बालिका दिन माझेरी पुनर्वसन















क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन विविध उपक्रमांनी साजरा..... प्रारंभी प्रमुख अतिथी,सर्व शिक्षकवृंद, पालक आणि पालकांनी प्रतिमेस विनम्र अभिवादन केले .
आम्ही सावित्रीच्या लेकी, पुढे चालवू हा वारसा....
 आदर्श शाळा-माझेरी पुनर्वसन शाळेच्या उपक्रमशील अध्यापिका श्रीमती भारती गणपत शेळके -बरकडे मॅडम यांनी वडिलांच्या स्मृतीदिनानिमित्त वर्गनिहाय आयोजित केलेल्या मनोरंजक खेळातील अनुक्रमे तीन विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे बक्षीस देऊन अभिनंदन केले.तसेच यावेळी शाळेतील मुलांची भाषणे व मुलींनी ओव्या गायन केले.तदनंतर 
शाळेतील सर्व शिक्षिका सौ.सरस्वती भोईटे,श्रीमती भारती शेळके बरकडे,सौ प्रिया निंबाळकर, स्वयंसेविका सौ.स्वप्ना जाधव ,शापोआ स्वयंसेविका सौ अर्चना सणस यांचा सन्मान महिला पालकांच्या हस्ते करण्यात आला.
 माजी सरपंच श्री ज्ञानेश्वर दिघे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार्य या विषयी विचार व्यक्त केले.
प्रास्ताविक श्री गणेश पोमणे सरांनी केले.सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री रवींद्रकुमार लटिंगे,आभार श्री संतोष जगताप यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न करणेसाठी जेष्ठ शिक्षक श्री अरुण जाधव,श्री गणेश पोमणे व श्रीमती भारती शेळके बरकडे मॅडम यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे श्री विष्णू दिघे,माजी अध्यक्ष श्री गणेश दिघे,माजी उपसरपंच श्री परबती दिघे,व इयत्ता पहिलीचे पालक उपस्थित होते.
इयत्ता पहिलीचे पालक सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी