काव्य पुष्प-२२९ राजर्षी छत्रपती शाहू महाराज






सामाजिक न्याय दिन, राजर्षी छत्रपती प्रजावत्सल राजे शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!!


शाहू महाराज लोकराजे

रयतेचे जाणते राजे 

जनकल्याणाचा ध्यास 

सामाजिक न्यायाची आस||


अग्रदूत सामाजिक आरक्षणाचे

कैवारी गोरगरीब दिनदलितांचे 

महाप्रचंड वादळ नवविचारांचे

प्रेरणास्रोत सुधारक महाराष्ट्राचे  ||


सामाजिक क्रांतीचे प्रणेते 

संवेदनशील मनाचे जाणते 

संस्कृती कला व खेळांचे चाहते

माणुसकीच्या दूरदृष्टीचे भोक्ते||


देवूनी राजाश्रय कला अन् खेळांना 

समता व बंधुतेची शिकवण समाजाला

सामाजिक समानता दिली दिनदलितांना

स्वाभिमानाचे विचार दिले बहुजन समाजाला||



Comments

  1. मनपूर्वक आभार

    ReplyDelete
  2. समर्पक ,प्रेरणादायी रचना

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड