पुस्तक परिचय क्रमांक-७९क्रांतिपिता लहूजी वस्ताद




वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य

परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई

 पुस्तक क्रमांक-७९

 पुस्तकाचे नांव-क्रांतिपिता लहूजी वस्ताद

 लेखकाचे नांव--शंकर तडाखे

प्रकाशक-प्रतिमा पब्लीकेशन्स,पुणे

प्रकाशन वर्ष व आवृत्ती--चौथी आवृत्ती फेब्रुवारी २०१५

एकूण पृष्ठ संख्या-८०

वाङमय प्रकार--ऐतिहासिक माहिती

मूल्य--१००₹

समता व सामाजिक न्यायासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे यांचे मार्फत मोफत वितरण

📖📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚

७९||पुस्तक परिचय 

क्रांतिपिता लहूजी वस्ताद

       शंकर तडाखे 

""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

ऐतिहासिक काळातील दुर्लक्षित क्षणांच्या जखमा आजही स्मृतीत येतात.भारतमातेला गुलामीच्या बेड्यातून मुक्त करण्यासाठी झुंजणाऱ्या आणि अज्ञातअनामिक राहून शहीद झालेल्या इथल्या क्रांतिवीरांच्या वंशज कुळांच्या हृदयात स्तब्ध होऊन भळभळ वाहत आहे.इतिहासाने त्यांच्यावर घोर अन्याय केला.असे सूर दगड-माती झालेल्या कणाकणात घुमसतात.तेंव्हा इतिहासाला वाटते,आपण या कुळांना काहीच देऊ शकलो नाही.या गोष्टीचं दु:ख देखील त्या सुरांमधून वाहत जाऊन शेवटी कधी ना कधी इतिहासाच्या मूक वेदना सत्य ओकू लागतात.


परकीय ब्रिटिश सत्तेला पिटाळून लावण्यासाठी हजारो देशभक्त, क्रांतिवीर निर्माण करणाऱ्या क्रांतिपिता लहुजींच्या नावात एक जागृत ज्वालामुखी धगधगत आहे.मातृभूमीच्या रक्षणा स्वातंत्र्य संग्रामाचे क्रांतिपिता लहुजींनी पेटवलेला यज्ञकुंडात अनामिक क्रांतिवीरांनी हसत हसत बलिदान दिले.त्या भडकलेल्या आगीच्या झळीनेच ब्रिटीशांना सळोकीपळो करून सोडले. 


"जगेन तर देशासाठी,मरेन तर देशासाठी",अशी प्रतिज्ञा करणाऱ्या क्रांतिपिता लहूजी धनी ब्रह्मचारी राहून स्वातंत्र्याच्या धगधगत्या अग्निकुंडात स्वता: व आपल्या कुळबांधवासह निष्ठा व त्यागाची आहुती दिलेली आहे.तसेच  छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यापासून ते देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या काळा पर्यंत क्रांतिपिता लहूजी वस्तादांच्या पूर्वज- वंशज आणि समाजातील शूरवीरांनी केलेल्या अतुलनीय पराक्रमाची गाथा या ग्रंथात उपलब्ध करून दिली आहे.


'आजपर्यंत जगात घडलेल्या अनेक क्रांत्यांच्या ज्योती क्रांतिपिता लहुजींवर ओवाळून टाकाव्यात.' अशा ऐतिहासिक काळातील  पराक्रमी लढवय्ये मातीशी इमान राखणाऱ्या जहाँबाज शुरवीरांची शौर्यगाथा 'क्रांतिपिता लहूजी वस्ताद'ग्रंथात अधोरेखित केली आहे. लेखक शंकर तडाखे यांनी अतिशय मेहनतीने संशोधन करून या ग्रंथाचे लेखन केले आहे. अज्ञात आणि अनामिक माहितीची नव्याने ओळख करून दिली आहे.अनेक गौरवशाली शूरवीरांच्या शौर्याचा इतिहास  या पुस्तकाने प्रकाशित झाला आहे.


स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधण्यापासून ते राजधानी रायगडचे किल्लेदार म्हणून कुळातल्या पराक्रमी,शूरवीरांना त्यांची कीर्ती, स्वामिनिष्ठा,त्याग आणि पराक्रम पाहूनशिवाजी महाराजांनी या कुळातल्या अनेक वीरांना इनाम देऊन राऊत व नाईक अशा पदव्या बहाल केल्या आहेत.युध्दकलेत निपुणता व शस्त्र वापरण्याचे तंत्रज्ञान परंपरेनुसार हा वारसा क्रांतिपिता लहूजी वस्तादांच्या कुळांनी पिढ्यानपिढ्या जपलेला आहे.ही माहिती लेखकांनी मांडलेली आहे.


या शौर्यगाथेच्या ग्रंथास सन्माननीय उत्तम तुपे यांची प्रस्तावना लाभली आहे.ऐतिहासिक आणि पौराणिक साहित्यकृतींचे लेखन करणारे साहित्यिक अगणित आहेत.ते शिवसाहित्यिक इतिहास तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. 


इतिहासात मातंग समाजातील वीरपुरुषांनी लढाईत सहभागी होऊन मर्दुमकी गाजविली.त्यांच्या शौर्यावर प्रकाश टाकण्याचे कार्य समाजसेवक शंकर तडाखे यांनी केले आहे.

कोणत्याही प्रकारची कल्पकता व चतुराई न करता, ऐतिहासिक कागदपत्रे व संदर्भ ग्रंथ साहित्याची पडताळणी करुन जसं आहे तसं निरपेक्षपणे मांडलेले आहे. तसेच क्रांतिपिता लहूजी वस्ताद यांची माहिती असणारे ग्रंथ दस्ताऐवज यांची जंत्री दिलेली आहे.लेखक शंकरभाऊ तडाखे यांचा हा छोटेखानी परंतु आवाका उदंड असणारा हा ग्रंथ आहे.लहूजी वस्ताद यांचा चमकणारा दांडपट्ट्याचा आवाज खणखणणार आहे.सहज सुंदर शब्दात त्यांनी लेखन केले आहे.


या शौर्य गाथेत निर्माते महाराष्ट्र धर्माचे,पुणे प्रांताच्या जहागिऱ्या,स्वराज्याचे बलिदानकर्ते, रायगडचे सर्जेराव, क्रांतिपिता लहूजिंचा जन्म, मराठे आणि इंग्रज यांच्यातील खडकी पुणे येथील अखेरचे युद्ध, क्रांतीवीर उमाजी नाईक,

आणि महात्मा जोतीराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले,इतिहासातील महत्त्वाचे पुरावे व दस्तावेज,क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, क्रांतिवीर फकिरा,मातंग समाजाचे क्रांतिपर्व, प्रेरणास्थळ, संदर्भ ग्रंथ व साहित्य आदी लेख 'क्रांतिपिता लहूजी वस्ताद'या ग्रंथांत आहेत.

अनामिक क्रांतिवीरांची गाथा या उलगडून दाखविली आहे.इतिहासप्रेमींना प्रेरणादायी ग्रंथ आहे.

""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

परिचयक-श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई


लेखन दिनांक-२८आॅक्टोंबर२०२१

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड