पुस्तक परिचय क्रमांक-८९निसर्ग संतुलनात प्राण्यांचा सहभाग




वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य

 परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई

 पुस्तक क्रमांक-८९

 पुस्तकाचे नांव--निसर्ग संतुलनात प्राण्यांचा सहभाग

 लेखकाचे नांव--गो.बा.सरदेसाई

प्रकाशक-विष्णुकृपा प्रकाशन,पुणे

प्रकाशन वर्ष व आवृत्ती-जानेवारी १९९२/प्रथमावृत्ती

एकूण पृष्ठ संख्या-८४

वाङ् मय प्रकार ---ललित

मूल्य--१५₹

📖📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚८९||पुस्तक परिचय

     निसर्ग संतुलनात प्राण्यांचा सहभाग

        लेखक:गो.बा.सरदेसाई

➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿

मानवाला आनंद वाटणारा परोपजीवी निसर्ग पृथ्वीवर  आहे.निसर्गाचे सौंदर्य मनाला भुरळ घालते.अमाप ऊर्जा आणि चैतन्य दिलखुलासपणे निसर्ग भरभरून देत असतो. पण नैसर्गिक आपत्तीमुळे बिघडलेले संतुलन हे क्वचित अपवाद वगळता कमी-जास्त काहीशा कालावधीनंतर पूर्व स्थितीत येत असते. एखादी प्राणिजात पूर्णपणे नष्ट झाली असेलतर तिची जागा साधारणपणे तिच्याचसारखी असणारी दुसरी प्राणिजात घेत असते.पृथ्वीच्या पृष्ठभागावर सजीवसृष्टी आहे,तिच्यात अनेक प्रकारच्या वनस्पती व प्राण्यांचा समावेश होतो. पृथ्वीवरील प्राण्यांमध्ये भूचर,जलचर,उभयचर व आकाशात विहार करणारे प्राणी,कीटकांचा समावेश होतो.काही शाकाहारी मांसाहारी तर काही मिश्राहारीअसतात.'जीवो जीवस्य जीवनं'

एक जीव दुसऱ्याजीवावर जगत असतो.


हरणांसारखे संपूर्ण शाकाहारी प्राणी गवत व झाडांची पाने खाऊन वनस्पतींच्या वाढीवर नियंत्रण ठेवतात.वाघ सिंह आणि बिबळ्या सारखे हिंस्त्रप्राणी शाकाहारी प्राण्यांची शिकार करुन शाकाहारी प्राण्यांची संख्या मर्यादित ठेवतात.त्यामुळे एखाद्या भूप्रदेशातील शाकाहारी प्राण्यांची संख्या वाढून त्या प्रदेशातील वनस्पती नष्ट होण्याचा धोका टळू शकतो.


मानवासारखे काही अपवाद वगळता पृथ्वी वरील बहुतेक सर्व प्राणी या निसर्ग संतुलन राखण्याच्या कामात सहभागी असतात.पण प्रत्येकाचा सहभाग मात्र वेगवेगळ्या स्वरुपात असतो.अशाप्रकारे नैसर्गिक संतुलन राखण्यास सहाय्यभूत होणाऱ्या काही प्राण्यांचे लेख ,लेखक यापूर्वी महात्मा फुले वस्तुसंग्रहालय, पुणे संस्थेच्या'सृष्टीज्ञान'या शास्त्रीय मासिकातवेळोवेळी प्रसिध्द झालेले आहेत.याच लेखांचे 

एकत्रिकरण करून'निसर्ग संतुलनात प्राण्यांचा सहभाग'हे पुस्तक लेखक गो.बा.सरदेसाई यांनी लिहिलेले आहे.


विज्ञानप्रेमी लेखक गो.बा.सरदेसाई यांनी पर्यावरण,जागतिक तापमानवाढ,शोध मंगळाचा, खगोलशास्त्र आणि विज्ञानविषयक पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांची ग्रंथसंपदा वैज्ञानिक दृष्टिकोन,विज्ञान निष्ठारुजविण्यासाठी उपयुक्त आहे.निसर्गाच्या आविष्काराचा अद्भुत खजिना अभ्यासपूर्ण संशोधन करून वाचकांना उपलब्ध करून दिला आहे. वाचताना नवीनतम माहिती मिळत जाते.जागतिक नैसर्गिकजाणीव निर्माण करण्याचे काम करणारे लेखक गो.बा. सरदेसाई आहेत.


'निसर्ग संतुलनात प्राण्यांचा सहभाग'या पुस्तकात  विविधांगी प्राणी व पक्ष्यांचे अंतरंग अतिशय बारकाईने उलगडून दाखवले आहेत. संशोधन करून अभ्यासपूर्ण लेखन सहज सुंदर ओघवत्या शैलीत विवेचन केले आहे.बहुतांश प्राण्यांचे कार्य निसर्ग संतुलनासाठी कसं होतं आहे.याची माहिती विषद केली आहे. 


या पुस्तकात पंधरा लेखातून त्यांनी पर्यावरण संतुलात प्राण्यांचा सहभाग कसा होतो.याची सहज सुंदर ओघवत्या सोप्या भाषेत माहिती दिली आहे. सिंह,चित्ता,आर्मेडिलो, राक्षसी पंडा, समुद्रगाय, डायनोसोर्सचा विनाश,जलस्थल संचारी प्राण्यांचा जीवनकलह,दयाळ,बंड्या धीवर, रोडरनर, उत्तर अमेरिकेतील पाणपक्षी, झुरळ, त्सेत्से माशी, फुलपाखरे आणि कीटकयांची नवलकथा प्रस्तुत केली आहे. 


प्राण्यांचे वर्णन,अधिवास,प्रजनन,शिकार करण्याची पध्दत आदी घटकांतून जीवनाचा सखोलअभ्यास करण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे.तसेच पर्यावरण संतुलनासाठी होणारा उपयोग मांडलेला आहे.


##############################

श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई

लेखन दिनांक-२५नोव्हेंबर २०२१

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड