पुस्तक परिचय पाऊले चालती
पुस्तक - पाऊले चालती...
लेखक - रविंद्रकुमार लटिंगे (दादा)
पृष्ठ संख्या- १३२
स्वागत मूल्य- १२५/-
पाऊले चालती पुस्तक प्रवास वर्णनाचा आदर्श नमुना आहे . ओघवती भाषा शैली , भ्रमंतीत आलेले अनुभव , टिपलेले सूक्ष्म बारकावे आणि मुख्य म्हणजे शब्द भांडाराची मुक्त हस्ते केलेली जागोजागी उधळण साधी सोपी तरल भाषा शैली,लेखकाच्या लेखन शैलीवरून लेखक आत्मिक खूप निर्मळ आणि मोठ्या मनाचा माणूस आहे याची जाणीव होते .आपल्याबरोबरच इतरांना मोठ करण्याची तळमळ आणि निःस्पृह भावनेने मदतीसाठी सरसावलेले व्यक्तिमत्त्व त्यांच्या *परिसर भेट कमळगड माडगणी* या प्रवास वर्णनात अनुभवता येते.
*मुळातच लोकसंग्रहाचा ध्यास असलेल्या लेखकाने सेवाकालात अनेक मित्र जोडले आहेत . भ्रमंतीचा छंद वेडा शिक्षक आपल्या शब्द प्रभूत्वाणे प्रवास वर्णनात वाचकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. लेखकाने वाई परिसरातील तसेच महाबळेश्वर सह सातारा जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील अनेक स्थळांना भेटी दिल्या आहेत . प्रत्येक ठिकाणचा सूक्ष्म तपशील वाचकांना ते स्थळ प्रत्यक्ष पाहण्यास मोहवित करते याची साक्ष त्यांच्या कशाळी बीच प्रवास वर्णनात जाणवेल.*
महाराष्ट्राबाहेरील सापुतारा पर्यटन स्थळा विषयी माहिती देताना गुजरात राज्याने सापुतारा पर्यटन स्थळ कसे आधुनिकता आणि निसर्गाची जोड देवून निर्मिले आहे तसेच तेथील पुष्कर रोप वे एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर जाण्यासाठी केलेला रोपवे पर्यटकांना रोमहर्षक अनुभव देणारा आहे याची सुंदर शब्दात मांडणी केली आहे.
*छांदिष्ट समूहाच्या खरसुंडी, पोसेवाडी , भूषण गड प्रवास वर्णनातील अनुभव लेखकाने खूप छान पध्दतीने मांडले आहेत रमेश जाविर सर यांच्या काष्ठ शिल्प संग्रहालय चे वर्णन वाचकांमध्ये या स्थळांना भेट देण्याची प्रेरणा देतात. यातच लेखकाचे यश लेखनातील यश दिसून येते.*
पोसेवाडीचे लक्ष्मी नारायण संग्रहालय जे भगवान जाधव या अवलियाने निर्मिले आहे तेथील वर्णन वाचून प्रत्येकाच्या मनात या स्थळाला भेट देण्याचा मोह झाल्याशिवाय राहणार नाही.
*प्रवास वर्णन लिहीत असताना लेखकाने प्रवास दरम्यान भेटलेल्या व्यक्ती , मित्र आणि सोबती यांच्या मानवी स्वभावांचे मनोरंजक वर्णन जागोजागी वाचायला मिळते.*
एकंदरीत पाऊले चालती हे पुस्तक प्रवास वर्णनाचा सर्वांग सुंदर आदर्श नमुना असे आहे प्रत्येकाने वाचावे व संग्रही ठेवावे असे हे पुस्तक मला भावले . भविष्यात या स्थळांना भेटी देताना या पुस्तकातील मजकूरा चा नक्की उपयोग होईल.
सिद्धहस्त लेखक सुनील शेडगे (आप्पा) यांची या पुस्तकाला प्रस्तावना लाभली आहे.
धन्यवाद 🙏
संतोष ढेबे ✍️
महाबळेश्र्वर
ढवळे सर खूपच सुंदर पुस्तक परीक्षण
ReplyDeleteसंतोष ढेबे सर मोजक्या शब्दात अप्रतिम असे पुस्तक परीक्षण
ReplyDeleteधन्यवाद सर
ReplyDelete