पुस्तक परिचय क्रमांक:२६७ हसगत
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२६७
पुस्तकाचे नांव-हसगत
लेखक: दिलीप प्रभावळकर
प्रकाशन-राजहंस प्रकाशन, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-एप्रिल-२०२५
नववी
पृष्ठे संख्या–१८५
वाड़्मय प्रकार-ललित
किंमत /स्वागत मूल्य-२८०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२६७||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव -हसगत
लेखक: दिलीप प्रभावळकर
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
खुमासदार शैलीतले ‘हसगत’पुस्तकातले लेख खूपच वाचनीय आहेत.तसं हे पुस्तक ‘गमतीदार’आहे,ते अशा अर्थाने की, गालातल्या गालात हसण्यापासून ते थेट खळखळून धबधबा फुटल्यासारखं हसण्यापर्यंत हसण्याचे विविध प्रकार या यातून अनुभवता येतील.असं लोकप्रिय नाटककार जयवंत दळवी यांचा ब्लर्ब आपणाला हास्यलेखकाची ओळख करून देतो. ‘हसगत’पुस्तकाला सार्वजनिक वाचनालय नागपूर यांच्या ‘वि.मा.दी. पटवर्धन’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
दिलीप प्रभावळकर हे नाव आपण ऐकलं किंवा पाहिलं की आपणासमोर एक दिलखुलास व्यक्तिमत्त्वाचा आपला माणूस दिसतो. आपल्या संवेदनशील,विनोदी व गंभीर अभिनयाचा ठसा उमटवलेल्या दूरदर्शन मालिका,नाटकं आणिसिनेमातील गाजलेली लोकप्रिय व्यक्तिरेखा चिमणराव ते दशावतार आपल्या समोर उभ्या ठाकतात. सध्याच्या दशावतार सिनेमातील त्यांचा अभिनय अप्रतिम आहे.अभिनय आणि साहित्य क्षेत्रातील ययोगदानाबद्दल लेखक तथा चतुरस्त्र अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित केले आहे.
प्रभावळकरांच्या विनोदात उपहासाने जग सुधारण्याचा हेतू नसून केवळ लेखांचं रसग्रहण करताना रसिक वाचकांना आनंद देणं.हाच करा हेतू आहे.उपहासात्मक पध्दतीने लेखन करणं म्हणजे फारच शब्दांची कसरत करत समर्पक शब्दात व्यक्त व्हावे लागते.नाहीतर फसगत होवून इतरांची हस्तगत होते.त्यांनी या लेखात अतिशय सहजपणे घटनाप्रसंगाची मांडणी केली आहे.वाक्यागणिस हसायला मिळते.
‘हसगत’या लेखसंग्रहात त्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तींना मध्यवर्ती व्यक्तिरेखा देऊन विनोदी शैलीत लेखन केले आहे.तर स्वजीवनातील घटनाप्रसंगही शेअर केले आहेत.एकूण तेरा लेखांचा समावेश या पुस्तकात केलेला आहे.पुस्तकात त्यांनी दैनंदिन जीवनातील साध्या घटना,माणसांच्या सवयी,सामाजिक विसंगती, उपहास आणि मानवीस्वभाव यांवर हलक्याफुलक्या पण अर्थपूर्ण पद्धतीने भाष्य केले आहे.वाचकाला हसवतानाच विचार करायला लावणे.मंथन करायला लावणे हीच या पुस्तकाची खासियत होय.
उपहासात्मक लेख पण सुसंस्कृत विनोद लेखातून पेरलेले आहेत.याची प्रचिती या पुस्तकातील लेखांचे वाचन करताना लक्षात येते.आपल्याच आयुष्यातील काही घटनांचे लेखन या पुस्तकात केले आहे.
लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू या लेखातून आपण जाणून घेतो.अतिशय सहज सुंदर सोप्या भाषेत ते व्यक्त झाले आहेत.खरं तर कंटाळा आला तर उघडावं पुस्तक आणि वाचावा एखादा लेख.
परिचरक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक- २५जानेवारी २०२६

Comments
Post a Comment