






७७वा प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा-माझेरी पुनर्वसन ता फलटण येथे उत्साही वातावरणात साजरा झाला... ध्वजारोहण सहाध्यायी श्री अरुण धोंडिबा जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी नवभारत साक्षरतेची शपथ घेण्यात आली.नंतर संगीताच्या तालावर सांघिक कवायत सादर करण्यात आली.प्रमुख अतिथी उपनिरीक्षक श्री विशाल राऊत ,माजी सरपंच श्री ज्ञानेश्वर दिघे,माजी उपसरपंच श्री प्रवीण दिघे, माजी सरपंच सौ मनिषा दिघे, श्री दत्ता पवार,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री विष्णू दिघे, उपाध्यक्ष श्री उमेश झांजुर्णे, श्री राघू दिघे व ग्रामस्थ यांच्या हस्ते स्काऊट गाईड तालुकास्तरीय मेळाव्यात उठावदार कामगिरी केल्याबद्दल कब व बुलबुल पथकातील मुलांचा व मार्गदर्शक शिक्षिका सौ सरस्वती भोईटे मॅडम यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.तसेच लोकसहभागातून वाचनालय समृध्दी साठी वस्तू व आर्थिक स्वरूपात मदत केलेल्या पालकांचा व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. प्रमुख अतिथी श्री विशाल राऊत यांनी मी पोलिस निरीक्षक कसा झालो?ही यशोगाथा समर्पक शब्दात मुलांना सांगितली.माजी सरपंच श्री ज्ञानेश्वर दिघे यांनी मुलांना आपल्या शाळेचा नावलौकिक वाढवण्यासाठी मुलांना स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश मिळवण्यासाठी संबोधित केले.
प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री रवींद्रकुमार लटिंगे यांनी केले.सूत्रसंचालन श्री संतोष जगताप यांनी केले.तर स्वागत श्री अरुण जाधव,श्री गणेश पोमणे,सौ सरस्वती भोईटे,सौ भारती शेळके -बरकडे,सौ प्रिया निंबाळकर यांनी केले. मुलांसाठी खाऊ (बिस्कीट पुडे, गोळ्या, चॉकलेट) दिलेल्या पालकांना कृतज्ञतापूर्वक धन्यवाद दिले.संपूर्ण कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य,पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
#zpschoolmazeripun
#ozardefriends
#ravilatinge
#zpschoolmazeri
#प्रजासत्ताकदिन
#जिल्हापरिषदसातारा
#नवभारतसाक्षरता
Comments
Post a Comment