काव्य पुष्प क्रमांक-२५१ आत्मप्रेरणा




               आत्मप्रेरणा
शब्दांच्या गोडव्याने परीघ ओळखत
मनमोकळा निर्भेळ संवाद साधूया
आत्मप्रेरणेने जिगरीचे झरे शोधत
व्यक्तीमत्त्वाचा विकास साधूया…

तरुणाईत चांगुलपणा शोधण्याची
त्यांच्या स्वप्नांना सत्यात उतरविण्याची
कष्टाच्या पूजेने गगनभरारी घेण्याची
कौतुकाने प्रोत्साहन व प्रेरणा देण्याची…

राग तुलना अहंकाराला द्या मूठमाती
प्रेमळ वर्तनाने बनतील सुखाची नाती
सकारात्मक विचारांची पेरुया भक्ती
सुयशाला प्रयत्नांची इच्छाशक्ती……

मुलांची सातत्यपूर्ण सर्वांगीण  गुणवत्ता
आकड्यांच्या फूटपट्टीने मापू नका 
आवडीच्या क्षेत्रात करीअर करायला 
त्यांच्या पंखात आत्मप्रेरणेचे बळ द्या…

श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प क्रमांक-२५१

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड