शुभचिंतन करायला
नाही लागत धन
सजग लागतं
स्नेहाचे निर्मळ मन|
माणुसकीचे संवेदन
सहृदयाचे स्पंदन
भावनेचे नंदनवन
नात्यांचे भावबंधन|
करुनिया शुभेच्छा लेखन
उमटवूया मनातील अक्षरधन
जपूया नात्यांची आठवण
होईल आयुष्याची साठवण|
सण उत्सवाचा आनंदीआनंद
शुभेच्छा पत्रे द्विगुणित करतात
कुपीतल्या अत्तराच्या सुगंधासारखी
सदैव तनमनात दरवळत राहतात|
काव्य पुष्प-२५०
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
Comments
Post a Comment