हळदी कुंकू समारंभ

हळदीकुंकू समारंभ व महिला मेळावा उत्साहात साजरा 
🍁जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माझेरी (पुनर्वसन) येथे महिला सक्षमीकरण व सांस्कृतिक परंपरेचे जतन व्हावे या उद्देशाने हळदी–कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथींच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती, स्वराज्य जननी जिजाबाई आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
 त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री. रवींद्रकुमार लटिंगे यांनी प्रमुख अतिथी व उपस्थित महिलांचे मनःपूर्वक स्वागत करून कार्यक्रमाचे महत्त्व सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ सरस्वती भोईटे मॅडम यांनी केले. 
समारंभात उपस्थित महिलांनी पारंपरिक पद्धतीने उखाणे घेतले. त्यानंतर सर्व महिलांना हळदी–कुंकू व वाण देण्यात आले. कार्यक्रम अधिक रंगतदार होण्यासाठी महिलांसाठी मनोरंजक संगीत खुर्ची स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.स्पर्धेतील विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम आनंद, उत्साह व आपुलकीच्या वातावरणात पार पडला.या उपक्रमामुळे महिलांमध्ये सामाजिक एकोपा वाढला तसेच पारंपरिक सणउत्सवांचे महत्त्व अधोरेखित झाले.
या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून सौ. सरस्वती भोईटे, सौ. भारती शेळके–बरकडे व सौ. प्रिया निंबाळकर,सौ स्वप्ना जाधव यांनी उत्तम नियोजन व अंमलबजावणी केली.आभार सौ भारती शेळके -बरकडे मॅडम यांनी मानले. कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री विष्णू दिघे,माजी सरपंच सौ मनिषा दिघे,सखी सावित्री समितीच्या सर्व सदस्या , शिक्षकवृंद आणि महिला पालक बहुसंख्येने उपस्थित होत्या....







Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी