काव्यपुष्प-२२८ फादर्स डे
जागतिक पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
बाप हा बापच असतो
घराच्यांच्या छायेची सावली
हाकेला धावते विठू माऊली
सतत असते घराची काळजी
उत्कर्षाचा ध्यास पावलोपावली ||
कर्तृत्वाचा आलेख बापमाणूस कुटूंबातील दातृत्वाचा कर्तामाणूस परमेश्वर दाखविणारा देवमाणूस नाती गोती जपणारा जनमाणूस||
बाप असतो आगर आधाराचे
समस्या त्याचे मन जाणते
मुलांच्या आनंदाच्या खुशीचे
स्मितहास्य चेहऱ्यावर फुलते ||
असते नजरेत धाक पण हृदयात ममता
कोडकौतुक लाड पण चुकीला धपाटा
जिंकण्याची उमेद अन् जिद्दीचा ध्यास
यशाला शाबासकी पण चुकीला रट्टा||
नतमस्तकतेचे क्षमाशील व्यासपीठ
कृतीयुक्त विचारांचे संस्कार पीठ
प्रापंचिक जीवनाची घडी बसवतो नीट
अनुभवांच्या शिदोरीची गोडी अवीट ||
रवींद्र लटिंगे ओझर्डे वाई
चटकन ओळखता नाही येत
फार वेगळं असतं बापाचं मन
स्वत: बाप असल्याशिवाय
उमजत नाही बापाचं मन ||
अभिजित भिडे
अप्रतिम काव्य
ReplyDeleteअप्रतिम रचना
ReplyDeleteधन्यवाद मित्रहो
ReplyDeleteमनपुर्वक आभार
ReplyDelete