Posts

Showing posts from 2026

पुस्तक परिचय क्रमांक:२६९ नक्षत्रचित्रे

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२६९ पुस्तकाचे नांव-नक्षत्रचित्रे लेखक: शांता ज. शेळके  प्रकाशन-सुरेश एजन्सी, पुणे  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-सप्टेंबर-२०२५  चौथी पृष्ठे संख्या–८८ वाड़्मय प्रकार-ललित किंमत /स्वागत मूल्य-१५०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २६९||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव -नक्षत्रचित्रे लेखक: शांता ज.शेळके 📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚  स्नेहसंबंधाच्या अवकाशात चमकणाऱ्या महत्त्वाच्या नक्षत्रांसारख्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांवर लिहिलेल्या लेखांचा संग्रह म्हणजे नक्षत्रचित्रे! हे लेखिका शांता शेळके यांनी दिलेले समर्पक आणि यथार्थ नाव. ऐंशी वर्षांच्या आयुष्यातील साठ वर्षे त्यांनी चौफेर साहित्य लेखन केले.मग ते गीतलेखन,कथा कादंबरी लेखन, काव्य, चित्रपटातील गाणी लेखन अथवा ललित लेखन.निर्मळ प्रतिभेच्या जोरावर त्यांनी सृजनशील साहित्य शब्दबध्द केले आहे. ‘नक्षत्रचित्रे’या पुस्तकात ज्यांच्या विषयी लिहिलं आहे ती माणसं सामान्य नव्हेत.तर त्यांचं कलावंत म्हणून किंवा लेखक म्हणून असणारे मोठेपण शांताबाईंन...

पुस्तक परिचय क्रमांक:२६८ साताऱ्याच्या मुलखात

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२६८ पुस्तकाचे नांव-साताऱ्याच्या मुलखात  लेखक: आदित्य फडके  प्रकाशन-स्नेहल प्रकाशन, पुणे  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-एप्रिल-२०१६  द्वितीय  पृष्ठे संख्या–१७४ वाड़्मय प्रकार-प्रवासवर्णन किंमत /स्वागत मूल्य-२२५₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २६८||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव -साताऱ्याच्या मुलखात  लेखक: आदित्य फडके  📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚  सातारा जिल्हा म्हणजे सह्याद्री पर्वत रांगेतील डोंगररांगेतील नैसर्गिक आणि ऐतिहासिक वरदान लाभलेले नंदनवन.गडदुर्ग,मंदिरे,अभयारण्ये, तलाव आणि अनवटवाटेने भटकंती करायला अनेक पर्यटकस्थळे तर आहेतच शिवाय भारतातील प्रेक्षणिय थंड हवेचे ठिकाण पांचगणी,महाबळेश्वर आणि तापोळा ही नैसर्गिक देणगी लाभलेली स्थळे साताऱ्यातील आहेत. सातारा जिल्ह्यातील विविध स्थळांना भेटी देण्यासाठी मार्गदर्शक वाटाड्या म्हणून उपयोगी पडणारे हे पुस्तक, ‘साताऱ्याच्या मुलखात’साताऱ्याचे निसर्ग भटकंतीकार आदित्य फडके यांनी लेखणीबध्द केले आहे. प्रत्येकाच्या भटक...

पुस्तक परिचय क्रमांक:२६७ हसगत

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२६७ पुस्तकाचे नांव-हसगत लेखक: दिलीप प्रभावळकर  प्रकाशन-राजहंस प्रकाशन, पुणे  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-एप्रिल-२०२५  नववी पृष्ठे संख्या–१८५ वाड़्मय प्रकार-ललित किंमत /स्वागत मूल्य-२८०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २६७||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव -हसगत लेखक: दिलीप प्रभावळकर  📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 खुमासदार शैलीतले ‘हसगत’पुस्तकातले लेख खूपच वाचनीय आहेत.तसं हे पुस्तक ‘गमतीदार’आहे,ते अशा अर्थाने की, गालातल्या गालात हसण्यापासून ते थेट खळखळून धबधबा फुटल्यासारखं हसण्यापर्यंत हसण्याचे विविध प्रकार या यातून अनुभवता येतील.असं लोकप्रिय नाटककार जयवंत दळवी यांचा ब्लर्ब आपणाला हास्यलेखकाची ओळख करून देतो. ‘हसगत’पुस्तकाला सार्वजनिक वाचनालय नागपूर यांच्या ‘वि.मा.दी. पटवर्धन’ पुरस्काराने  गौरवण्यात आले आहे. दिलीप प्रभावळकर हे नाव आपण ऐकलं किंवा पाहिलं की आपणासमोर एक दिलखुलास व्यक्तिमत्त्वाचा आपला माणूस दिसतो. आपल्या संवेदनशील,विनोदी व  गंभीर अभिनयाचा ठसा उमटवलेल्या द...

पुस्तक परिचय क्रमांक:२६६ स्वीकाराची जादू

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२६६ पुस्तकाचे नांव-स्वीकाराची जादू लेखक:सर्वश्री  प्रकाशन-वॉव पब्लिशिंग, पुणे  प्रकाशन वर्ष व आवृत्ती- एप्रिल २०२५पुनर्मुद्रण  पृष्ठे संख्या–९८ वाड़्मय प्रकार-वैचारीक ग्रंथ  किंमत /स्वागत मूल्य-१४०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २६६||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव -स्वीकाराची जादू लेखक:सरश्री  📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 ‘विचार नियमन’ आणि ‘शोध स्वतःचा’चे रचनाकार सरश्री यांनी हिंदी भाषेतील या आवृत्तीचा अनुवाद मराठीत केला आहे. आपणाला झटकन पटकन आनंद मिळवायला कोणती गुरुकिल्ली वापरायची याचे प्रात्यक्षिकसह विवेचन करणारा हा वैचारिक ग्रंथ ‘स्वीकाराची जादू’.   धावपळीच्या जीवनात सध्या हरेक माणूस कुटूंबाच्या सुख  समाधानासाठी अहोरात्र काम करत असतो.ते काम करताना खऱ्या आनंदाच्या शोधात भटकत असतो.पण खरा आनंद न गवसल्याने धनदौलत, मानसन्मान, पदप्रतिष्ठा,नावलौकिक आणि करमणूक अशा भौतिक सुखाच्या गोष्टीत आनंद शोधत राहतो.पण त्याला खरंच आनंद सापडतो का? म्हणून सरश्री म्हणतात क...

पुस्तक परिचय क्रमांक:२६५

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२६५ पुस्तकाचे नांव-कोवळे दिवस  लेखक: व्यंकटेश माडगूळकर  प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे  प्रकाशन वर्ष व आवृत्ती- डिसेंबर २०१७ पुनर्मुद्रण  पृष्ठे संख्या–१३६ वाड़्मय प्रकार-कादंबरी  किंमत /स्वागत मूल्य-१५०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २६५||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव-कोवळे दिवस  लेखक: व्यंकटेश माडगूळकर  📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚       चार भिंतीबाहेरची प्रत्येक प्रभात ही नवा उत्साह,जोम आणि नवचैतन्य घेऊन उगवत असली पाहिजे.याच समयी पाखरांना गाणे स्फुरते,कळीचे उमलून टपोरे फुल होते आणि वृक्षांना नवे धुमारे फुटतात….. आजवर मानवजातीच्या कल्याणाचे जेजे विचार विचारवंतांना आणि प्रतिभावंतांना सुचले, उच्चारले, गाईले आणि लिहिले गेले,तेही अशाच एका मनस्वी कलाकाराचे ऐन तारुण्यातील ‘कोवळे दिवस’या कादंबरीत लोकप्रिय कथालेखक व्यंकटेश माडगूळकर तथा आदरणीय तात्यासाहेब यांच्या सिद्धहस्त लेखणीतून हे आत्मकथन रसिक वाचकांना आनंदानुभवासाठी बहाल केले आहेत. ...

विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

Image
*राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त माझेरी शाळेत विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न* ता. फलटण – जिल्हा परिषद मॉडेल स्कूल माझेरी पुनर्वसन येथे विज्ञान दिनानिमित्त भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने विविध वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित 50 मॉडेल्स सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक रवींद्र लटींगे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शिक्षक श्री संतोष जगताप गणेश पोमणे व सौ सरस्वती भोईटे,श्री भारती शेळके -बरकडे,प्रिया निंबाळकर मॅडम, यांनी विद्यार्थ्यांची प्रदर्शनासाठी विशेष तयारी करून घेतली.तर  स्वप्नाली जाधव,दिपाली पवार, अर्चना सणस यांनी विशेष परिश्रम घेतले.  शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू दिघे, उपाध्यक्ष उमेश झांजुर्णे,माजी सरपंच श्री ज्ञानेश्वर दिघे,माजी उपसरपंच श्री प्रवीण दिघे, ग्रामपंचायत सदस्य श्री दत्ता पवार,श्री संपत चव्हाण, श्री राहुल सूर्यवंशी यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.पालक आणि विद्यार्थ्यांची बहुसंख्येने उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांनी सौरऊर्जा, जलचक्र, नैसर्गिक पा...

पुस्तक परिचय क्रमांक:२६४ बापमाणूस

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२६४ पुस्तकाचे नांव-जग बदलणारा बापमाणूस  लेखक: जगदीश ओहोळ प्रकाशन-जगदीशब्द प्रकाशन,पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती- ५५वी आवृत्ती  पृष्ठे संख्या–२४४ वाड़्मय प्रकार-वैचारीक ग्रंथ  किंमत /स्वागत मूल्य-३५०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २६४||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव-जग बदलणारा बापमाणूस  लेखक:जगदीश ओहोळ  📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 ज्ञानाचे प्रतीक महामानव, भारतरत्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन! भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,विश्ववंद्य,भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक व्यक्तिमत्त्वाचा प्रेरणादायी विचारधारा मांडलेलं, तसेच कोलंबिया विद्यापीठात प्रकाशित झालेलं अन् नेल्सन मंडेला पुरस्काराने सन्मानित झालेले भारतरत्न,विश्वरत्न डॉक्टर आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांचा भीमराव ते मोटिव्हेशनल बाबासाहेब सध्याच्या पिढीसमोर ‘जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकातून सुप्रसिध्द व्याख्याते तथा लेखक जगदीश ओहोळ यांच्या लेखणीतून साकारलेले अक्षरसाहित्य;ज्या पुस...

पुस्तक परिचय क्रमांक:२६३ थैलीभर गोष्टी

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२६३ पुस्तकाचे नांव-थैलीभर गोष्टी  लेखक: सुधा मूर्ती  अनुवाद: लीना सोहोनी  प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती- पुनर्मुद्रण जून,२०१७ पृष्ठे संख्या–१८२ वाड़्मय प्रकार-कथासंग्रह किंमत /स्वागत मूल्य-१७०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २६३||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव-थैलीभर गोष्टी  लेखक: सुधा मूर्ती  अनुवाद: लीना सोहोनी  📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚   “लहान मुलांचं मन हे ओल्या मातीच्या भिंतीसारखं असतं.या लहान वयात त्यांना काहीही शिकवणं म्हणजे धारदार काचेच्या तुकड्याने त्या भिंतीवर नक्षीकाम करण्यासारखं असतं.मुलं मोठी झाली तरी,या वयात त्यांच्या मनावर जे काही बिंबवण्यात आलेलं असतं.ते तसंच कायम राहतं.त्यामुळे मुलांवर योग्य वयात योग्य त्या नितीमूल्यांचे संस्कार करणं फार महत्त्वाचं असतं.ह्या संस्काराची शिदोरी त्यांना आयुष्यभर उपयोगी पडते.”        —सुधा मूर्ती   बाळगोपाळांचे विश्व समृद्ध करणारे ‘थैलीभर गोष्टी’...

पुस्तक परिचय क्रमांक:२६२ पाणपोई

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२६२ पुस्तकाचे नांव-पाणपोई लेखक: व. पु. काळे प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती- सुधारित आवृत्ती ऑक्टोबर,२०१७ पृष्ठे संख्या–१२४ वाड़्मय प्रकार-कथासंग्रह किंमत /स्वागत मूल्य-१३०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २६२||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव-पाणपोई लेखक: व.पु. काळे 📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚  वैयक्तिक अनुभवांना सामाजिक आशयाचे कोंदण निर्माण करुन साठवून ठेवलेलं अक्षरधन ‘पाणपोई’तून मुक्तहस्ते अनेक कथासंग्रहातून वाचक रसिकांना बहाल करणारे, वाटणारे लोकप्रिय लेखक तथा कथाकथनकार व.पु.काळे यांची संचित शब्दांची ‘पाणपोई’.वाचनातून इतरांना आनंद वाटते.अनेक व्यक्तिंच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू अधोरेखित करते.एक दमदार कथालेखक ज्याला सत्याची किनार आणि विचारांचे पैलू आहेत.त्यांच्या कथा म्हणजे हास्यमस्करी करत मनातलं शल्य व्यक्त करते.तेच वाचकांच्या काळजात घुसते आणि मनाला चटका लावून जाते.अन् असंच जीवन असतं हे नकळतपणे समजते.व्यक्तींच्या आचार विचारांच्या पध्दतीला व.पु.काळे ‘पॅटर्न’ ...

पुस्तक परिचय क्रमांक:२६१ खुर्द आणि बुद्रुक

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२६१ पुस्तकाचे नांव-खुर्द आणि बुद्रुक  लेखक: रवींद्र जोशी  प्रकाशन-अनुबंध प्रकाशन,पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती- प्रथमावृत्ती ४डिसेंबर,२०११ पृष्ठे संख्या–२१२ वाड़्मय प्रकार-कथासंग्रह किंमत /स्वागत मूल्य-२००₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २६१||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव-खुर्द आणि बुद्रुक  लेखक: रवींद्र जोशी  📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 ‘खुर्द आणि बुद्रुक’असं या पुस्तकाचे नाव वाचून आपणाला एखादं गाव वैशिष्ट्यपूर्ण कसं असतं? तसेच ग्रामीण भागातील जुळ्या गावांची माहिती देणारं पुस्तक असेल असं मुखपृष्ठावरुन वाटतं.पण मित्रहो,तसं नाही.शब्दश:अर्थ खुर्द म्हणजे गावकुसाबाहेरील वस्ती तर बुद्रुक म्हणजे मुख्य गावठाण.या पुस्तकाचे  ‘खुर्द आणि बुद्रुक’शीर्षक ख्यातनाम चित्रपट निर्माते व लेखक रवींद्र जोशी यांनी त्यांच्या सहवासातील माणसांची शब्दचित्रे रेखाटली आहेत.त्यांचे अनेक कथासंग्रह प्रकाशित असून दैनिके, दिवाळी अंक आणि नियतकालिकात संगीत विषयक लेख प्रसिद्ध झाले आहेत.   आजवर...

पुस्तक परिचय क्रमांक:२६० स्वर्गाच्या वाटेवर काहीतरी घडलं...

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२६० पुस्तकाचे नांव-स्वर्गाच्या वाटेवर काहीतरी घडलं… संपादन: सुधा मूर्ती  अनुवाद: लीना सोहोनी प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती- पुनर्मुद्रण जानेवारी ,२०१८ पृष्ठे संख्या–१०८ वाड़्मय प्रकार-कथासंग्रह किंमत /स्वागत मूल्य-१५०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २६०||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव-स्वर्गाच्या वाटेवर काहीतरी घडलं… संपादन: सुधा मूर्ती  अनुवाद: लीना सोहोनी  📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚   आपल्या आयुष्यात अघटित घटना घडतात.त्यांमुळे आपलं आयुष्य संपतेय की काय?असा प्रश्न मनात येतो.त्याच वेळी कायम स्मरणात राहील असा संस्मरणीय अनुभव मिळतो.अन् आपल्या मुखातून शब्द नकळत उच्चारले जातात… नशीब बलवत्तर म्हणून वाचलो.काळ आला होता पण वेळ आली नव्हती…असं काही.अश्याच वास्तवात घडलेल्या गोष्टी, कहाणी आणि कथा आपल्याला वाचायला मिळाव्यात म्हणून लेखिका लीना सोहोनी यांनी अनुवादित केलेल्या ‘स्वर्गाच्या वाटेवर काहीतरी घडलं..’या कथासंग्रहातून घेऊन आलेल्या आहेत.   ...

प्रजासत्ताक दिन साजरा

Image
७७वा प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा-माझेरी पुनर्वसन ता फलटण येथे उत्साही वातावरणात साजरा झाला... ध्वजारोहण सहाध्यायी श्री अरुण धोंडिबा जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी नवभारत साक्षरतेची शपथ घेण्यात आली.नंतर संगीताच्या तालावर सांघिक कवायत सादर करण्यात आली.प्रमुख अतिथी उपनिरीक्षक श्री विशाल राऊत ,माजी सरपंच श्री ज्ञानेश्वर दिघे,माजी उपसरपंच श्री प्रवीण दिघे, माजी सरपंच सौ मनिषा दिघे, श्री दत्ता पवार,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री विष्णू दिघे, उपाध्यक्ष श्री उमेश झांजुर्णे, श्री राघू दिघे व ग्रामस्थ यांच्या हस्ते स्काऊट गाईड तालुकास्तरीय मेळाव्यात उठावदार कामगिरी केल्याबद्दल कब व बुलबुल पथकातील मुलांचा व मार्गदर्शक शिक्षिका सौ सरस्वती भोईटे मॅडम यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.तसेच लोकसहभागातून वाचनालय समृध्दी साठी वस्तू व आर्थिक स्वरूपात मदत केलेल्या पालकांचा व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. प्रमुख अतिथी श्री विशाल राऊत यांनी मी पोलिस निरीक्षक कसा झालो?ही यशोगाथा समर्पक शब्दात मुलांना सांगितली.माजी सरपंच श्री ज्ञानेश्वर दिघे यांनी मुलांना आपल्य...

हळदी कुंकू समारंभ

Image
हळदीकुंकू समारंभ व महिला मेळावा उत्साहात साजरा  🍁जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माझेरी (पुनर्वसन) येथे महिला सक्षमीकरण व सांस्कृतिक परंपरेचे जतन व्हावे या उद्देशाने हळदी–कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथींच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती, स्वराज्य जननी जिजाबाई आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.  त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री. रवींद्रकुमार लटिंगे यांनी प्रमुख अतिथी व उपस्थित महिलांचे मनःपूर्वक स्वागत करून कार्यक्रमाचे महत्त्व सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ सरस्वती भोईटे मॅडम यांनी केले.  समारंभात उपस्थित महिलांनी पारंपरिक पद्धतीने उखाणे घेतले. त्यानंतर सर्व महिलांना हळदी–कुंकू व वाण देण्यात आले. कार्यक्रम अधिक रंगतदार होण्यासाठी महिलांसाठी मनोरंजक संगीत खुर्ची स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.स्पर्धेतील विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम आनंद, उत्साह व आपुलकीच्या वातावरणात पार पडला.या उपक्रमामुळे म...

पुस्तक परिचय क्रमांक:२५९ पुढचं पाऊल

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२५९ पुस्तकाचे नांव-पुढचं पाऊल लेखक: व्यंकटेश माडगूळकर  प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती- पुनर्मुद्रण सप्टेंबर ,२०१३ पृष्ठे संख्या–१०८ वाड़्मय प्रकार-कादंबरी किंमत /स्वागत मूल्य-१२०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २५९||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव-पुढचं पाऊल  लेखक: व्यंकटेश माडगूळकर  📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 स्वातंत्र्यपुर्व काळातील गावकुसाबाहेरील माणसांच्या जगण्याची चित्तरकथा कथालेखनाचे भिष्माचार्य जेष्ठ साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर तथा आदरणीय तात्यासाहेब यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेले अप्रतिम अक्षरसाहित्य ‘पुढचं पाऊल’.दलित समाजातील लोकांचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी गावाबाहेर पडून शहरांकडे धाव घेणारी माणसं होती. तिथं आपल्या अंगभूत कलागुणांचे सादरीकरण किंवा अंगमेहनतीची कामे करून रोजीरोटी मिळवणं हे पहिलं उद्दिष्ट.याच आशयबीजावर आधारित ही कादंबरी आहे.       काळाची पाऊलं ओळखून मागे पाय रुतवून ठेवण्यापेक्षा स्वाभिमानाने आणि ...

पुस्तक परिचय क्रमांक:२५८ पाऊलवाटा

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२५८ पुस्तकाचे नांव-पाऊलवाटा  लेखक: शंकर पाटील  प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती- पुनर्मुद्रण डिसेंबर,२०१७ पृष्ठे संख्या–११४ वाड़्मय प्रकार-कथासंग्रह किंमत /स्वागत मूल्य-११०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २५८||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव-पाऊलवाटा  लेखक: शंकर पाटील  📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚  महाराष्ट्रातील रसिक श्रोत्यांना पोटधरून हसायला लावणारे,ग्रामीण जीवनाचा वेध व्यक्तिचित्रांतून शब्दबध्द करणारे लोकप्रिय पटकथाकार, जेष्ठ कथालेखक, सुप्रसिद्ध विनोदी कथाकथनकार शंकर पाटील हे नाव मराठी वाचकाच्या मनात एक अढळ स्थान मिळवून आहे.त्यांच्या ग्रामीण कथा म्हणजे मराठी साहित्याला मिळालेले लेणे आहे.ग्रामीण जीवनाच्या संघर्षाचे पारदर्शी चित्रण व खुमासदार संवाद आपल्याला त्यांच्या अनेक कथांतून अनूभवायला मिळतात.ऐकायला व वाचायला मिळतात. नैसर्गिकपणे आसलेला कोल्हापुरी भाषेचा बाज हा त्यांच्या कथेला ताजेपणा आणि जिवंतपणा आणतो. निसर्गातले विविध बदल, सामाजिक प...

पुस्तक परिचय क्रमांक:२५७ पुसट रेषा

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता- श्री. रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक- २५७ पुस्तकाचे नाव- पुसट रेषा  लेखक: सुनील शेडगे  प्रकाशन- साहित्यवेल प्रकाशन, सातारा  प्रकाशन वर्ष व आवृत्ती- प्रथम आवृत्ती ३ जानेवारी २०२६ पृष्ठे संख्या–१२० वाड़्मय प्रकार- ललितसंग्रह किंमत /स्वागत मूल्य-२५०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २५७|| पुस्तक परिचय  पुस्तकाचे नाव- पुसट रेषा  लेखक: सुनील शेडगे  📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 ‘रम्य ते बालपण’या उक्तीप्रमाणे माणूस वयपरत्वे कितीही मोठा झाला, तरी आपल्या बालपणीच्या आठवणी घटना अंगठीतल्या हिऱ्यासारख्या आपल्या काळजाच्या कप्प्यात जपून ठेवतो. जणू  काही त्याची या आठवणी म्हणजे त्याची बालपणाची मर्मबंधातली ठेव असते.     आपल्या आठवणींचा, भेटलेल्या साहित्यिकांचा, भटकंती करताना भेटलेल्या माणसांचा, नयनरम्य सोहळा सृष्टीवर साजरा करणाऱ्या पावसाचा  आणि अनवटवाटेने सह्याद्रीच्या पायथा ते माथा डोंगरदऱ्यातील गडकिल्ले तंगडतोड करताना आलेल्या अनुभुतीचा आनंद उपभोगत वाचक रसिकांना आनंदानुभव बहाल करण्याची किमया ल...

बालिका दिन माझेरी पुनर्वसन

Image
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन विविध उपक्रमांनी साजरा..... प्रारंभी प्रमुख अतिथी,सर्व शिक्षकवृंद, पालक आणि पालकांनी प्रतिमेस विनम्र अभिवादन केले . आम्ही सावित्रीच्या लेकी, पुढे चालवू हा वारसा....  आदर्श शाळा-माझेरी पुनर्वसन शाळेच्या उपक्रमशील अध्यापिका श्रीमती भारती गणपत शेळके -बरकडे मॅडम यांनी वडिलांच्या स्मृतीदिनानिमित्त वर्गनिहाय आयोजित केलेल्या मनोरंजक खेळातील अनुक्रमे तीन विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे बक्षीस देऊन अभिनंदन केले.तसेच यावेळी शाळेतील मुलांची भाषणे व मुलींनी ओव्या गायन केले.तदनंतर  शाळेतील सर्व शिक्षिका सौ.सरस्वती भोईटे,श्रीमती भारती शेळके बरकडे,सौ प्रिया निंबाळकर, स्वयंसेविका सौ.स्वप्ना जाधव ,शापोआ स्वयंसेविका सौ अर्चना सणस यांचा सन्मान महिला पालकांच्या हस्ते करण्यात आला.  माजी सरपंच श्री ज्ञानेश्वर दिघे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार्य या विषयी विचार व्यक्त केले. प्रास्ताविक श्री गणेश पोमणे सरांनी केले.सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री रवींद्रकुमार लटिंगे,आभार श्री संतोष जगताप यांनी मानले.का...