दिवाळी फराळ वाटप











एक पणती दानाची,एक पणती माणूसकीची.... संवेदना जाणूया....
वंचितांची दिवाळी गोड करुया....

दसऱ्या नंतर साखर कारखान्यांची धुरांडी पेटतात...अन साखरपट्ट्यात ऊसाची तोड सुरू होते.धुळे नंदुरबार, बुलढाणा,बीड लातूर जिल्ह्यातील ऊस तोडणी कामगार उदरनिर्वाहासाठी कारखाना परिसरात ऊसतोडणीसाठी स्थलांतरित होतात. मुबलक ऊसाची शेती असणाऱ्या गावाजवळ उघड्यावर तात्पुरती कोपटं उभारुन राहतात. दररोज ऊसाच्या फडात जाऊन उसतोडणीचं काम करत राहतात.ना सण ना सुद ....अशा कामगारांची दिवाळी गोड होण्यासाठी शेखर जाधव, अभिजित सणस ,सुनील फरांदे सर,प्रदीप रावळ, रवींद्र लटिंगे आणि दादा कुदळे यांनी दिवाळी फराळाची भेट प्रत्यक्ष ऊसाच्या फडात जाऊन वाटप केली..

दिनांक ४नोव्हेंबर २०२१

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड