काव्य पुष्प-२२७ साने गुरुजी
जो करेल मनोरंजन मुलांचे
जडेल नाते प्रभूशी तयांचे
समाजशिक्षक, आदरणीय साने गुरुजी यांच्या स्मृतिदिनामित्त विनम्र अभिवादन.....
जीवनाचा अंतर्यामी अर्थ
संस्काराचे करुनी सिंचन
आचमनावे शब्दांचे तीर्थ
वाचावे कृतींचे शब्दधन ||
माया ममतेचा प्रेरणास्त्रोत
कथांची बाग फुलविणारे लेखक
मातृत्वाचा अमृत कलश
महामंगल स्तोत्राचे जनक||
निर्मळ पवित्र अजरामर साहित्य
संस्कारक्षम संस्कृतीचे दर्शन सत्य
संस्कारक्षम धडे अन् अमृतमय वाणी
मुलांची हृदये जिंकली गुरुजींनी||
भावनेचा आंतरिक ओलावा
काव्य गोष्टीतून उमजे
खरा तो एकची धर्म
निर्मळ प्रार्थनेतून समजे ||
श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
विनम्र अभिवादन. सुंदर काव्यरचना💐💐
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteधन्यवाद मित्रहो
ReplyDelete